लिंग या शब्दाचा अर्थ म्हणजे आकार आहे. आपण त्याला आकार असे संबोधित करत आहोत कारण जेव्हा निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा त्यानी प्रथम लंबवर्तुळाकार घेतला. एक दोष विरहित आणि परिपूर्ण लंबगोल आकाराला आपण लिंग म्हणतो. सृष्टी ची सुरुवात नेहमीच लंबवर्तुळाकार किंवा लिंग आकारात झाली आणि नंतर तिचे विविध प्रकार बनले. आणि आपल्याला हे अनुभवातून माहिती आहे जेव्हा तुम्ही खोल ध्यानाच्या अवस्थेत जाता, तेव्हा पुन्हा एकदा ती ऊर्जा एका लंबगोलाचे किंवा लिंगाचे स्वरूप धारण करते. तर आदी आणि अंत दोन्हीचा आकार लिंग आहे.
तु आहेस पहिला
वैश्विक शून्यतेची पहिली अभिव्यक्ती
शहाण्यांनी तुझ्यावर नजर ठेवली
या सर्व सजीव खोड्यांचा मूळ स्त्रोत होण्यासाठी
तु आहेस सर्व दुःख आणि आनंदाचा स्रोत
तु आहेस सर्वात खोल आणि सर्वोच्च
अरे , तु खेळत असलेलला डाव
अनेक रूपं ज्यांचा तू स्त्रोत आहेस
जी ही नाहीत किंवा ती नाहीत
या निर्मितीत भटकलो मी
स्वतःला आणि तुला शोधण्यासाठी
हे ईशाना सर्वात गौरवशाली रूपा
ईशा तुझे निवासस्थान म्हणून धन्य आहे
– सद्गुरू
“आवश्यक तंत्रज्ञानाने साधी जागा आणि दगडाचा एक तुकडा या वस्तूंना पण एकदैवी उल्हास बनवता येतं. ही अपूर्व गोष्ट म्हणजेच प्राणप्रतिष्ठापना.”- सद्गुरू
जर तुम्ही मला एखादी वस्तू दिली उदाहरणार्थ, कागदाचा तुकडा तर, मी त्याला खूप शक्तिशाली बनवू शकतो आणि ते तुम्हाला परत देऊ शकतो. मी स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर तुम्ही तो धरलात तर तुम्हाला फरक जाणवेल परंतु, तो कागद ही ऊर्जा टिकवून ठेवण्यास सक्षम नाही. परंतु जर एक योग्य लिंगाचा आकार तयार केला तर ते ऊर्जेचे कायमस्वरूपी भंडार असेल. तुम्ही फक्त एकदा त्याला ऊर्जेने भरले कि ते कायमस्वरूपी तसेच राहते.
सामान्यतः, स्थापना ही मंत्र पूजा आणि इतर काही प्रकाराच्या प्रक्रियेद्वारे केली जाते. जर मंत्रांनी प्राणप्रतिष्ठापना केली असेल तर देवतेला जिवंत ठेवण्यासाठी दररोज पूजा आणि देखभाल होणे आवश्यक आहे.
पण प्राणप्रतिष्ठापन असे नाही. मंत्र किंवा पूजेशिवाय, एखाद्या आकाराची जीवनशक्तीच्या मदतीने प्राणप्रतिष्ठापना केली तर ती कायमस्वरूपी अस्तित्वात राहते, आणि त्याला देखभालीची गरज भासत नाही. म्हणूनच ध्यानलिंगा मध्ये कोणतीही पूजा होत नाही त्याची काळजी घेण्याची गरज नाही, ते जीवनशक्तीने प्राणप्रतिष्ठापीत केलेले आहे आणि ते कायम तसेच राहील. जरी तुम्ही त्या लिंगाचा दगड काढून टाकला तरी त्यात तीच शक्ती असेल जरी संपूर्ण जग संपले तरी ते रूप तसेच राहील.
