logo
logo
Drawing of Vishnu offering his eye and lotus flowers to Linga.

भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या तीन कथा

विष्णू आणि शिव यांच्याबद्दल पुराणातील तीन मनोरंजक कथा आहेत : जेव्हा विष्णू शिवाचे घर बळकावतो - जेव्हा विष्णूने शिवाला वाचवले - आणि शेवटी, विष्णूची शिवाप्रती हृदयस्पर्शी भक्ती.

शिवा आणि विष्णू : बद्रीनाथची दंतकथा

बद्रीनाथ विषयी एक दंतकथा आहे. इथे शिव आणि पार्वती राहिले होते. हे हिमालयात सुमारे १०,००० फूट उंचीवर एक भव्य ठिकाण आहे. एके दिवशी, नारदमुनी विष्णूकडे गेले आणि म्हणाले, “तुम्ही मानवतेसाठी एक वाईट उदाहरण आहात. पूर्ण वेळ तुम्ही फक्त आदिशेषावर पडलेले असता, आणि तुमची पत्नी, लक्ष्मी, ती तुमची सतत सेवा करत असते आणि ती देखील गरजेपेक्षा जास्त. तुम्ही पृथ्वीवरील इतर जीवांसाठी आदर्श उदाहरण नाही आहात. जीवसृष्टीतील इतर जीवांसाठी तुम्ही काहीतरी उपयुक्त केले पाहिजे.”

ह्या टीकेतून सुटण्यासाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी, विष्णू खाली हिमालयात आले आणि त्यांची साधना करण्यासाठी योग्य जागा शोधू लागले. त्यांना बद्रीनाथ सापडले, एक सुंदर असे घर, ज्यात सर्व काही होते, त्यांना हवे होते तसेच- त्यांची साधना करण्यासाठी उत्तम जागा.

त्यांना तिथे घर सापडले आणि ते दार उघडून आत गेले. पण नंतर त्यांना कळाले की, हे तर शिवाचे निवासस्थान आहे – आणि तो माणूस भयंकर आहे. जर त्यांना राग आला, तर तो अशाप्रकारचा आहे की तो तुमच्यासोबत स्वतःचा देखील गळा कापून टाकेल . खूपच भंयकर माणूस.

तर, विष्णूने एका लहान मुलाचे रूप घेतले आणि घरासमोर बसला. शिव आणि पार्वती, जे फिरायला गेले होते, घरी परत आले. जेव्हा ते परत आले, तेव्हा त्यांच्या घरासमोर एक लहान बाळ रडत होते. ह्या लहान मुलाला इतके रडताना पाहून पार्वतीची ममता जागी झाली आणि त्या मुलाजवळ जाऊन त्याला जवळ घ्यावे असे तिला वाटत होते. शिवाने तिला अडवले आणि म्हणाले, “त्या मुलाला हात लावू नकोस.” त्यावर पार्वतीने प्रत्युत्तर दिले, “किती कठोर आहात तुम्ही. तुम्ही असे कसे म्हणू शकता?”

शिवा म्हणाले, “हे चांगले मूल नाही. ते आपल्या दारी स्वतः हून कसे आले? आजूबाजूला कोणीच नाही, बर्फामध्ये त्याच्या आई वडिलांच्या पायांचे ठसे नाहीत. हे मूल नाही” पण पार्वती म्हणाली, “ते काही नाही ! माझ्यातली आई ह्या मुलाला असे सोडू शकत नाही.” आणि ती मुलाला घरात घेऊन गेली . ते मूल तिच्या मांडीवर बसून खूप आनंदी होते , शिवाकडे आनंदाने पाहत होते. शिवाला याचे परिणाम माहित होते पण तो म्हणाला, “पाहूया काय होते ते.”

पार्वतीने मुलाचे सांत्वन केले आणि त्याला खाऊ घातले, त्याला घरात सोडले आणि शिवासोबत जवळच्या गरम पाण्याच्या झऱ्यावर अंघोळीला गेली. जेव्हा ते परत आले, तेव्हा त्यांना दार आतून बंद दिसले. पार्वती हैराण झाली, “दरवाजा कोणी बंद केला?” शिव म्हणाला, “मी तुला सांगितले होते, मुलाला उचलू नकोस. तू मुलाला घरात घेऊन आलीस आणि आता त्याने दार बंद करून घेतले.”

पार्वती म्हणाली, “आता आपण काय करायचे?”

शिवाकडे दोन पर्याय होते : एक म्हणजे त्याच्या समोरील सर्व काही जाळून टाकायचे. दुसरा म्हणजे दुसऱ्या रस्त्याने निघून जायचे. तर तो म्हणाले, “चल दुसरीकडे कुठेतरी जाऊ. कारण हे तुझे प्रिय मूल आहे, मी त्याला हात लावू शकत नाही.”

अशा प्रकारे शिवाने स्वतःचे घर गमावले आणि शिव आणि पार्वती स्वतःच्याच देशात परदेशी बनले! ते आजूबाजूच्या परिसरात फिरले, राहण्यासाठी आदर्श जागेच्या शोधत आणि शेवटी केदारनाथमध्ये स्थायिक झाले. तुम्ही विचाराल त्याला हे माहित नव्हते का. तुम्हाला खूप गोष्टी माहिती असतात पण तरीही तुम्ही त्या होऊ देता.

