logo
logo
adiyogi

शंकरांच्या तिसऱ्या डोळ्याची कथा आणि त्याचा गर्भितार्थ

सद्गुरू शंकराच्या प्रतीकात्मक असलेल्या तिसऱ्या डोळ्याचे आणि तो उघडल्यानंर स्पष्टता आणि आकलन कसे येते याचे वर्णन करतात. ते शंकराने आपल्या तिसऱ्या डोळ्याने कामदेवाचा नाश कसा केला याची कथाही सांगतात.

Sadhguru:

When Shiva Opened His Third Eye

शंकराने आपला तिसरा डोळा कसा उघडला याबाबद्दलची एक कथा आहे. भारतामध्ये कामदेव ही प्रेम आणि विषयसुखाची देवता आहे. काम म्हणजे कामवासना. कामवासनांना बरेच लोक सामोरं जाण्याचं टाळतात. तुम्हाला त्याभोवती काहीतरी डेकोरेशन हवं असतं म्हणून त्याला तुम्ही प्रेमभावनेशी जोडता. कथा अशी आहे कामदेवाने झाडामागे लपून आणि शिव-शंकराच्या हृदयात बाण मारला. शंकर थोडा विचलित झाला आणि त्यानी तिसरा डोळा उघडला जो धगधगता होता आणि त्याने कामाला जाळून खाक केले अशी कथा सामान्यपणे सगळ्यांना सांगितली जाते.

पण तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमच्या वासना तुमच्या आतून येतात की झाडामागुन ? नककीच त्या तुमच्यात जागृत होतात. वासना ह्या फक्त शरीरसुखाबाबतीतल्या नसतात. प्रत्येक इच्छा ही वासनाच असते ती कशाचीही असो शरीरसुख, शक्ती किंवा अधिकार. मुळात वासना म्हणजे आपल्यातली एक प्रकारची अपूर्णता, एक उत्कट इच्छा ज्यामुळे तुम्हाला “हे जर मिळालं नाही तर तर माझ्यात काहीतरी कमतरता राहील ” असं वाटतं.

Shiva’s Third Eye: The Yogic Dimension

तसाच या शंकर आणि काम या गोष्टीला योगाचा पैलू आहे. शंकर योगसाधना करीत होता म्हणजे तो फक्त परिपूर्ण होण्यासाठी नव्हे तर अमर्यादा होण्याच्या दृष्टीने काम करत होता. शंकरानी तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला बघितलं, त्याच्या स्वतःच्या वासना वर येताना पहिल्या आणि त्यांना जाळून टाकलं. त्याच्या शरीरातून भस्म बाहेर आलं म्हणजेच आतलं सगळं कायमचं संपवलंय . तिसरा डोळा उघडणे म्हणजे त्याच्या आतल्या अश्या पैलूचं त्याला आकलन झालं जो भौतिकतेच्या पलीकडचा आहे आणि सगळ्या भौतिक सक्ती गळून पडल्या.

What is Shiva’s Third Eye?

तिसरा डोळा म्हणजे असा डोळा जो ते बघू शकतो जे भौतिक नाही. तुम्ही स्वतःचा हात पाहू शकता कारण तो प्रकाश अडवतो आणि परावर्तित करतो. तुम्ही हवा पाहू शकत नाही कारण ती प्रकाश रोखत नाही पण त्या हवेत थोडा जरी धूर झाला तरी तुम्हाला तो दिसतो कारण तुम्हाला फक्त तेच दिसते जे प्रकाश अडवते. ज्या गोष्टीतून प्रकाश आरपार जाऊ शकतो त्या तुम्ही बघू शकत नाही. हेच डोळा या ज्ञानेंद्रियाचं स्वरूप आहे.

डोळ्यांना भौतिक गोष्टींचे आकलन होते. तुम्हाला अशा गोष्टींचे आकलन करायचंय ज्या भौतिक नाहीत तर एकच मार्ग आहे तो म्हणजे आतला. आपण जेव्हा तिसऱ्या डोळ्याबद्दल बोलतो तेव्हा ते अशा प्रतीकाबद्दल बोलतो जे आपले डोळे पाहू शकत नाहीत.

आपली ज्ञानेंद्रिये बहिर्मुख आहेत. तिसरा डोळा आंतरिक गोष्टींच्या म्हणजे तुमच्या स्वरूपाच्या आणि अस्तित्वाच्या आकलनासाठी आहे. तो म्हणजे एखादा जास्तीचा अवयव किंवा कपाळावरील भेग नाही. असा पैलू ज्यामुळे एखाद्याला भौतिकतेच्या पलीकडचे आकलन होते त्याला तिसरा डोळा म्हटले आहे.

तिसऱ्या डोळ्यातून जीवनाकडे बघणे

अजून एक दृष्टीकोन म्हणजे ज्ञानेंद्रिये पूर्वकर्मांमुळे खूपच दुषित झालेली असतात. कर्म म्हणजे पूर्वीच्या कृतींच्या शिल्लक राहिलेल्या स्मृती. तुम्ही पाहू शकणाऱ्या सगळ्या गोष्टींवर तुमच्या गतकर्माच्या स्मृतींचा प्रभाव असतो त्याला तुम्ही टाळू शकत नाही. तुम्ही कोणाकडेही पाहिलं तर हा छान, हा छान नाही, हा चांगला आहे, तो चांगला नाहीये असा विचार तुम्ही करता. जी गोष्ट आहे तशीच्या तशी तुम्ही ती पाहू शकत नाही कारण गतकर्माच्या स्मृतींचा तुमच्या दृष्टीवर आणि पाहण्याच्या क्षमतेवर प्रभाव असतो. ते तुम्हाला तेच दाखवते दाखवते जसं तुमचं कर्म असेल, जश्या तुमच्या गतस्मृती असतील.

गोष्टी जशा आहेत तशाच दिसण्यासाठी, सखोल जाऊ शकणारा डोळा उघडला पाहिजे आणि जो पूर्वग्रहदूषित नाही. परंपरेने भारतामध्ये ज्ञान म्हणजे जाडजूड पुस्तकांचे वाचन नाही , प्रवचने ऐकणे नाही किंवा फक्त माहिती संग्रहित करणे नव्हे. ज्ञान म्हणेज जीवनाबद्दल एक नवी दृष्टी किंवा अंतर्दृष्टी उघडणे. कितीही विचार आणि तत्वज्ञान यामुळे तुमच्या मनात ती स्पष्टता येणार नाही. तुमच्या तर्काने येणारी स्पष्टता सहज बदलली जाऊ शकतो , कठीण प्रसंग तीला मोठ्या गोंधळात टाकू शकतात.

परिपूर्ण स्पष्टता तेव्हाच येईल जेव्हा तुमची दृष्टी अंतर्मुख होईल. जगातली कुठलीही परिस्थिती किंवा व्यक्ती तुमची आंतरिक स्पष्टता धूसर करू शकणार नाही. खऱ्या ज्ञानासाठी तुमचा तिसरा डोळा उघडलाच पाहिजे.

Editor’s Note: In this article, Sadhguru talks about two ways to open the third eye.

    Share

Related Tags

शिव तत्त्व गूढवाद

Get latest blogs on Shiva

Related Content

शिव - असंस्कृत, असभ्य पण फक्त एक शुद्ध जीवन