लिंग बनवण्याची प्रक्रिया ही एक खूप मोठी अनुभवाची शक्यता आहे, आणि हजारो वर्षांपासून ही उपलब्ध आहे. परंतु गेली आठशे-नऊशे वर्ष विशेषतः जेव्हा भक्तीने देशाला व्यापला तेव्हा मंदिर बांधण्याचे शास्त्र राहिले नाही. एखाद्या भक्तासाठी त्याच्या भावने पेक्षा काहीही महत्त्वाचे नसते. भावना हा त्याचा मार्ग आहे. भावनांच्या सामर्थ्याने तो सर्व काही करतो. मग त्यांनी विज्ञान बाजूला ठेवून आवडेल त्या मार्गाने मंदिरे बनवायला सुरुवात केली. हे म्हणजे प्रेम प्रकरण आहे, बरोबर? भक्त त्याला पाहिजे ते करू शकतो. त्याच्यासाठी सगळं काही ठीक आहे कारणत्याच्याकडे फक्त भक्तीची शक्ती आहे. त्यामुळे लिंग बनवण्याच्या प्रक्रियेचे ज्ञान कमी झाले आहे. खरतर ते खूप खोल विज्ञान आहे. हे व्यक्तिनिष्ठ विज्ञान आहे म्हणूनच ते कधीही कुठेही लिहिलेले किंवा संग्रहित केलेले नाही. जर लिहिले असते तर त्याचा पूर्णपणे गैरसमज होण्याची शक्यता असते. बहुतेक लिंग कोणत्याही विज्ञानाच्या माहितीशिवाय \तयार केलेली आहेत.
सद्गुरु: ऊर्जा प्रणाली मध्ये चक्र ही अशी जागा आहे जेथे प्राणनाडींच्या एकत्र येऊन ऊर्जेचे भोवरे तयार करतात. एकूण ११४ चक्र आहेत परंतु जेव्हा आपण सर्वसाधारणपणे चक्र म्हणतो तेव्हा आपण त्यापैकी फक्त ७ सर्वात महत्त्वाच्या चक्रांचा उल्लेख करतो, जी सात चक्र जीवनातील सात पैलू दर्शवतात. ते शरीरातील सात मोठ्या चौकां सारखे आहेत.
सध्या भारतातील बहुतेक लिंग केवळ १ किंवा २ चक्रांचे प्रतिनिधित्व करतात. ईशा योग केंद्रातल्या ध्यानलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे सातही चक्र पूर्णपणे ऊर्जित आहेत आणि उच्च स्तरावर आहेत. हे सर्वोच्च रूप आहे , कोणत्याही परिस्थितीत तुम्ही ऊर्जा उच्च स्तरावर नेल्यास, ती केवळ थोड्या काळासाठी टिकू शकते. त्यानंतर ती निराकार होते. जर तिला आकार नसेल तर लोकांना ती जाणवू शकत नाही. उर्जेला ज्या बिंदूनंतर आकार राहत नाही , त्या स्तरापर्यंत पोचवून मग ती तिथेच त्याच स्थितीत ठेवणे – अशाप्रकारे ध्यानलिंगाची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे.
योगा मधील सर्वात मूलभूत साधने म्हणजे भूत शुद्धी. पंचभूत हे निसर्गातील पाच घटक आहेत. तुम्ही जर स्वतःकडे पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचे शरीर हे पाच घटकांनी बनलेले आहे- पृथ्वी, अग्नी, वायू, पाणी आणि आकाश. हे भौतिक शरीर तयार करण्यासाठी ते एका विशिष्ट मार्गाने एकत्र येतात. या भौतिकतेच्या आणि पंचभूतांच्या पलीकडे जाणे म्हणजेच अध्यात्मिक प्रक्रिया आहे. तुम्ही अनुभवलेल्या प्रत्येक गोष्टीवर या पाचही घटकांची मोठी पकड आहे. यांच्या पलीकडे जाण्यासाठी योगाच्या मूलभूत प्रक्रियेमध्ये भूतशुद्धि चा समावेश आहे. प्रत्येक मूलभूत घटकांपासून मुक्त होण्यासाठी एक विशेष प्रक्रिया आहे.
दक्षिण भारतात पंचभूतांच्या प्रत्येक घटकाचे वेगवेगळे मंदिरे बांधले आहेत. पाण्याच्या घटकासाठी तुम्हाला साधना करायची असल्यास तुम्ही थीरुवनाईकवल ला जावा. आकाशाच्या घटकाबद्दल साधना करण्यासाठी चिदंबरम येथे जावा, वायूसाठी कलाहस्ती , पृथ्वी साठी कांचीपुरम आणि अग्नी साठी थिरुवंनमालाई.
ही मंदिरे उपासनेसाठी नव्हे तर साधनेसाठी तयार केली गेली होती.
