मानवी मन ज्याची कल्पना करू शकते आणि करू शकत नाही, अशी शिवाची असंख्य रूपे आहेत ज्यात प्रत्येक संभाव्य गुणांचा समावेश आहे. काही रौद्र आहेत. काही अनाकलनीय आहेत. इतर प्रेमळ आणि मोहक आहेत. साधा भोलेनाथ ते रौद्र काळभैरवा पर्यंत, अति सुंदर मोहक अशा सोमसुंदर पासून ते भयंकर अघोर-शिवा अशा सर्वरुपात, तरीही त्या पासून दूर. परंतु यासर्वांमध्ये पाच मूलभूत रूपे आहेत. या लेखात, सद्गुरु त्याबद्दल सांगत आहेत, ती रूपे काय आहेत आणि त्यांमागील महत्त्व आणि विज्ञान काय आहे ते स्पष्ट करणार आहेत.
योग योग योगेश्वराय
भुत भुत भुतेश्वराय
काल काल कालेश्वराय
शिव शिव सर्वेश्वराय
शंभो शंभो महादेवाय
सद्गुरु: योग मार्गावर असणे म्हणजे आपल्या आयुष्यात आपण एक टप्प्यात आलो आहोत जिथे तुम्हाला भौतिक मर्यादांची जाणीव झाली आहे, तुम्हाला त्याच्या पलीकडे जाण्याची गरज आहे असे वाटले आहे. एवढ्या मोठया विश्वात सुद्धा तुम्हाला अडकून राहिल्यासारखे वाटत आहे.
तुमच्या असे लक्षात आले आहे की या छोट्या गोष्टी वर मात केली आहे तर आता मोठ्या गोष्टींवर मात करणे अशक्य नाही. हे अनुभव घेण्यासाठी ब्रम्हांड पार करण्याची आवश्यकता नाही. ते तुम्हाला इथे बसून करणे शक्य आहे. जर तुम्हाला एखादी मर्यादा येथे आड येत असेल, तर आपल्याला ब्रह्मांडात गेल्यावर सुद्धा काही वेळानंतर मर्यादा आड येतीलच. – हा केवळ तुम्ही किती अंतर प्रवास करू शकता, ह्या तुमच्या क्षमतेचा प्रश्न आहे. एकदा आपली प्रवास करण्याची क्षमता वाढली, तर कोणतीही सीमा तुमच्यासाठी अडथळा राहणार नाही. एकदा आपण हे जाणून आणि समजावून घेतले, एकदा आपल्या मनात ही भौतिक निर्मितीवर ताबा मिळविण्याची आस निर्माण झाली की योग सुरू होतो. योग म्हणजे भौतिक मर्यादा ओलांडणे. आपले प्रयत्न केवळ भौतिक अस्तित्वावर प्रभुत्व मिळविणे हे नसून त्या मर्यादा ओलांडून भौतिक मर्यादांच्या पलीकडे जाणे हा आहे. जे अस्तीत्वात आहे आणि जे अस्तीत्वात नाही ते एकत्र आणण्याचा तुमचा प्रयत्न राहील. तुम्हाला मर्यादा अमर्यादांमध्ये विरघळवून टाकाव्याशा वाटतील, आणि म्हणूनच योगेश्वर.
भौतिक सृष्टी – म्हणजे आपल्या सभोवती जे आहे, जे आपण पाहू शकतो, ऐकू शकतो, गंध, चव, ज्याला आपण स्पर्श करू शकतो असा प्रत्येक जीव, ग्रह, हे विश्व, हे ब्रम्हांड ह्या सर्व गोष्टी पंच महाभूतांचा प्रपंच आहे. फक्त पाच गोष्टी, आणि किती सुंदर अविष्कार जीला आपण सृष्टी म्हणतो. या पाच गोष्टींपासून अगणित गोष्टी निर्माण झाल्या आहेत. ईश्वर किती दयाळू आहे, जर पाच दशलक्ष घटक असते तर आपण यात हरवूनच गेलो असतो.
या पाच गोष्टींना वश करणे, जी पंचमहाभूते म्हणून ओळखली जातात, ते म्हणजे सर्वस्व आहे – तुमचे आरोग्य, तुमचा चांगुलपणा, तुमची ताकद, तुम्हाला हवे ते करण्याची तुमची ताकद सर्व काही. कळत नकळत जाणीवपूर्वक किंवा अभावितपणे प्रत्येकजण या विविध गोष्टींवर थोड्याफार प्रमाणात मात करत असतो. ते किती यशस्वी होतात हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेतून दिसते, एखादी गोष्ट ते कशी करतात, त्यात कितपत यश मिळते, हे सर्व काही त्यांच्या शरीराचे स्वरूप, मनाचे स्वरूप, आणि ते करत असलल्या गोष्टींमुळे ठरते. ते प्रत्येक गोष्ट किती दूरदृष्टीने पाहू शकतात त्यानुसार.
भूत भूतेश्वर म्हणजे असा ज्याने या पंच महाभूतांना वश केले आहे आणि जो स्वतःच स्वतःचे नशीब घडवतो भौतिक रुपात तरी.
काळ – वेळ. जरी तुम्ही पंचतत्वांवर मात केली असेल, अनंतात एक झाले असाल किंवा तुम्हाला तुमचा अंत काय आहे हे देखील समजले असले तरीही तुम्ही जोवर इथे आहात तोवर वेळ पुढे पुढे सरकत आहे. वेळेवर मात करणे हे वेगळेच कोष्टक आहे. काळ म्हणजे फक्त वेळ नव्हे, त्याचा दुसरा अर्थ अंधकार असा पण आहे. वेळ म्हणजे अंधकार, वेळ हा प्रकाशित असूच शकत नाही कारण तो प्रकाश सुद्धा वेळे प्रमाणे चालतो. प्रकाश हा वेळेचा दास आहे. प्रकाशाला आरंभ आहे आणि अंत हि आहे. वेळे बाबत तसे काहीही नाही. हिंदू विचार प्रणाली नुसार काळाची सहा वेगवेगळ्या परिमाणात विभागलेली अगदी सविस्तर समज आहे.
