कला सादरीकरणे

सुप्रसिद्ध कलाकारांचे संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम तुम्हाला महाशिवरात्रीच्या रात्री जागे आणि उत्साही ठेवतील, जेणेकरून तुम्ही या मंगलमय रात्रीच्या शक्यतांचा लाभ घेऊ शकाल.

मंगली

मंगली ही एक भारतीय गायिका, दूरदर्शन अँकर आणि अभिनेत्री आहे. 2013 मध्ये तिच्या पहिल्या संधीपासून तिचे गायन विशेषत: तेलगूमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. तिला यूट्यूबवर लाखो लोकांनी पाहिले आणि ऐकले आहे आणि तिने भारत तसेच परदेशात अनेक उत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे.

ईशा संस्कृती

ईशा संस्कृती हा प्रतिभेचा एक वैशिष्ट्यपूर्ण बगीचा आहे जेथे इच्छुक मुलांचे शिक्षण 6 व्या वर्षी सुरू होते आणि कमीतकमी 12 वर्षांच्या अविरत एकाग्रतेसह त्यांच्या पसंतीच्या कलेकडे लक्ष देते. या प्रशिक्षणातून नृत्य, संगीत आणि योगाच्या शास्त्रीय स्वरुपाचे उत्कृष्ट आणि ज्वलंत साधक तयार झाले आहेत. ईशा संस्कृती अभिव्यक्तीची शक्ती आणि हालचालींची व ध्वनीची जटिलता उलगडून दाखवते, आणि सर्वांत महत्वाचे, या सर्व कलाकारांच्या सादरीकरणाचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी अनुभवाची विजेसारखी तीव्रता तयार करते.

नीरज आर्या यांचा कबीर कॅफे

नीरज आर्या यांचा कबीर कॅफे – नव-लोकगीताचा फ्यूजन बॅंड रॉक, रेगे, पॉप आणि कर्नाटक संगीताद्वारे १५ व्या शतकातील भारतीय गूढज्ञानी कबीर यांच्या दोह्यांनी प्रेरित संगीत सादर करतात. संत कबीरांच्या पुरातन तत्वज्ञानाला नवीन साज चढवणाऱ्या या बँड मध्ये समावेश आहे: नीरज आर्या: लोक संगीतामध्ये स्वप्रशिक्षित कलाकार जो अनेक वर्ष पंधराव्या शतकातील संतकवी कबीर यांचे दोहे एकट्याने सादर करत आला आहे, मुकुंद रामास्वामी: कर्नाटकी शैलीचा व्हायोलिन वादक, रमन अय्यर: मँडोलिन, वीरेन सोलंकी: ड्रम आणि ब्रिट्टो केसी: बेस गिटार.

कुटले खान प्रोजेक्ट

कुटले खान प्रोजेक्ट हे खान यांची संगीताच्या दुनियेतील सीमांच्या पलीकडची सफर आहे; लोकसंगीत या त्यांच्या मुळातून प्रेरित होत, भारत आणि पाश्चिमात्य देशातील विविध संस्कृतीतील संगीतकारांशी असलेल्या सहयोगाच्या प्रभावातून आणि त्याच्या संगीतमय अनुभवातून ते ही संगीत सफर घडवतात. यातून राजस्थानी झालर असलेल्या वेगवेगळ्या संगीत शैलींचे रंगीबेरंगी पदर ते आपल्यासमोर उलगडतात. भारतीय श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याबरोबरच त्यांनी जगभरातील ७२ देशांमध्ये भारतीय लोकसंगीत आणि समकालीन सुफी संगीत यांची मेजवानी लोकांना दिली आहे.

तामिळनाडूचे थप्पू लोकसंगीत वादक

थप्पट्टम ही तामिळनाडूची एक लोककला आहे. हा संगीत प्रकार जगभरात त्याच्या विशिष्ट लय आणि शैलीसाठी प्रसिद्ध आहे. तोच कलाकार नर्तक आणि वादक दोन्ही असतो हे याचे वेगळेपण आहे. असे म्हटले जाते की तामिळ लोकांनी विकसित केलेले पहिले वाद्य, थप्पू हे मुख्यत: पूजेसाठी वापरले जाणाऱ्या ताल वाद्यांपैकी एक आहे. या वाद्याचे निरनिराळे उपयोगही केले गेले आहेत जसे की, लोकांना युद्धाची चेतावणी देणे, सामान्य नागरिकांना यद्धभूमीपासून दूर जाण्यासाठी सांगणे आणि पूजेसाठीसुद्धा. थप्पू हे वाद्य लोकांच्या जीवनाचा जणू एक तालच आहे.