सद्गुरु:
भारतीय संस्कृती ही जगातील काही संस्कृतींनी पैकी एक आहे ज्यात हजारो वर्ष संपूर्ण समाज मानवाच्या अंतिम कल्याणकडे एकाग्र होता. जर तुमचा जन्म भारतात झाला असेल तर तुमचे आयुष्य फक्त तुमचा व्यवसाय, तुमची बायको, तुमचा नवरा, तुमचे कुटुंब याबद्दल नसते . हे जीवन फक्त मुक्ती साठी होते. संपूर्ण समाजाची रचना आशी होती.
या संदर्भात, या संस्कृतीमध्ये विविध सामर्थ्यवान साधने तयार केली. त्याच दिशेने ज्योतिर्लिंगां सारखी शक्तिशाली साधने तयार केली गेली. अशा शक्तिशाली स्वरूपांच्या उपस्थित राहणे हा एक शक्तिशाली अनुभव आहे.
ज्योतिर्लिंगांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे कारण ते केवळ मानवी क्षमतेनेच नव्हे तर एका विशिष्ट प्रकारे नैसर्गिक शक्तीच्या सहकार्याने निर्मित केले आहे. फक्त बारा ज्योतिर्लिंग आहेत. ती विशिष्ट भौगोलिक आणि खगोलशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण जागेवर आहेत. हे बिंदू या सृष्टीतील विशिष्ट शक्तीशी संबंधित आहेत. फार पूर्वी, विशिष्ट स्थरावरील आकलन असलेल्या लोकांनी अतिशय काळजीपूर्वक, खगोलीय हालचालींचा करून या क्षेत्रांची निवड केली आणि हे बिंदू निर्धारित केले.
त्यातील काही ज्योतिर्लिंग “जिवंत ” नाहीत, परंतु त्यापैकी बरीच अजूनही शक्तिशाली साधने आहेत.
शि-व याचा शाब्दिक अर्थ “जे काही नाही ते” किंवा “काही-नाही”. हे मधले संयोगचिन्ह महत्त्वाचे आहे. या सर्व निर्मितीचा उगम विशाल शून्याच्या उदरातून झाला आहे. ९९% पेक्षा अधिक अणू आणि ब्रम्हांड म्हणजे केवळ शून्यता. काल, हा एक शब्द वेळ आणि जागेसाठी वापरला जातो आणि शिवाचे एक रूप आहे कालभैरव. कालभैरव म्हणजे अंधाराची एक चैतन्यशील स्थिती, परंतु जेव्हा तो पूर्णपणे स्थिर होतो, तेव्हा तो महाकाल बनतो- एक परमोच्च कालयंत्र.
उज्जैन मधील महाकाल मंदिर एक आश्चर्यकारकपणे प्राणप्रतिष्ठा केलेली जागा आहे. हे सामर्थ्यवान स्वरूप दुर्बल मनासाठी नक्कीच नाही. हे शक्तिशाली आणि शुद्ध रुपातलं हे लिंग , परमोच्च विलिनता ज्याला आपण कालाचा नाश म्हणतो ते शोधणाऱ्या सर्वांसाठी उपलब्ध आहे
जगातील कुठलीही अध्यात्मिक प्रक्रिया शारीरिक मर्यादा ओलांडण्याविषयी असते कारण, एखादा आकार चक्रांच्या अधीन असतो. म्हणूनच अज्ञानाचा विध्वंसक म्हणून कालभैरवा कडे पाहिले जाते : तो जो सगळ्या जन्म आणि मृत्यूच्या, असण्या आणि नसण्याच्या अनिवार्य चक्रांना मोडून टाकतो.
असा कोणीही ज्ञानी मनुष्य नव्हता जो शिव बद्दल बोलला नाही, कारण शिव हे मर्यादितपैलूंच्या पलीकडे किंवा भौतिकतेच्या पलीकडे होते. फरक फक्त इतकाच आहे की त्यांनी त्यांच्या प्रदेशाची भाषा आणि प्रतीकात त्यांना व्यक्त केले.
