logo
logo

शिव-शंकर सगळ्यात अदभूत का आहेत याची ५ कारणे!

लहान मुलं, तरुण, गृहस्थ किंवा भिक्षू सगळ्यांनाच शिव-शंकर आवडतो. तर शिव-शंकर एवढा जबरदस्त का आहे याची पाच कारणे:

शिव-शंकर सगळ्यात अदभूत का आहेत याची ५ कारणे!

लहान मुलं, तरुण, गृहस्थ किंवा भिक्षू सगळ्यांनाच शिव-शंकर आवडतो. तर शिव-शंकर एवढा जबरदस्त का आहे याची पाच कारणे:

१. तो सर्वसमावेशक आहेत, तो कोणाशीही मैत्री करू शकतो.

सद्गुरु: केवळ देवच शिवाची पूजा करतात असे नाही. भूत, राक्षस आणि सर्व प्रकारचे प्राणी त्याची उपासना करतात. भूत, पिशाच, राक्षस सर्व प्राणी ज्यांना सर्वांनी नाकारले – त्यांना शिवाने स्वीकारले.

परंपरेने असे वर्णन केले आहे की, जेव्हा त्याचे लग्न झाले तेव्हा श्रीमंत, सामान्य, अनामिक असे जे कोणी होते, तो प्रत्येक जण लग्नाला आले होते. सर्व देवी-देवता, आसुर, भूत- पिशाच्च असे सर्वच आले होते. सर्वसाधारणपणे ह्या लोकांचे एकमेकात पटत नाही. पण शिवाच्या लग्नात सर्वजण हजर होते. कारण तो पशुपती म्हणजेच सर्व पशु प्राण्यांचे देव होते, म्हणून सर्व प्राणी आले. अर्थातच सर्प अशी संधी गमावणार नाही म्हणून तेही सर्व आले. पक्षी आणि कीटक सुद्धा अशी संधी गमावू इच्छित नव्हतो म्हणून तो देखील पाहुणे म्हणून आले. प्रत्येक सजीव प्राणी या लग्नाला आला होताआले.

ही कथा आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, जेव्हा आपण या व्यक्तीबद्दल बोलतो तेव्हा आपण सौम्य किंवा सभ्य माणसाबद्दल बोलत नाही, तर अशा व्यक्ती बद्दल बोलत आहोत ज्याचं जीवनाशी परिपूर्ण ऐक्य आहे. तो शुद्ध चेतना आहे, कोणताही बुरखा नाही, कधीही तोचतोचपणा नाही, नेहमीच उत्स्फूर्त, कायमचा शोधक, अविरत सृजनशील असे आहेत. तो फक्त जीवन आहे.

२. तो पुरुषोत्तम आहेत, पण स्त्रीत्वाच्या कायम जवळ.

सद्गुरु: सर्वसाधारणपणे शिव हे परम पुरुषत्वाचे प्रतिक आहेत. परंतु शिवाच्या अर्धनारीश्वर रुपात तुम्हाला दिसेल की, त्याचा अर्धा भाग हा स्त्रीचा आहे. याबद्दल एक कथा सांगतो. शिव-शंकर उल्हासित अवस्थेत होता, त्यामुळे पार्वती त्याच्याकडे आकर्षित झाली. पार्वतीने त्याला आकर्षित करण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या आणि सर्व प्रकारची मदत घेतल्यानंतर त्यांचे लग्न झाले. त्यांचे लग्न झाल्यानंतर स्वाभाविकच शिवाला त्याचा अनुभव सांगायचा होता. पार्वती म्हणाली, “तुम्ही स्वतःमध्येच लिन अश्या हर्षित अवस्थेत आहात, तसे मलाही अनुभवायचे आहे, तर मी काय करू ? मला सांगा. मी कितीही कठोर तपस्या करण्यास तयार आहे. शिव हसला आणि म्हणाला, “तुला फार काही मोठं तप करायची गरज नाही, ये आणि माझ्या मांडीवर बस.” त्याला कोणताही प्रतिकार न करता पार्वती त्याच्या डाव्या मांडीवर जाऊन बसली. ती इतकी इच्छुक होती की ती पूर्णपणे त्याला शरण गेली, शिवाने तिला आत खेचले आणि ती त्याचा अर्धा भाग झाली.

आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की, शिवाला जर पार्वतीला शरीरात सामावून घ्यायचे असेल तर त्याला स्वतःचा अर्धा भाग त्याग करणे आवश्यक होते. म्हणून शिवाने स्वतः चा अर्धा भाग त्यागून पार्वतीला सामील केले. ही अर्धनारीश्वर ची कहाणी आहे मुळात ही कहाणी आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करते की पुरुषत्व आणि स्त्रीत्व आपल्यात समान प्रमाणात विभागलेले आहे. आणि जेव्हा शिवाने पार्वतीला स्वतः त समाविष्ट केले तेव्हा तो उल्हासित झाला. तर हे सांगण्याचा इथे प्रयत्न केलाय की पुरुषत्व आणि स्त्रीत्व जर एकत्र आले तर तुम्ही कायम परमानंदाच्या स्थितीत असता. जर तुम्ही हे बाहेरून करण्याचा प्रयत्न केला तर तो कधीच टिकत नाही, आणि त्यासोबत येणाऱ्या अडचणी एखाद्या नाटकाप्रमाणे चालू राहतात.

