logo
logo

महाशिवरात्रीची 5 तथ्ये

महाशिवरात्रीची 5 तथ्ये

या वर्षीचा महाशिवरात्रीचा उत्सव 13 फेब्रुवारीला ईशा योग केंद्रात साजरा केला जाईल. या उत्सवाच्या तयारी म्हणून, प्रचंड आध्यात्मिक संधी प्रदान करून देणार्‍या या रात्रिविषयी आम्ही पाच तथ्ये तुमच्यासमोर मांडत आहोत.

#1 मानवी शरीरात ऊर्जेचा नैसर्गिक उद्रेक झालेला असतो

सद्गुरु:: प्रत्येक चंद्र महिन्यातील 14 वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. या दिवशी मानवी शरीरात ऊर्जेचा नैसर्गिक उद्रेक झालेला असतो. भारतीय कालगणनेनुसार माघ महिन्यात (फेब्रुवारी/मार्च) येणार्‍या शिवरात्रीला महाशिवरात्र असे म्हटले जाते कारण विशेषतः या दिवशी आपल्यातील ऊर्जा वाढविण्यासाठी निसर्गाकडून मदत होते. योगाची संपूर्ण प्रणाली आणि आध्यात्मिक प्रक्रिया मनुष्याला मर्यादित व्यक्तीतून अमर्याद करण्याविषयी आहे. आणि ही प्रगती घडवून आणण्यासाठी; सर्वात मूलभूत प्रक्रिया म्हणजे आपल्या आतील ऊर्जेला सक्रीय करून, तिला वरच्या दिशेने प्रवाहित करणे. म्हणूनच ज्या लोकांना; ते आज जे आहेत त्यापेक्षा जरा अधिक काहीतरी होण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी शिवरात्री महत्वाची आहे, आणि महाशिवरात्री तर अतिशय महत्वाची आहे.

#2 वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या गोष्टी सूचित करते

सद्गुरु:महाशिवरात्र अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आहे. ज्या व्यक्ती कौटुंबिक परिस्थितीत आहेत, त्या व्यक्ती महाशिवरात्र ही शंकरच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. योगी लोकांसाठी, शंकर आज कैलासा पर्वताशी एकरूप झाले, म्हणजे ते अचलेश्वर बनले आणि पर्वतात विलीन झाले. हजारो वर्षांच्या ध्यानधारणेनंतर ते पर्वतासमान स्थिर बनले आणि त्याचाच एक अविभाज्य अंग बनले, आपले सर्व ज्ञान त्याने कैलास पर्वतात सुरक्षित जपून ठेवले. म्हणून योगीलोक महाशिवरात्रीला स्थैर्याचा दिवस मानतात. जगातील महत्वाकांक्षी लोक या दिवसाकडे शिवाने त्याच्या सर्व शत्रुंवर मात केलेला दिवस म्हणून पाहतात.

#3 संपूर्ण रात्र पाठीचा कणा ताठ ठेवल्याने कित्येक संधी निर्माण होतात

सद्गुरु: पौराणिक कथा काहीही असल्या तरीही, या दिवसाचे महत्व हे आहे की ह्या दिवशी मानवी शरीरात ऊर्जेचा वरच्या दिशेने जबरदस्त प्रवाह होतो. म्हणून ही रात्र आपण जागृत, सजग राहून आपला पाठीचा कणा ताठ ठेऊन उभा ठेवून; म्हणजे आपण जी काही साधना करतो आहोत, तिला निसर्गाकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळेल. मानवी जीवनातील सर्व उत्क्रांती मूलभूतरित्या उर्जा वरच्या दिशेने प्रवाहित झाल्यामुळे आहे. आध्यात्मिक साधक करत असलेला प्रत्येक सराव, प्रत्येक साधना म्हणजे त्याची ऊर्जा वरच्या दिशेने ढकलणे होय.

#4 संगीत आणि नृत्याचा रात्रभर चालणारा उत्सव म्हणून साजरी केली जाते

सद्गुरु: ईशा योग केंद्रात रात्रभर साजरा केला जाणार्‍या या नाट्यमय उत्सवाचा अनुभव घेण्यासाठी तेथे आदर्श वातावरण आहे. नामवंत कलाकारांनी सादर केलेल्या कलांसोबतच विशेष ध्यानधारणा कार्यक्रमाकडे लक्षावधि लोक सहभागी होतात. सद्गुरूंच्या उपस्थितीत; हा अतुलनीय दिव्य महोत्सव ह्या दैवी रात्रीच्या अनेक आध्यात्मिक संधी खुल्या करतो. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संगीत कलाकारांनी सादर केलेल्या कार्यक्रमांसोबत विविधरंगी संस्कृतिक कार्यक्रम आणि ईशाचा स्वतःचा संगीत बॅंड यामुळे कार्यक्रमाची रंगत रात्रभर वाढतच जाते.

#5 सद्गुरूंच्या उपस्थितीत पंचभूत आराधना केली जाते.

पाच तत्वे किंवा पंच भुते भौतिक शरीरासह सर्व सृष्टी निर्मितीचा आधार आहेत. मानवी शरीर प्रणालीमधील पाच तत्वे शुद्ध करून शरीर आणि मनाचे स्वास्थ्य निर्माण केले जाऊ शकते. ही प्रक्रिया शरीर एक अडथळा बनण्याऐवजी उत्तम स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी शरीराला योग्य आकार देण्याची पायरी म्हणून सुद्धा काम करते. भूत शुद्दी, म्हणजेच तत्वांचे शुद्धीकरण या नावाची एक संपूर्ण योग प्रणाली आहे. पंचभूत आराधनेद्वारे सद्गुरु भक्तांसाठी या सखोल योग विज्ञानाचा फायदा घेण्याची अद्वितीय संधी निर्माण करतात जे मिळविण्याठी अन्यथा कठोर साधनेची आवश्यकता भासली असती.

    Share

Related Tags

आदियोगी

Get latest blogs on Shiva

Related Content

सर्वस्व अर्पण केलेला संतकवी। शिव भक्तांचा शोध