पण , गेल्या १५०० वर्षात जगभरात धर्म पसरवण्याच्या अत्यंत आक्रमक पद्धतींमुळे, प्राचीन मेसोपोटेमियन संस्कृती, मध्य आशियाई संस्कृती आणि उत्तर आफ्रिकन संस्कृती यासारख्या भूतकाळातील बऱ्याच मोठ्या संस्कृती नाहीश्या झाल्या आहेत. म्हणून आता ते फारसे दिसून येत नाही, परंतु जर आपण इतिहासात सखोल पाहिले तर ते सर्वत्र होते. तर, एक प्रकारे गूढ विज्ञान प्रत्येक संस्कृतीत उपस्थित असायचे. परंतु गेल्या १५०० वर्षांत ते मोठ्या प्रमाणात जगाच्या इतर भागांनी गमावले.
नैसर्गिकरित्या तयार झालेल्या लिंगांना स्व-निर्मित किंवा स्वयंभू लिंग असे म्हणतात. उत्तर जम्मू राज्यातील अमरनाथ येथे एक गुहा आहे. गुहेच्या आत, दरवर्षी बर्फाचे एक शिवलिंग तयार होते. लिंग गुहेच्या छतावरुन ठिबकणाऱ्या पाण्याच्या थेंबांपासून नैसर्गिकरित्या तयार होते. गुहेच्या छतातून पाण्याचे थेंब हळू हळू पडतात, तेव्हा त्यांचे रूपांतर बर्फात होते, हे पाहणे जवळजवळ जादूईच असते.
काही लिंग खडक, लाकूड किंवा रत्नांमधून कोरलेले असतात; माती, वाळू किंवा धातूपासून बनविलेली इतर लिंग पण असतात. त्यांना प्रतिष्ठित लिंग म्हणतात. अनेक लिंग धातुच्या आवरणाने झाकलेले असतात आणि त्यांना एक चेहरा दिला जातो जेणेकरून भक्त त्याच्याशी जवळीक साधू शकेल. त्यांना मुखलिंग म्हणतात. काहींच्या पृष्ठभागावर शिवाची संपूर्ण प्रतिमा कोरलेली असते.
लिंग म्हणजे, पुरुषतत्व आणि स्त्रीतत्व यांचे मिलन दर्शवतात. स्त्रीतत्वाच्या पायाला गौरीपीठ किंवा अवुडयार असे म्हंटले जाते. लिंग आणि पाया म्हणजेच शिव आणि शक्ती, पुरुषतत्व आणि स्त्रीतत्व शक्ती यांचे एकत्रीकरण दर्शवितात.
योगामध्ये वर्णन केलेली उर्जा स्थिती पाच इंद्रियांमध्ये नसल्यामुळे, हे आंतरिक अनुभव प्राप्त करण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक आहे. बरेचशे संबंध हे शारीरिक, मानसिक आणि भावनिक जोडांवर आधारित असतात. पण गुरु-शिष्यांची संगती अभूतपूर्व आहे. कारण ते उर्जेवर कार्य करते.
आधुनिक विज्ञान, जे पूर्णपणे इंद्रियांवर अवलंबून असते आणि सर्व प्रकारच्या संशोधनासाठी प्रयोग किंवा तर्कसंगत पद्धतींचा अवलंब करते, यातून ते मानवी मनाच्या सर्वसाधारण शक्तींपुरतेच मर्यादित आहे. आधुनिक शैक्षणिक व्यवस्था याचेच अनुकरण करत आहे, ज्यात व्यक्तीच्या आकलन क्षमतेकडे दुर्लक्ष होते. अशा वातावरणात, गुरूंच्या तार्किकतेच्या पलीकडे जाणाऱ्या अंतर्दृष्टी बद्दल बर्याच शंका येतात. तरीही, इतिहासातुन कळते कि, साधक वेळोवेळी अंतर्ज्ञानाने एखाद्या गुरूकडे आकर्षित होतात. या अध्यात्मिक मार्गदर्शनाची तहान भागवण्यासाठी काही ज्ञानी गुरूंनी आपली उपस्थिती आणि ऊर्जेचे प्रतिबिंब असणारी केंद्रे स्थापन केली आहेत.
ध्यानलिंग म्हणजे गुरूची उत्कृष्ट अभिव्यक्ती आहे. हे योग विज्ञानाचे सार आहे, जे त्याच्या आंतरिक ऊर्जांच्या शिखराची अभिव्यक्ती आहे.
