महाशिवरात्री साधना

महाशिवरात्री साधना ही पूर्व तयारी आहे महाशिवरात्रीची – एक दैवी शक्यतांची रात्र. 7 वर्षांवरील कोणीही व्यक्ती ह्या साधनेत भाग घेऊ शकतात.

साधनेचे दिनांक:

साधना वेगवेगळ्या कालावधीसाठी असू शकते. तुम्ही महाशिवरात्रीपर्यन्त सलग 40, 21, 14, 7 किंवा 3 दिवस साधना करू शकता.

 • 40 days: Jan 21st
 • 21 days: Feb 9
 • 14 days: Feb 16
 • 7 days: Feb 23
 • 3 days: Feb 27

जर महाशिवरात्रीला सांगता करणे शक्य नसेल, तर ही प्रक्रिया पुढील अमावास्येच्या आधी योग केंद्रात पूर्ण करावी.

दैनंदिन साधना प्रक्रिया:

साधनेची दैनंदिन प्रक्रिया खाली नमूद केलेली आहे:

 • रिकाम्या पोटी शिव नमस्काराची बारा आवर्तने करा. त्यानंतर तीन वेळा सर्वेभ्यो चा उद्घोष करा. असे सूर्यादयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिवसातून एकदा करायचे आहे.

सर्वेभ्यो मंत्र :

आssम सर्वेभ्यो देवेभ्यो नमः
(आम्ही दिव्य शक्तींना वंदन करतो)
आssम पंच भुताय नमः
(आम्ही पंच महाभूतांना वंदन करतो)
आssम श्री सद्गुरुवे नमः
(आम्ही आद्य गुरूंना वंदन करतो)
आssम श्री पृथ्वीयेय नमः
(आम्ही पृथ्वीमातेला वंदन करतो)
आssम आदि योगीश्वराय नमः
(आम्ही आदि योगीना, योगाच्या मुळ स्रोताला वंदन करतो)
आssम आssम आssम

 • काळ्या मिरीचे आठ ते दहा दाणे 2-3 कडूलिंबाच्या पानासोबत मधात, आणि मूठभर शेंगदाणे पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. शिवनमस्कार आणि सर्वेभ्यो मंत्र म्हणून झाल्यानंतर पाने चावून खा, लिंबाच्या रसात काळी मिरी मिसळून ते शेंगदाण्यासोबत खा. कडूलिंबाची पाने उपलब्ध नसतील तर Ishalife.com. या संकेतस्थळावर पानांची भुकटी उपलब्ध आहे. हे खाण्यापूर्वी आपली शांभवी महामुद्रेसारखी नियमित साधना पूर्ण करा.
 • शिव नमस्काराच्या सरावासाठी काही सूचना:
  • गर्भवती महिलांनी शिवनमस्कार घालू नयेत.
  • महिला त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसात शिवनमस्कार घालू शकतात
  • हर्नियाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी शिवनमस्कराच्या विविध सुधारित आवृत्ती उशी किंवा खुर्चीचा आधार घेऊन कराव्यात.
 • सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा तेलाचा दिवा लावावा. दिवा उपलब्ध नसेल तर आपण मेणबत्ती वापरू शकता.
 • योग योग योगेश्वरायचा हा मंत्र सकाळी बारा आणि संध्याकाळी बारा वेळा दिवा प्रज्वलित केल्यावर करावा. 40 मिनिटांच्या सांध्याकालात ही साधना करणे सर्वोत्तम. ‘सूर्योदयाआधी 20 मिनिट ते सुर्योदयानंतर 20 मिनिट’ आणि ‘सुर्यास्ताआधी 20 मिनिट ते सुर्यास्तानंतर 20 मिनिट’ हे दोन महत्वाचे सांध्याकाल आहेत

योग योग योगेश्वर जप:

योग योग योगेश्वराय
भूत भूत भुतेश्वराय
काल काल कालेश्वराय
शिव शिव सर्वेश्वराय
शंभो शंभो महादेवाय

साधना मार्गदर्शक सूचनावली:

साधनाकाळात आवश्यक काही मार्गदर्शक सूचना खाली दिलेली आहेत.

 • दिवसातून फक्त दोनदाच अन्नग्रहण करा. पहिले भोजन दुपारी 12:00 नंतर घेतले पाहिजे.
 • त्याअगोदर भूक लागल्यास आपण काळी मिरी-मध-लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करून पिऊ शकता.
 • धूम्रपान, मद्यपान आणि मांसाहार टाळा.
 • पुरुषांनी उजव्या भुजेवर, आणि महिलांनी डाव्या भुजेवर एक छोटे काळे कापड बांधणे आवश्यक आहे. आपण कोणतेही काळे कापड वापरू शकता परंतु ते 12 इंच लांब आणि 1 इंच रुंदीचेअसावे. साधनेत सहभागी होणार्‍या व्यक्तींनी आपले काळे कापड आपण स्वतःच सोबत आणायचे आहे.
 • केवळ पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करा.
 • कृपया दिवसातून दोन वेळा हर्बल पावडर वापरुन स्नान करा. ही हर्बल पावडर ईशा शॉपी स्टोअर्समध्ये उपलब्धआहे. अधिक महितीसाठी +91-9442645112 या क्रमांकावर संपर्क साधा.
 • शरीराच्या खालील भागांवर विभूती लावा: अग्न – भुवयांच्या मध्ये, विशुद्धी – गळ्याखालच्या किंचित खोलगट भागात, अनाहत – छातीवर दोन्ही बरगड्यां जिथे मिळतात, त्याच्या किंचित खाली, आणि मणीपूरक – बेंबीच्या किंचित खाली.

साधनेची सांगता:

साधनेची सांगता महाशिवरात्रीला होईल. सांगता प्रक्रिया ध्यानलिंगाच्या प्रतिमेसमोर ईशा योग केंद्र किंवा घरी करता येईल.
ही प्रक्रिया खालील प्रमाणे आहे:

 • जागरूक अवस्थेत असणे, म्हणजे रात्रभर जागे असणे आवश्यक आहे.
 • योग योग योगेश्वर हा जप 112 वेळेस करा.
 • अन्नाची किंवा पैशांची गरज असलेल्या 3 लोकांना काहीतरी अर्पण करा.
 • ध्यानलिंगावर पाच पाने असलेली बिल्वपत्रे/ कडूलिंबाची पाने अर्पण करा.
 • आपल्या हातातील काळे कापड सोडा आणि ते ध्यानलिंगासमोरील नंदीजवळ बांधा. ज्या व्यक्ती ही क्रिया स्थानिक ईशा केंद्र अथवा आपल्या घरामध्ये करणार आहेत, त्यांनी साधनेची सांगता झाल्यानंतर काळे कापड जाळून त्याची राख आपल्या हातांवर आणि पायांवर लावावी.
 • जर सांगता प्रक्रिया घरी पार पाडली जात असेल, तर आपण ध्यानलिंगाची ही प्रतिमा डाऊनलोड करून घेऊ शकता.

MSR at home culmination dhyanalinga-photo

महाशिवरात्री साधनेबद्दल मदत हवी असणाऱ्या साधकांनी खाली आपले नांव नोंदवावे!

 • महाशिवरात्रीवरचे लेख आणि व्हिडियोज पहा
 • ईशा योगा केंद्रामध्ये महाशिवरात्रोत्सव सोहळ्याच्या ताज्या बातम्या आणि घडामोडी
 • Join us through a live webstream