साउंडस् ऑफ ईशा

साउंडस् ऑफ ईशा – सद्गुरूंची कृपा संगीताच्या भावनेतुन व्यक्त करण्याच्या तीव्र तळमळीने प्रेरित संगीतकारांचा समूह आहे. त्यांच्यातील समृद्धता आणि विविधतेचा अविष्कार म्हणजे “साउंड्स ऑफ ईशाचे” सादरीकरण. यामधील सर्वजण ईशा फाउंडेशनचे पूर्णवेळ स्वयंसेवक आहेत आणि त्यांचे प्रेरणादायी संगीत फाउंडेशनच्या कामाचे विविध पैलू हिरीरीने लोकांसमोर आणण्याच्या आकांक्षेतून येते. आपल्या मनाला शांती देऊन मोहून टाकण्या बरोबरच या संगीताची खरी ताकद मानवी अस्तित्वाच्या गाभ्यात असणारी निरंतर शांतता उलगडून दाखवण्याच्या क्षमतेत आहे.

संदीप नारायण

संदीप नारायण आज कर्नाटक संगीतातील सर्वात गाजलेले गायक आहेत. गायनाशी त्यांची औपचारिक ओळख वयाच्या 4 थ्या वर्षी त्यांची आई श्रीमती शुभा नारायण यांच्यापासून झाली, नंतर श्री के.एस. कृष्णमूर्ती चेन्नई येथे आणि प्रख्यात गायक श्री संजय सुब्रह्मण्यन यांच्याकडून पुढील प्रशिक्षण घेतले. अमेरिकेत जन्मलेले आणि वाढलेले असताना मर्यादा तोडून कर्नाटक संगीत पूर्णवेळ कारकीर्द म्हणून स्वीकारण्यासाठी भारतात आलेले ते पहिले संगीतकार ठरले, आणि अशा प्रकारे जगभरतील भविष्यकाळातील कर्नाटक संगीतकारांसाठी पाया रचला. संगीत नाटक अकादमीचे “बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार”, आणि “सन्मुख संगीत शिरोमणी” यासह अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.

पार्थिव गोहिल

पार्थिव गोहिल अगदी सहज वेगवेगळ्या प्रकारच्या संगीतात स्वतःच्या आवाजाची ढब बदलू शकतात. शास्त्रीय संगीत असो, ठेका धरायला लावणारे पॉप संगीत असो किंवा रोमँटिक गाणी त्यांचे संगीत त्यांच्या अंतरातून येते आणि तुम्ही जेव्हा त्यांना ऐकता तेव्हा हे तुम्हाला जाणवते. गोहिल यांचे गायन पंडित हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद सुलतान खान आणि गुंदेचा बंधू यांसारख्या मातब्बर कलाकारांपासून इस्माईल दरबार, मोंटी शर्मा, लेस्ली लुईस यासारख्या समकालीन संगीतकारांपर्यंत सगळ्यांमुळे फुलले आणि यामुळे ते अष्टपैलू गायक बनतात.

अँथनी दासन

रेड्डीयारपलयम्, पुद्दुचेरी, तमिळनाडू येथील अँथनी दासन हे एक भारतीय पार्श्वगायक आणि लोक गायक, गीतकार आणि संगीतकार आहेत.संगीत जणूकाही त्यांचा श्वासच आहे. लहानपणापासूनच ते संगीताच्या सानिध्यात होते. ते प्राचीन लोक संगीताची शैली आणि प्रयोगात्मक समकालीन शैली एकत्र आणतात. दासन हे अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत, बॉब मारल्ये यांच्यापासून प्रेरित होऊन ते स्वतःचा “लोकसंगीतातला मारल्ये” म्हणून उल्लेख करतात

detail-seperator-icon

मागील यक्ष उत्सवातील कला सादरीकरणे

Amit-Trivedi

Amit Trivedi

Hariharan

Hariharan

Karthik

Karthik

Sonu Nigam at Mahashivratri 2018 Celebrations at Isha Yoga Center

Sonu Nigam (Special Guest Performance)

Daler Mehndi at Mahashivratri 2018 Celebrations at Isha Yoga Center

Daler Mehndi

Sean Roldan and Friends at Mahashivratri 2018 Celebrations at Isha Yoga Center

Sean Roldan and Friends

detail-seperator-icon