कथा अशी आहे की, एकदा ब्रह्मा आणि विष्णूला अग्नीचा मोठा स्तांभ दिसला. त्या असीमित तेजोमय स्तंभातून एक ध्वनि उमटत होता- ओम. आश्चर्यचकित झालेल्या त्या दोघांनीही त्याचा शोध घेण्याचे ठरवले. हंसाचं रूप घेऊन ब्रम्हा त्या स्तंभा चे शिखर शोधण्यासाठी निळ्या आकाशात उडून गेले. वराह रूपात, विष्णू त्याचा पाया शोधण्यासाठी विश्वाच्या खोल खोदु लागले.
दोघेही अयशस्वी झाले, कारण तो वैश्विक स्तंभ म्हणजे स्वतः शिव होते. जे अपरिमीत आहे, त्याला कोणी मोजू शकतो का? जेव्हा विष्णू परत आले तेव्हा त्यांनी स्वतः चा पराभर स्वीकारला. परंतु ब्रम्हा स्वतःचे अपयश कबूल करण्यास तयार नव्हते, त्यांनी त्या स्तंभाचे शिखर गाठले, असे ते खोटे बोलले. आणि त्याचा पुरावा म्हणून, त्यांनी एक पांढरे केतकीचे फुल दाखवले, जे त्यांना त्या शिखरावर सापडले असे त्यांनी सांगितले.
हे खोटं ऐकल्यावर, शिव हे आदियोगी ( पहिले योगी) रूपात प्रकट झाले. दोन्ही देव त्यांच्या चरणाशी नतमस्तक झाले. ब्रह्मदेवांच्या खोटेपणाने, त्यांची उपासना करण्यास ते अपात्र असल्याचे शिवाने घोषित केले. या खोटेपणा मध्ये फुलानेही साथ दिल्यामुळे त्या फुलानेदेखील शिवाची कृपा गमावली. आदियोगी यांनी यापुढे केतकीचे फुल अर्पण म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. मात्र महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी त्याला अपवाद आहे. आजही, फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी पांढऱ्या केतकी ची फुलं शिवला अर्पण करतात, ती रात्र जी सखोल अध्यात्मिक संभाव्यतेची रात्र मानली जाते.
“ध्यानलिंगा च्या क्षेत्रात फक्त काही मिनिटं शांत बसणे पुरेसे आहे, ज्यांना ध्यान काय आहे हे माहित नाही, ते लोकं देखील सखोल ध्यानधारणेची स्थिती अनुभवू शकतात.”
– सद्गुरु
संस्कृत मध्ये “ध्यान” म्हणजे “चिंतन” आणि “लिंग” म्हणजे “आकार”. सद्गुरूंनी स्वतः च्या प्राणशक्तीचा उपयोग, प्राणप्रतिष्ठापनेच्या रहस्यमय प्रक्रियेद्वारे, ध्यानलिंगाला सर्वोच्च ऊर्जा स्तरावर स्थापित करण्यासाठी केला आहे. या प्रक्रियेद्वारे ७ चाक्रांना ( शरीरातील सात प्रमुख ऊर्जाकेंद्र), ऊर्जेच्या अत्यंत उच्च शिखरावर नेऊन, ध्यानलिंगात स्थापित केले. जेणे करून ते सर्वोच्च आणि सर्वाधिक विकसित झालेल्या प्रणमयकोशा सारखे बनले आहे.
कोणत्याही प्रकारची पूजा किंवा प्रार्थनेची आवश्यकता नसलेले हे ध्यान क्षेत्र, सर्व धर्मांना एकाच स्त्रोतातून जन्मलेले म्हणून ओळखते.
तू आहेस माझ्या गुरुंची इच्छा
माझा एकमेव ध्यास
माझ्या स्वप्नांमध्ये आणि जागेपणामध्ये
माझी फक्त तळमळ तुला पूर्ण करण्याची होती
मनुष्याने करावे असे किंवा नाही
काहीही करण्यास तयार होतो
स्वत: ला अर्पण करण्यास तयार आणि
गरज भासल्यास आणखी शंभर जन्मांनादेखील
आता इथे तू घडलास
हे तेजस्वी,
तुझी महिमा आणि कृपा
झोपलेल्याना हलवून
जागृत आणि प्रकाशीत करो
आता तू घडला आहेस
आणि आयुष्य ही सुंदर भेट अजूनही माझ्याकडे आहे
मी स्वत:चे काय करू?
खूप काळ उंच शिखरे जगलो
आता वेळ आहे जीवनाच्या दऱ्यांमध्ये विहरण्याची.
– सदगुरु