ieco
ieco

शिव-शंकराची १०८ नावे – अर्थासहित

article शिवाच्या गोष्टी
शंकराची नावे ते कोण आहेत याच्या वेगवेगळ्या आयामांचे प्रतिनिधित्व करतात. इथे शंकराची 108 नावांची यादी आणि शंकराची येवढी नावे का असावीत यावर दिलेले सद्गुरूंचे स्पष्टीकरण.

सद्गुरु म्हणतात, “योगिक परंपरेत शंकराची पुजा एक देवता म्हणून नव्हे तर गुरु म्हणून केली जाते. ज्याला आपण शिव म्हणून संबोधतो. ते बहुआयामी आहेत. ज्याला आपण सर्वगुणसंपन्न असे म्हणू शकतो. ते सर्व गुण शंकराच्या अंगी आहेत. जेव्हा आपण शिव म्हणतो, तेव्हा आपण असे म्हणत नाही की तो या प्रकारचा माणूस किंवा तो त्या प्रकारचा माणूस आहे.

सामान्यत: नैतिक परंपरा चांगुलपणालाच नेहमी दैवी समजतात. परंतु तुम्ही जर शंकराकडे पाहिले तर तुम्ही त्याला चांगला किंवा वाईट म्हणू शकत नाही. अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट त्याचा एक भाग आहे. परंपरेत त्याचे असेच वर्णन केले गेले आहे. ”

शंकराच्या 108 नावांच्या निर्मितीची कथा

सद्गुरु पुढे म्हणतात, “त्याची असंख्य रुपे आणि प्रकटीकरणे आहेत परंतु मूलभूतरित्या, आपण त्यांचे सात श्रेणींमध्ये वर्गीकरण करू शकतो. त्याला आपण सर्वोच्च ईश्वर म्हणतो; तो एक परोपकारी वैयक्तिक देव आहे ज्याला आपण शंभो म्हणतो; त्याला आपण साधाभोळा तपस्वी किंवा एक भो, किंवा अत्यंत प्रेमळ सांबळेश्वर किंवा भोला म्हणतो; तो वेदांचा एक ज्ञानी शिक्षक आहे ज्यांना आपण दक्षिणामूर्ति म्हणतो; सर्व कलाप्रकारांचे मुख्य उगमस्थान, ज्याला आपण नटेश म्हणतो; एक उग्र, दुष्टांचा नाश करणारा आम्ही त्याला काळभैरव किंवा महाकाल म्हणतो; धगधगणार्‍या प्रेमाने मोहात पाडणारा, आम्ही त्याला सोमसुंदर म्हणतो, ज्याचा अर्थ चंद्रापेक्षाही सुंदर आहे. ही सात मूलभूत रूप आहेत ज्यातून लाखो रूपं निर्माण केली जाऊ शकतात. ”

योग परंपरेत या सात व्यापक प्रवर्गात शंकराची १००8 नावे आहेत. या १००8 नावांपैकी शंकराची १०८ नावे सर्वत्र प्रसिध्द आहेतः

