आदियोगींचे महत्त्व हे आहे की त्यांनी मानवी चेतना विकसित करण्यासाठी अशा पद्धती दिल्या ज्या कुठल्याही काळाशी सुसंगत आहेत - सद्गुरू
सद्गुरूंनी रचलेला योग योग योगेश्वराय हा मंत्र हा आदियोगी – पहिले योगी – यांच्या मानवतेसाठी केलेल्या अद्वितीय अशा योगदाना प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. मानवी मन ज्याची अनुभूती घेऊ शकतो आणि त्यापलीकडच्या सर्व शक्यता सामावून घेतील इतकी शिवाची असंख्य रुपे आहेत. त्यातील ५ मूलभूत रूपे आहेत योगेश्वर, भूतेश्वर, कालेश्वर, सर्वेश्वर आणि शंभो. Learn More…
या मंत्राचा जप केल्याने शरीरात ‘उष्णा’ किंवा उष्णता निर्माण होते जी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
योग योग योगेश्वराय
भूत भूत भूतेश्वराय
काल काल कालेश्वराय
शिव शिव सर्वेश्वराय
शंभो शंभो महादेवाय
“माझा नमस्कार,
“योगेश्वर ज्याने सर्व भौतिक मर्यादा पार केल्या आहेत,
भूतेश्वर ज्याने पंचमहाभूतांवर प्रभुत्व मिळवलेलं आहे,
कालेश्वर ज्याने काळावर आणि काळाच्या आवर्तनांवर विजय मिळवला आहे,
सर्वेश्वर जो सर्व सृष्टीत आहे आणि सृष्टीच्या निर्मितीचा पाया आहे,
त्या शंभोला नमस्कार, जो सर्वश्रेष्ठ, महादेव आहे. ”