logo
logo

112-फूटाच्या आदियोगीं बद्दलच्या तुम्हाला कदाचित माहित नसलेल्या १२ गोष्टी

२१ फेब्रुवारी, २०२० रोजी महाशिवरात्री असल्याने, ईशा योग केंद्र आदियोगी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या रात्रभर चालणाऱ्या उत्सवाची तयारी करत आहे. येथे भेट देण्यापूर्वी तुम्हाला ११२ फुटांच्या आदियोगी बद्दल या 12 गोष्टी माहिती असल्या पाहिजेत.

१. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सद्वारे आदियोगीला जगातील सर्वात मोठी शिल्पाची रचना म्हणून नावाजले गेले आहे आणि हे शिल्पं 112 फूट उंच आहे. आदियोगींची ही महत्वपूर्ण प्रतिमा १५० फूट लांब, २५ फूट रुंदीची आणि सुमारे ५०० टन स्टीलची बनलेली आहे.

२. आदीयोगींचें दिव्य दर्शन

आदियोगी एका नेत्रदीपक थ्रीडी लेझर शोद्वारे आकाश लखलखून टाकतात, या शो मध्ये आदियोगींनी मानवतेला योग विज्ञान कसे दिले हे दर्शविले जाते. शनिवार-रविवार, पौर्णिमा, अमावस्या आणि इतर शुभ दिवसांवर संध्याकाळी ८ ते ८. १५ या वेळेत तुम्ही या कार्यक्रमा

३. आदियोगी वस्त्र दान

आदियोगींच्या आजूबाजूच्या असलेल्या ६२१ त्रिशूळांपैकी एकावर काळे कापड बांधून भक्त आदियोगिनां वस्त्र अर्पण करू शकतात.

4. आदियोगी प्रदक्षिणा

आदियोगी प्रदक्षिणा म्हणजेच ध्यानलिंग आणि आदियोगी यांची दोन किलोमीटर अंतराची प्रदक्षिणा आहे. सद्गुरूंनी आदियोगींची प्रदक्षिणा करणाऱ्या व्यक्ती आदियोगींची कृपा ग्रहण करण्यासाठी तयार व्हाव्यात यासाठी तयार केली आहे, जी एखाद्या व्यक्तीच्या अंतिम मुक्तीच्या प्रयत्नांना देखील उत्तेजन देऊ शकते. एका विशिष्ट मंत्राचा जप करून आणि विशिष्ट मुद्रा धारण करून प्रदक्षिणा करणे हे ईशा योग केंद्रातील विविध पवित्र जागांची उर्जा आत्मसात करण्याचा एक मार्ग आहे.

५. योगेश्वर लिंग समर्पण

योगेश्वर लिंगाच्या उर्जा आत्मसात होण्यासाठी एक मार्ग म्हणून, भाविक लिंगाला पाणी आणि कडुनिंबाच्या पानांचा नैवेद्य अर्पण करू शकतात.

६. पौर्णिमेची संगीत सेवा

प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री, आदियोगी दर्शनासाठी मध्यरात्रीपर्यंत खुले असतात आणि साऊंड्स ऑफ ईशाद्वारे रात्री १०.३० ते ११:३० पर्यंत आदियोगींसमोर संगीतसेवा केली जाते.

७. अमावास्या

प्रत्येक अमावास्येला योगेश्वर लिंगाला जवळील खेड्यांमधील लोक पारंपारिक नैवेद्य अर्पण करतात. तेथे पारंपारिक संगीत आणि नृत्याचं देखील अर्पण केलं जातं, त्यानंतर प्रसाद वितरण केलं जातं. संपूर्ण कुटुंबासाठी हा एक परिपूर्ण अनुभव असतो.

८. सद्गुरूंची कल्पना

आदियोगींचा चेहरा तयार करण्यासाठी अडीच वर्षे आणि डझनभर रचना करण्यात आल्या. आदियोगींचा चेहरा कसा असावा याबद्दल सद्गुरूंच्या मनात एक निश्चित कल्पना होती आणि सद्गुरू त्या कल्पनेच्या पेक्षा कमी असलेल्या कुठल्याच रचनेला सदगुरू हो म्हणणार नव्हते. आणि पहा, किती सुंदर परिणाम!

९. आदियोगींच्या मूल्यवान वस्तू

योगेश्वर लिंगाच्या बाजूला पितळी फरशा आहेत ज्याच्यावर अत्यंत जटिल तपशीलवार कलाकृतीची छोटी कोरीव काम केलेली आहेत. यात योग परंपरेत वर्णन केल्यानुसार आदियोगींच्या काही बहुमूल्य वस्तूंचे कोरीव काम केले गेले आहे. त्या कानातले आहेत, चंद्राची एक बारीक चंद्रकोर आहे ज्याने ज्यामुळे त्यांच्या जटा अजूनच शोभून दिसतात, एक रुद्राक्ष मणी आहे , कडुलिंबाची पाने आहेत, डमरू, धनुष्य, कुऱ्हाड आणि एक घंटा देखील कोरून घेतलेली आहे.

१०. “बहुभाषिक” लिंग

योगेश्वर लिंगाकडे बारकाईने पाहाल तर तुम्हाला तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम अशा चार वेगवेगळ्या दक्षिण भारतीय भाषांमध्ये लिहिलेली “शंभो” हा मंत्र दिसेल.

११. सप्तर्षींची शिल्पं

योगेश्वर लिंगाच्या बाजूला असलेले एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे सप्तर्षींचे शिल्प असलेले काळे दगडी पॅनेल जे सद्गुरुंनी प्राणप्रतिष्ठित केले आहेत. या पवित्र पॅनेलला कोणीही कधीही हात लावायचा नसतो, अगदी स्वच्छ करणारेही याला हात लावत नाहीत.

१२. रुद्राक्ष दान

१०,००,००८ रुद्राक्ष मणी असलेली आदियोगींच्या गळ्याभोवती असलेली माळ हि जगातील बहुदा सर्वात मोठी रुद्राक्ष माळ असेल. हे मणी बारा महिने दैवी उर्जामध्ये भिजत असतात आणि प्रत्येक महाशिवरात्रीला भक्तांना प्रसाद म्हणून हे रुद्राक्ष अर्पण केले जातात.

महाशिवरात्रीच्या वेळी सद्गुरूंनी अर्पण केलेल्या उर्जा आणि शक्यतांपर्यंत प्रवेश मिळणे हा एक विलक्षण विशेषाधिकार आहे. एखाद्याच्या आध्यात्मिक वाढीसाठी आणि आरोग्यासाठी निसर्गाच्या शक्तींचा वापर करण्याची महाशिवरात्री एक अनोखी संधी आहे. आदियोगींच्या उपस्थितीत ईशा योग केंद्रातील रात्रभर चालणारा असा हा उल्हासी समारंभ प्रखर आध्यात्मिक अनुभवासाठी उपयुक्त वातावरण आहे.

We hope to see you there!

    Share

Related Tags

आदियोगी

Get latest blogs on Shiva

Related Content

शिव तांडव स्तोत्र