logo
logo

शिव पुराण – कथांमधून विज्ञान

शिव पुराण – कथांमधून विज्ञान

शिवपुराणात असलेल्या मुलभूत विज्ञानाच्या असंख्य गोष्टींचे वर्णन करत, सद्गुरू ते एक अमर्याद शक्ती असलेले प्रभावशाली साधन आहे हेही सांगतात.

प्रश्नः सद्गुरु, तुम्ही शिव महती सांगता. इतर गुरु जसे कि मास्टर्स ऑफ झेन यांच्या बद्दल का बोलत नाही?
सद्गुरु: ब्रम्हांडातील ही प्रचंड पोकळी जिचा आपण शिव म्हणून उल्लेख करतो, ही अस्तित्वरहित अमर्याद, सदैव उपस्थित आणि सनातन आहे. पण मानवी कल्पना मर्यादित असल्याने, आपल्या संस्कृती आणि परंपरेत आपण शिवाची अनेक विस्मयकारक रूपे निर्माण केली आहेत. गूढ, अनाकलनीय असा ईश्वर. मंगलकारी असा शंभो. निस्वार्थी, साधा असा भोला; दक्षिणामूर्ती-वेद, शास्त्र आणि तंत्र यांचे महान गुरु आणि शिक्षक; क्षमाशील आशुतोष; भैरव-सृष्टीकर्त्याच्या रक्ताने रंगलेला, पूर्णतः स्थिर असा अचलेश्वर, नटराज-अत्यंत कुशल आणि उस्फुर्त नर्तक – जीवनाचे जितके पैलू त्या सर्व रुपांमधून त्याला साकार केले आहे.

जगाच्या बहुतेक भागांमध्ये, लोक जे दैवी मानतात ते नेहमीच चांगले म्हणून संदर्भित केले जाते. पण शिवपुराण वाचून तुम्हाला हे सांगताच येत नाही कि शिव चांगला मनुष्य आहे कि वाईट मनुष्य. तो सर्वात सुंदरही आहे आणि कुरूपपण आहे, तो सर्वकाही आहे – तो सर्वोत्कृष्ट आहे आणि निकृष्ट पण आहे; तो शिस्तबद्ध आहे आणि नशेखोर सुद्धा आहे. देव, दानव आणि चराचर सृष्टी त्याला पुजते आहे. तथाकथित सुसंस्कृत पणाच्या नादात शिवाबाबत असलेल्या अनाकलनीय गोष्टी सोयीस्कर रित्या वगळल्या गेल्या आहेत, पण त्यातच तर शिवाचे रहस्य आहे. शिवाचे व्यक्तित्व आयुष्याच्या विविध विरोधाभासी पैलूने विणलेले आहे. अस्तीत्वाच्या सर्व गुणांचे जटिल मिश्रण एका व्यक्तीमध्ये साकार केले गेले आहे कारण तुम्ही जर ह्या एका व्यक्तीचा स्वीकार केला तर जे जीवनच तरून जाल.

आयुष्यभर आपण काय सुंदर आहे आणि काय नाही, चांगले काय वाईट काय हे ठरवण्याच्या संघर्षातच अडकलेलो असतो. तुम्ही जर ह्या एका माणसाला; जो सर्व गुणांचे जटिल मिश्रण आहे, अशा माणसाचा स्वीकार केलात तर मग आयुष्यात इतर कोणत्याही बाबतीत समस्या निर्माण होणार नाही.

जर तुम्ही शिवपुराणातील कथा नीट वाचल्या तर तुम्हाला त्यात विज्ञानाच्या थियरी ऑफ रिलेटीवीटी, क्वांटम मेकॅनिक्स – संपूर्ण आधुनिक भौतिकशास्त्राची सुंदर कथारूप मांडणी दिसेल. हि बोलीभाषा संस्कृती आहे, म्हणून विज्ञानाची कथारूपाने मांडणी केली जात असे. सर्वकाही व्यक्तीरूपानं मांडलं गेलं आहे. पण कालांतराने लोकांनी त्यातला विज्ञानाचा भाग वगळला आणि फक्त कथाना पुढे सोपवत नेल्या. आणि नंतरच्या पिढ्यांनी ह्या कथांमध्ये अतिशयोक्तीची भर घालून त्यांना हास्यास्पद केले. जर आपण विज्ञान त्या कथांमध्ये पुन्हा आणलं तर विज्ञान व्यक्त करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे.

अत्यंत सुंदर सुंदर कथांद्वारे मानवी स्वभावाला चैतन्याच्या सर्वोच्च पातळीवर नेण्यासाठीचे उत्तम साधन म्हणजे शिवपुराण. योग संबंधित माहिती मात्र गोष्टीरूप न ठेवता विज्ञानाच्या स्वरूपात सांगितली आहे. तरीसुद्धा तुम्ही शिवपुराणाचा सखोल विचार केला तर असे लक्षात येईल कि शिव पुराणातून योग वेगळे करणे शक्य नाही. ज्यांना गोष्टी आवडतात अशांसाठी एक आहे तर विज्ञानाची कास धरणाऱ्यांसाठी दुसरे आहे, तरीही दोन्हींची मूलभूत तत्त्वे समान आहेत.

आज वैज्ञानिक आधुनिक शिक्षण पद्धतींवर संशोधन करत आहेत. त्यात एक बाब अशी सांगितली जाते, जर एक मुल 20 वर्षे आधुनिक औपचारिक शिक्षण व्यवस्थेतून बाहेर आले, की त्याच्या बुद्धिमत्तेचा एक मोठा हिस्सा नष्ट होतो की तो पुन्हा पूर्वीप्रमाणे दुरुस्त कारणे अशक्य. म्हणजे तो एक सुशिक्षित मूर्ख होऊन बाहेर येतो. ते असे सुचवत आहेत की शिक्षण देण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे कथा किंवा नाटकाच्या रूपात सादरीकरण. त्या दिशेने थोडे प्रयत्न केले गेले आहेत, परंतु जगातील बहुतेक शिक्षण अत्यंत दडपणात चालू आहे. एखाद्या विशिष्ट रुपात न देता केवळ माहितीचा तुमच्यावर भडीमार केला तर त्याने तुमची बुद्धीची वाढ खुंटते, आणि गोष्टीरूप पद्धतीने शिकवणे हा शिकण्याचा उत्तम पर्याय आहे.

या संस्कृतीत हे अशा प्रकारे केले होते, विज्ञानाचे क्लिष्ट आणि उत्कृष्ट ज्ञान गोष्टी रुपात सांगितले.

    Share

Related Tags

आदियोगी

Get latest blogs on Shiva

Related Content

महाशिवरात्रीचे लाभ आणी महत्त्व