जेव्हा विष्णू शिवाला वाचवतो

योग पुराणात अशा अनेक कथा आहेत ज्या एखाद्याच्या तळमळीला शिवाची असीम करुणेचा आणि लहान मुलासारख्या प्रतिसादाचे वर्णन करतात. एकदा, एक असुर होता ज्याचे नाव होते गजेंद्र. गजेंद्राने खूप तप केले आणि शिवाकडून वरदान मिळवले की, जेव्हा तो बोलवेल, तेव्हा शिव त्याच्या सोबत असेल. गजेंद्र त्याच्या जीवनातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी शिवाला बोलवत आहे, हे पाहिल्यानंतर, नारदमुनी, तिन्ही लोकांत संचार करणारे सर्वात खोडकर ऋषी, त्यांनी गजेंद्राची खोडी केली.

त्यांनी गजेंद्राला सांगितले, “तू शिवाला सारखे काय बोलवत आहेस? तो तुझ्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देत आहेत. तू त्याला तुझ्या आत मध्ये प्रवेश करून आणि तिथेच थांबायला का सांगत नाहीस, जेणेकरून तो सदैव तुझ्या सोबत राहील?” गजेंद्राला ही कल्पना चांगली वाटली आणि त्याप्रकारे त्याने शिवाची आराधना चालू केली. जेव्हा शिव त्यावर प्रसन्न झाला, तो म्हणाला, “तू माझ्या आतमध्ये राहिले पाहिजे. तू इतर कुठेही गेले नाही पाहिजे.” शिव लहान मुलासारख्या भोळेपणामुळे गजेंद्राच्या आत लिंगाच्या रूपात गेला आणि तिथेच थांबला.

पुष्कळ वेळानंतर, संपूर्ण विश्वाला शिवाची आठवण यायला लागली. कुणालाच माहित नव्हते तो कुठे आहे. सगळे देव आणि गण शिवाला शोधू लागले. खूप शोधानंतर, जेव्हा कोणालाही कळले नाही की तो कुठे आहे, ते या समस्येचे समाधान शोधण्यासाठी विष्णूकडे गेले. विष्णूने परिस्थितीकडे पाहिले आणि म्हणाले, “तो गजेंद्रामध्ये आहे.” नंतर देवांनी विचारले की त्याला गजेंद्रातून बाहेर कसे काढायचे कारण गजेंद्र शिवाला त्याच्या आत सामावून अमर झाला होता.

नेहमी प्रमाणे, विष्णूला एक योग्य युक्ती सुचली. सगळे देव शिवाच्या भक्तांचा वेश घालून गजेंद्रच्या राज्यात आले आणि शिवाची स्तुती खूप भक्तिभावाने गाऊ लागले. गजेंद्र, शिवाचा मोठा भक्त असल्याने, त्याने ह्या लोकांना राजसभेत येण्यासाठी, गाण्यासाठी आणि नाचण्यासाठी आमंत्रित केले. देवांचा हा समूह जे शिवाच्या भक्तासारखे तयार झाले होते ते खूप मोठ्या भावाने, मोठ्या भक्तीने, शिवासाठी गाऊ लागले आणि आराधना करू लागले आणि नाचू लागले. शिव, जो गजेंद्राच्या आत बसलेला होता, स्वतःला थांबवू शकला नाही, आणि त्याला त्यांना प्रतिसाद द्यावा लागला. त्याने गजेंद्राचे तुकडे केले आणि त्याच्या आतून बाहेर आला!

विष्णूची शिवासाठी भक्ती

शिवाची आराधना देव आणि राक्षस दोघेही करायचे, देव आणि असूर, सर्वांत वरच्या आणि सर्वांत खालच्या स्तरासाठी – सर्वांसाठी ते पूजनीय होते. विष्णू स्वतः त्याची आराधना करायचा. एक अतिशय सुंदर कथा आहे ज्यात विष्णू कसा शिवाचा भक्त होता याचे वर्णन आहे.

एकदा विष्णूने शिवाला वचन दिले की, तो १००८ कमळ शिवाला अर्पण करेल. तो कमळांच्या शोधात गेला, आणि संपूर्ण जगभर शोधूनही, त्याला फक्त १००७ कमळ सापडले. एक कमी होते. तो आला आणि सर्व शिवाच्या समोर ठेवले. शिवाने त्याचे डोळे उघडले नाही, त्याने फक्त स्मित हास्य केले कारण एक कमी आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, “मी कमल नयन म्हणून पण ओळखला जातो, म्हणजे कमळासारख्या डोळ्यांचा देव. माझे डोळे कमळाच्या फुलांइतकेच सुंदर आहेत. तर मी माझा एक डोळा अर्पण करेन.” आणि त्याने लगेच त्याचा उजवा डोळा काढला आणि लिंगावर ठेवला. अशा प्रकारच्या अर्पणाने प्रसन्न होऊन, शिवाने विष्णूला सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र दिले.

संपादक टीप: आदियोगी शिव बद्दल आणखी रोचक कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

    Share

Related Tags

शिवाच्या कथा

Get latest blogs on Shiva

Related Content

शंकरांच्या तिसऱ्या डोळ्याची कथा आणि त्याचा गर्भितार्थ