शंकराची अर्थासाहित १०८ नावे

आशुतोष
जो सर्व इच्छा त्वरित पूर्ण करतो
आदिगुरु
प्रथम गुरु
आदिनाथ
सर्वोच्च स्वामी
आदियोगी
प्रथम योगी
अज
अजन्मा
अक्षयगुण
अगणित सद्गुण असणारा
अनघ
निष्कलंक
अनंतदृष्टी
अमर्याद दृष्टीचा
औघद
जो निरंतर मौजमजेत दंग असतो
अव्ययप्रभु
अविनाशी
भैरव
भीतीचा नाश करणारा
भालनेत्र
कपाळावर नेत्र असलेला
भोलेनाथ
साधाभोळा
भुतेश्वर
पंचमहाभूतांवर ज्याचे प्रभुत्व आहे असा
भूदेव
पृथ्वीचा देव
भूतपाल
शरीररहित जीवांचा रक्षक
चंद्रपाल
चंद्राचा स्वामी
चंद्रप्रकाश
ज्याच्या माथ्यावर चंद्र आहे असा
दयाळू
दयाळू
देवादिदेव
देवांचा देव
धनदीप
संपत्तीचा देव
ज्ञानदीप
ध्यानाचा प्रकाश
द्युतीधारा
तेजाचा परमेश्वर
दिगंबर
ज्याने आकाश अंगवस्त्र म्हणून धारण केले आहे असा
दुर्जनीय
ज्ञात करणे कठीण आहे असा
दुर्जय
अजेय
गंगाधर
गंगा नदीचा स्वामी
गिरीजापती
गिरिजेचा (पार्वतीचा) स्वामी
गुणग्रही
गुण ग्राहक
गुरुदेव
महान गुरु
हर
पापे दूर करणारा
जगदीश
विश्वाचा स्वामी
जराधीशामन
दुखाःपासून मुक्ती देणारा
जतिन
ज्याचे केस गुंता झालेले आहेत असा
कैलास
शांती प्रदान करणारा
कैलासाधिपती
कैलास पर्वताचा भगवान
कैलासनाथ
कैलास पर्वताचा स्वामी
कमलाक्षन
कमल नयनी भगवान
कंठ
सदैव तेजस्वी
कपालिन
जो कवट्यांची माला घालतो तो
कोचदैय
पिंजारलेले लांब केस असलेला भगवान
कुंडलिन
कानात डूल घातलेला
ललाटाक्ष
ज्याच्या कपाळावर नेत्र आहे असा
लिंगाध्यक्ष
लिंगांचा स्वामी
लोकांकर
तीन जगांचा निर्माता
लोकपाल
जो जगाची काळजी घेतो तो
महाबुद्धी
अतिशय बुद्धिमान
महादेव
महान देव
महाकाल
काळाचा स्वामी
महामाया
महान भ्रम दाखवणारा
महामृत्युंजय
मृत्यूवर विजय प्राप्त करणारा महान
महानिधी
महान भांडार
महाशक्तिमय
ज्याच्याकडे अमर्याद ऊर्जा आहेत असा
महायोगी
महान योगी
महेश
सर्वोच्च देव
महेश्वर
देवांचा देव
नागभूषण
दागिने म्हणून सर्प अंगावर बाळगणारा
नटराज
नृत्यकलेचा राजा
नीलकंठ
ज्याचा गळा निळा आहे असा
नित्यसुंदर
सदैव सुंदर
नृत्यप्रिय
नृत्याचा प्रेमी
ओंकार
ओंकार
पालनहार
जो सर्वांचे रक्षण करतो तो
पंचतशरण
जोमदार
परमेश्वर
सर्व देवतांमध्ये सर्वोच्च
परमयोगी
सर्वोत्तम वैभव
पशुपती
सर्व प्राणिमात्रांचा स्वामी
पिनाकिन
ज्याच्या हातात धनुष्य आहे असा
प्रणव
ओम या प्राथमिक ध्वनीचा आरंभकर्ता
प्रियभक्त
भक्तांचा आवडता
प्रियदर्शन
प्रेमळ दृष्टी असलेला
पुष्कर
जो पोषण देतो तो
पुष्पलोचन
ज्याचे नेत्र फुलांसारखे आहेत असा
रवीलोचन
सूर्य ज्याचा नेत्र आहे असा
रुद्र
गर्जना करणारा
सदाशिव
पार केलेला
सनातन
शाश्वत देव
सर्वचर्य
सर्वोच्च शिक्षक
सर्वशिव
शाश्वत देव
सर्वतपन
सर्वांचा गुरु
सर्वयोनी
सदैव शुद्ध
सर्वेश्वर
सर्वांचा देव
शंभो
शुभ
शंकर
सर्व देवांचा देव
शांतहः
स्कंदाचा उपदेशक
शूलीन
आनंद देणारा
श्रेष्ठ
चंद्राचा स्वामी
श्रीकांत
सदैव शुद्ध
श्रुतिप्रकाश
ज्याच्याकडे त्रिशूळ आहे असा
स्कंदगुरु
वेदांचा प्रकाशक
सोमेश्वर
ज्याचे शरीर शुद्ध आहे असा
सुखदा
आनंद देणारा
स्वयंभू
स्व-निर्मित
तेजस्विनी
प्रकाश पसरवणारा
त्रिलोचन
तीन नेत्रांचा राजा
त्रिलोकपती
सर्व तिन्ही जगांचा स्वामी
त्रिपुरारी
त्रिपुराचा (असुरांनी निर्माण केलेले तीन लोक) विनाशक
त्रिषूलिन
ज्याच्या हातात त्रिशूल आहे असा
उमापती
उमेचा पती
वाचस्पती
वाचेचा भगवान
वज्रहस्त
ज्याच्या हातात वीज आहे असा
वरद
वर देणारा
वेदकर्ता
वेदांचा आरंभकर्ता
वीरभद्र
पातळाचा सर्वोच्च देव
विशालअक्ष
रुंद डोळ्यांचा देव
विश्वेश्वर
विश्वाचा देव
विश्वनाथ
विश्वाचा स्वामी
वृषवाहन
ज्याचे वाहन बैल आहे असा