महाशिवारात्रोत्सव सोहळा

Quote Spataro

“माझी इच्छा आणि आशीर्वाद आहे की आपण या महाशिवरात्रीचा उपयोग तुमची आकलन शक्ती वाढविण्यासाठी आणि जीवनातील मोठ्या अनुभवांची चव चाखण्यासाठी करून घ्याल” – सद्गुरु

2019 सालची महाशिवरात्री 4 मार्च रोजी आहे
प्रत्येक चंद्रमहिन्याचा 14वा दिवस, म्हणजेच अमावास्येच्या आधीचा दिवस शिवरात्र म्हणून संबोधला जातो. या रात्री आध्यात्मिक मार्गावर असलेल्या व्यक्ती सहसा विशेष मार्गदर्शनाची साधना (आध्यात्मिक सराव) करतात. एका कॅलेंडर वर्षात येणार्‍या बारा शिवरात्रींपैकी, माघ या चंद्रमहिन्यात येणार्‍या रात्रीला महाशिवरात्र असे संबोधले जाते कारण ती बारा शिवरात्रींपैकी सर्वात अधिक शक्तीशाली असते.

महाशिवरात्री हा ईशा योग केंद्रात रात्रभर जल्लोषात साजरा केला जाणारा उत्सव असून त्यामध्ये उत्स्फूर्त ध्यान आणि नामवंत कलाकारांनी सादर केलेले नेत्रदीपक सांगीतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. यामध्ये लाखो व्यक्ती सहभागी होतात. सद्गुरूंच्या उपस्थितीत साजरा केल्या जाणाऱ्या या दिव्य दैवी रात्रोत्सावात असंख्य आध्यात्मिक शक्यता निर्माण होतात. Read More

भारताची पवित्र भूमी आध्यात्मिक उन्नतीसाठी अनेक उत्सव साजरे करते, त्यापैकी महाशिवरात्रीचे सामर्थ्य अग्रगण्य आहे. अदभूत अशी ग्रहांची स्थिती असणारी ही रात्र, जे कोणी आपला पाठीचा कणा सरळ ठेवून जागरण करतात, त्यांना प्रचंड भौतिक आणि आध्यात्मिक लाभ प्रदान करते.