शिवाबद्दल व्यक्त होताना सदूगुरूंनी ही सात कडवी दहा मिनिटाहून कमी वेळात लिहिली.
अभिमानी माझे हृदय
दगडासारखे होते भक्कम
आगंतूकच मग आला तो
आणि माझे हृदय धडधडले आणि पिळवटलेही
सगळ्या जीवांसाठी आणि दगडांसाठीही
एकशे बारा युक्त्या
मर्त्य विळखा सोडवण्यासाठी
या युक्त्यांमध्ये गुरफटवलं मला
चलाख असा मी सुद्धा भुललो
माझा आणि माझ्याबद्दलचा विचार
किंवा काम आता मी करूच शकत नाही
सगळी मधुर गाणी ऐकल्यानंतर
सगळी महान दृश्य बघितल्यानंतर
सगळ्या प्रेमळ संवेदना अनुभवल्यावर
माझे सगळे मी गमावले त्याच्यात
जो, नाहीये, पण इतर कोणासारखाही नाहीये
तो प्रेम नाही
तो अनुकंपा नाही
आरामासाठी नका शोधू त्याला
कारण तो पूर्णत्व आहे
या, अनामिकाला जाणून घ्या
जाणून घ्या निराकाराच्या उल्हासाला
समाधानाची ख़ुशीला नाही
हा खेळ आहे स्वतःला गमावण्याचा
आहात का तुम्ही तयार या खेळासाठी: न-परतण्याच्या.
तो जो स्थिर आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका
त्याच्या स्थिरतेनी त्याने मला खेचून घेतलं
मला वाटलं तो आहे मार्ग
पण सावधान तो आहे शेवट
तुम्ही तुमच्या अंत्ययात्रेला असाल का
त्या जंगी मयतेला,
जादू माझा अंत्यसंस्कार करणाऱ्याची
माझा शिव
सप्रेम आशीर्वाद!