एक लक्षात घ्या, जरी आत्ता तुम्ही इथे बसलेले आहात तरी तुमचा वेळ पुढे सरकतच आहे. तमिळ मध्ये मृत्यूचा उल्लेख “कालंम आयीतांगा” असा करतात म्हणजे “ त्याची वेळ संपली”
इंग्रजी मध्ये देखील आपण असे म्हणतो कि “ही एक्सपायर्ड” म्हणजे तो कालबाह्य झाला जसे एखादे औषध किंवा तत्सम काही, प्रत्येक मनुष्य सुद्धा त्याची समाप्तीची तारीख घेऊनच येत असतो. तुम्हाला असे वाटते कि आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो. नाही एक क्षण देखील विचलित न होता त्याचा प्रवास हा अंता कडे चालूच आहे. कदाचित तुम्ही त्याचा वेग थोडा कमी करू शकाल पण त्याची दिशा बदलणार नाही. जस जसे वय वाढत जाईल तस तसे तुमच्या लक्षात येईल कि पृथ्वी तुम्हाला आपल्यात परत सामावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. जीवन त्याचे कार्य करत आहे.
वेळ हा आयुष्याचा विशेष भाग आहे – तो इतर तीन भागांप्रमाणे नाही. आणि अखंड ब्रम्हांडातील सर्वात उत्कृष्ट गोष्ट आहे. तुम्ही त्याला बाजूला काढून ठेवू शकत नाही कारण त्याचे भौतिक अस्तित्व नाही. तुम्हाला माहित असलेल्या कोणत्याही स्वरुपात तो नाहीये. वेळ म्हणजे एक अत्यंत प्रभावी रचना आहे, ज्याने संपूर्ण विश्व एकत्र बांधले आहे. याचे कारण असे कि आधुनिक भौतिकशास्त्राला देखील हे माहित नाही कि गुरुत्वाकर्षण कसे काम करते, कारण तिथे गुरुत्वाकर्षण नाही. वेळच अशी गोष्ट आहे ज्याने सर्व एकत्र ठेवले आहे.
शिव म्हणजे जे अस्तित्वात नाही; जे अनंतात विलीन झालेले आहे. असे जे अस्तित्वात नाही ते सर्वाचे मूळ आहे. म्हणजे अनंत अमर्याद सर्वेश्वर. शंभो हि किल्ली आहे, एक मार्ग. तुम्ही त्याचा उच्चार जर तल्लीन होऊन तुमचे शरीर भग्न होई पर्यंत केलात तर एक मार्ग निर्माण होईल. या सर्वावर मात करून तुम्हाला तिथे पोचायचे असेल तर फार वेळ लागेल. तुम्हाला जर हा मार्ग हवा असेल, जर या सर्वा पलीकडे जर तुम्हाला जायचे असेल, तर जाता येणे शक्य आहे पण यासर्वांवर प्रभुत्व मिळवून नाही तर यातून एक पळवाट काढून.
मी तरुण असताना, मैसूरच्या प्राणी संग्रहालयात माझे काही मित्र होते. रविवारी सकाळी मला २ रुपये मिळत, मग मी मासळी बाजारात एकदम आत पर्यंत जायचो तिथे मला अर्धे सडलेले मासे असायचे ते दोन रुपयात कधी २ तर कधी ३ किलो मिळायचे मिळायचे. ते एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून मी मैसूर प्राणी संग्रहालयात जायचो. माझ्या कडे एक पैसा नसायचा. प्राणी संग्रहालयाचे तिकीट त्यावेळी जर तुम्ही सरळ मार्गाने जाणार असाल तर तेव्हा एक रुपया होते. तिथे एक २ फूट उंचीचा अडसर होता तो रांगत पार करता आला तर आत फुकट जाता यायचे, मला तो रांगतपार करायला काहीच अडचण नव्हती. मग मी आत जायचो आणि माझ्या प्राणी मित्रांना ते मासे दिवस भर खायला घालायचो.
जर तुम्ही सरळ मार्गाने गेलात तर तो मार्ग खडतर आहे, खूप परिश्रम करावे लागतील.पण रांगत जाऊ शकलात तर सहज सोपे मार्ग आहेत. रांगत जाणाऱ्यांना यावर मात करण्याविषयी चिंता करण्याचे कारण नाही. जोवर तुम्हाला जगायचं आहे तोवर जगा. मृत्यू पश्चात तर हमखास अनंतात पोचता.
त्यात एक निराळे सौंदर्य आहे, अवर्णनीय सुंदरता, जे इतके साधे असूनही त्यात प्राविण्य मिळवायचे आहे. एखाद्या चेंडूला लाथ मारणे इतके काहीतरी सोपे, जे एक लहान मुल पण सहज करू शकते. पण जेव्हा एखादा त्यात प्रवीण होतो तेव्हा ते इतके देखणे होते कि अर्धे जग बसून त्याच्या फुटबॉलचा खेळ पाहू लागते. जर तुम्हाला त्यात प्राविण्य मिळवायचे असेल तर कष्ट करायला हवेत. पण तुमची रांगायची तयारी असेल तर फक्त शंभो