३. तो सर्व संपवणारा नर्तक आहे

सद्गुरु: नटेश किंवा नटराज – नृत्याचा देव हे शिवाचे एक महत्वाचे रूप आहे . जेव्हा मी स्विझरलँड मधील सीईआरएन ला गेलो होतो तेथे या ग्रहावरील अणू तोडण्याची प्रक्रिया करणारी एक भौतिक प्रयोगशाळा आहे. मी पाहिले की प्रवेशद्वारासमोर एक नटराजची मूर्ती आहे कारण त्यांना हे समजले आहे की सध्या ते जे काही करत आहेत त्यासारखे मानवी संस्कृतीत यापेक्षा आणखी काही नाही. निर्मितीची उस्फूर्तता, सृष्टीचे नृत्य जिने स्वतःला चिरंतन स्तब्धतेपासून स्वतःला निर्माण केले, याचे तो प्रतिक आहे.

४. तो कायम परमानंदात असतो

सद्गुरु: शिवाचे वर्णन नेहमीच नशेत आणि त्याचवेळी तपस्वी म्हणून केले जाते. तो योगी आहे- जर तो ध्यानाला बसला तर तो हलणार नाही. आणि त्याच वेळी तो नशेत असतो. याचा अर्थ असा नाही की तो दारूच्या दुकानात जातो. योगाचे शास्त्र तुम्हाला स्थिर आणि शांत असूनही त्याचवेळी नेहमीच परमानंद स्थितित राहण्याची शक्यता देते. योगी सुखा विरुद्ध नाहीत. तो छोट्या-छोट्या सुखात समाधान मानत नाहीत. तो लोभी आहेत. त्यांना हे माहित आहे की तुम्ही आता एक ग्लास वाईन प्यायलात तर आता थोडेसे धुंद व्हाल आणि मग उद्या सकाळी डोकेदुखी आणि बरेच काही. तुम्ही नशा करूनही जर शंभर टक्के स्थिर आणि सतर्क राहू शकलात तरच तुम्हाला त्या नशेचा आनंद मिळू शकतो. तसेच निसर्गाने तुम्हाला ही संधी दिलेली आहे.

एका इस्रायली शास्त्रज्ञाने अनेक वर्षे मानवी मेंदूतल्या काही गोष्टींवर संशोधन केले, आणि त्यांना असे आढळले की आपल्या मेंदूमध्ये कोट्यावधी मादक पदार्थ ग्रहण करणाऱ्या पेशी आहेत. मग न्यूरोलॉजिस्ट ने शोधून काढले की या पेशींना तृप्त करण्यासाठी शरीर एक स्वतःचा मादक पदार्थ – म्हणजेच एक रसायन विकसित करू शकतो. आणि जेव्हा त्या पेशींच्या दिशेने जाणरे रसायन सापडले, तेव्हा त्या वैज्ञानिकांना त्याला नाव द्यायचे होते. जेव्हा त्यांनी विविध ग्रंथांवर संशोधन केले, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले की केवळ भारतीय ग्रंथांमध्येच अशा परमानंदा बद्दल उल्लेख आहे. म्हणून त्यांनी या रसायनाला ‘ आनंदामाईड’ असे म्हटले.

तर तुम्हाला फक्त आनंदामाईडचे थोडेसे उत्पादन करायचे आहे, कारण आतमध्ये गांजाची एक संपूर्ण बाग आहे. जर तुम्ही त्याची योग्य प्रकारे लागवड केली आणि जोपासना केली, तर तुम्ही नेहमीच त्या धुंदीत राहू शकाल.

५. तो सर्वात मोठा कायदे झुगारणारा

सद्गुरु: जेव्हा तुम्ही “शिव” म्हणतात तेव्हा ते धर्माबद्दल नसते. तुम्ही ज्या धर्माशी संबंधित आहात त्या आधारावर आज जग विभाजित आहे. यामुळे तुम्ही काही जरी बोललात तरी तुम्ही एखाद्या धर्माचे असल्यासारखे वाटते. हा धर्म नाही, हे आंतरिक उत्क्रांतीचे विज्ञान आहे. हे पलीकडे जाण्याबाबत आणि मुक्तीबद्दल आहे: तुमची जनुकं काय आहेत याने फरक पडत नाही, तुमचे वडील कोण होते, तुम्ही कोणत्या मर्यादांसह जन्मलात किंवा घालून घेतल्यात, याची पर्वा न करता प्रयत्न करण्यास तयार असाल तर तुम्ही त्या सर्वांच्या पलीकडे जाऊ शकता.

निसर्गाने माणसासाठी काही कायदे तयार केले आहे, त्यांना त्यामध्येच राहावे लागते. अध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे अस्तित्वात असलेल्या भौतिक नियमांचे उल्लंघन करणे. या अर्थाने आपण कायदे झुगारणारे आहोत आणि शिव हा सर्वात मोठा कायदे झुगारणारा आहे. म्हणून तुम्ही शिवाची पूजा करू शकत नाही परंतु तुम्ही त्या गटामध्ये सामील होऊ शकता.

ही महाशिवरात्र तुमच्यासाठी केवळ जागे राहण्याची रात्र बनू नये तर ती तुमच्यासाठी तीव्र जिवंतपणाची आणि जागृतीची रात्र बनू दे! माझी अशी इच्छा आणि आशीर्वाद आहे की तुम्ही निसर्गाने दिलेल्या या अद्भुत संधीचा लाभ घ्यावा. मला अशी आशा आहे की तुम्ही सर्वांनी या तेजस्वी शक्‍तीचा वापर करावा आणि जेव्हा आपण ‘शिव’ म्हणतो तेव्हा त्यातील सौंदर्य आणि परमानंद जाणून घ्यावा.

    Share

Related Tags

शिव तत्त्व

Get latest blogs on Shiva

Related Content

अव्यक्त शिव: वेलियांगिरी दक्षिणेचे कैलास कसे झाले?