ieco
ieco

शिव-पार्वतीचा चमत्कारिक विवाह

article शिवाच्या गोष्टी
पार्वती राजकन्या असल्याने शिव आणि पार्वतीचे लग्न हे राजेशाही प्रकरण होते. आणि मग नवरदेव, शिव आला, उग्र, जटाधारी, डोक्यापासून पायापर्यंत राखफासलेला. शिव पूर्णपणे नशेत धुंद, पूर्णपणे परमानंदात दंग अवस्थेत आला.

 

सद्गुरू:

योगिक समुदायात प्रचलित अशी एक फार सुंदर कथा आहे. आदियोगी शिव आणि पार्वती विवाह हे एक भव्य-दिव्य प्रकरण होते. पार्वती ही राजकन्या असल्याने संपूर्ण प्रदेशातील मोठ-मोठ्या असामींना निमंत्रण होते – राजे रजवाडे आणि त्यांच्या राण्या, देव देवता सर्व नटून थटून अले होते आणि एकापेक्षा एक सुंदर दिसत होते.

आणि नवरा, शिव आले – उग्र, जटाधारी केशसंभार, संपूर्ण अंगाला राख फसलेली, नुकत्याच मेलेल्या हत्तीचं रक्ताळलेलं कातडं त्यांनी परिधान केलं होतं. शिव पूर्णपणे नशेत धुंद, पूर्णपणे परमानंदात दंग अवस्थेत आला. त्यांच्या वरातीत माणसांसारखी नं दिसणारी, भयानक आणि विकृत वाटणारी, भूत पिशाच्च सारखी लोकं होती. कोणालाही कळणार नाही अशा भाषेत ती गोंगाट करत होती.

नवऱ्या मुलाला पाहताच पार्वतीची आई, मीना, चक्कर येऊन पडली! “तुम्ही जसे आहात तसे मला आवडता. मला फक्त तुम्ही हवे आहात. पण कृपया माझ्या आईकरता तरी तुम्ही जरा दिसण्यात सभ्यपणा आणा ना.” पार्वतीने शिवाजवळ आर्जव केले.

विनंतीस मान देऊन शिवाने सुंदर वेश परिधान केलं व तो लग्नाला परत उपस्थित झाला. जेव्हा उपस्थितांनी त्याच्यातील परिवर्तन पहिले तेव्हा सगळे त्याला सुंदरमूर्ती म्हणू लागले. म्हणजेच आत्तापर्यंत त्यांनी पाहिलेला सर्वात सुंदर मनुष्य. शिव नऊ फूट उंच होते. उभे राहिल्यावर त्यांची उंची त्यांच्या घोड्याच्या डोक्या एव्हढी भरत होती. दक्षिण भारतात आल्यावर तिथल्या बायकांची उंची जी सरासरी साडे चार ते पाच फूट उंच असते त्यांच्यापेक्षा शिवाची उंची दुप्पट वाटत होती. तो सुंदरमूर्ती जवळपास नऊ फूट उंच होता आणि त्याची उपस्थिती सर्वाना विस्मयकारक वाटत होती.

शिव आणि पार्वती : एका तपस्वीचा राजकन्येशी विवाह

तर शिव लग्नाला आले. अशा प्रकारच्या विवाहात, विशेषतः भारतात, नवरा व नवरी यांच्या पूर्वजांबद्दल अभिमानाने बोलतात. त्यांचे खानदान, त्यांची वंशावळ, त्यांची नाळ कोणाशी जोडलेली आहे, त्यांचे रक्त कोणाचे आहे, त्यांची वंशावळ किती महान आहे या विषयी बोलले जाते.

नवरीचे वडील, म्हणजे पार्वतीचे वडील हिमावत हे हिमालय पर्वत प्रदेशाचे राजे होते. त्यांच्या वंशावळीबद्दल खूप गौरवशाली गोष्टी सांगण्यात आल्या. पण आता नवऱ्याबद्दल काय? काहीही नं बोलता शिव शांत व स्तब्ध बसून होते. त्यांच्याबरोबर आलेल्या जथ्यातील कोणालाच सर्वज्ञात अशा भाषेत बोलता येत नव्हते. ते नुसतेच कर्कश्य आवाज करत बसले होते. नवरीच्या वडिलांना तो अपमान वाटला. “पूर्वजांबद्दल माहिती नसलेला माणूस माझ्या मुलीशी लग्न कसे करू शकतो? कोण कुठून आला, खानदानाविषयी काही माहित नाही, अशाला माझी मुलगी मी का देऊ?” संतापून ते उभे राहिले.

मग महर्षी नारद, जे लग्नाचे आमंत्रित होते, त्यांचा एकतारा घेवून पुढे सरसावले आणि त्यांनी एकताऱ्यातून “टांग.. टांग.. टांग..” असा आवाज काढला.

राजा अजूनच भडकला, “आत्ता एकतारा वाजवण्याचे काय कारण?”

नारद म्हणाले, “त्याचा पूर्वेतिहास हाच आहे की, त्याला वडील नाहीत, त्याला आईही नाही.”

“मग त्याचे मूळ काय आहे?”

टांग… त्याचे मूळ आहे नाद किंवा ध्वनी, स्पंदन. स्पंदनातून त्याचा जन्म झाला आहे. त्याचे कोणी पालक नाहीत, पूर्वज नाहीत, वंशावळ नाही. तो स्वयंभू आहे – स्वः निर्मित, पूर्वजांशिवाय.”

राजाला हे विचित्र वाटत होतं, पण लग्न पार पडलं.

शिव-पार्वती विवाह : कथेतील प्रतिकात्मकता

या कथेतून आपण असा बोध घ्यायचा की जेव्हा आपण आदियोगीबद्दल बोलतो तेव्हा आपण जीवनाशी संपूर्ण एकरूप झालेल्या आदिमपुरुषाबद्दल बोलतो आणि सभ्य, सुसंस्कृत अशा माणसाबद्दल नाही. तो शुद्ध आहे, दिखाऊ नाही, नेहेमीच उत्स्फूर्त आहे, संशोधक आहे, अथक सर्जनशील आहे. तोच जीवन आहे.

हीच अध्यात्माची मुलभूत गरज आहे. इथे जर तुम्ही तुमचे विचार, तुमची मते यांची मोट बांधून बसलात – म्हणजेच बाहेरील स्मृतींची शलाका घेवून बसलात – तर तुम्ही फक्त मानसिकतेचे गुलाम बनून जाल. पण जर तुम्ही इथे जीवनाचा अंश म्हणून बसलात तर अस्तित्वाच्या प्रक्रियेत सामावले जाल. तुमची इच्छा असेल तर संपूर्ण विश्वात तुमचा प्रवेश होऊ शकतो.

जीवन हे खुले आणि मुक्त आहे. अस्तित्त्व कोणालाच कशापासून अडवून ठेवत नाही. असे म्हटलेच आहे की, “ठोठावलत की लगेच दार उघडेल.” खरंतर दार ठोठावण्याचीपण गरज नसते, कारण ते काही प्रत्यक्ष दार नसतेच. तोचतोचपणा आणि स्मृतिरंजन बाजूला सारलेत तर तुम्हाला आत सरळ प्रवेश मिळेल. आत्मज्ञानाचा मार्ग सताड उघडा आहे!