तपस्वी दुरी
अढळ पवित्रा
दुर्लक्ष तो नाही करू शकला
त्या हे सगळं झेलणाऱ्यांकडे
मोडला त्याचा ठाम पवित्रा
प्रखर या साधकांनी
नव्हती आकांक्षा स्वर्गाची
अलौकिक त्या सप्तर्षींना
झगडत होते मार्गासाठी
स्वर्ग नरकाच्या पल्याड सगळ्यांना नेण्यासाठी
नाही तो थांबवू शकला आपली कृपा
मानवांच्या उद्धारासाठी झगडणाऱ्या त्यांना पाहून
कटाक्ष टाकण्यासाठी मानवांकडे
दक्षिणेकडे वळवले त्याने पवित्र मुख
केवळ ते अलौकिक मुखच नाही
तर कृपावर्षावही झेलला त्यांनी
प्रवाहित झाला अनादी जसा
ज्ञानामध्ये सप्तर्षी न्हाऊन निघाले
जगाला सोडवण्यासाठी
शापित पाशातून
आजही ते पवित्र ज्ञान प्रवाहित आहे
थांबणार नाही आपण ते प्रत्यके कीटकापर्यंत पोहोचल्याशिवाय