आमच्या वेबस्ट्रीमद्वारे महाशिवरात्री उत्सवाचे थेट प्रक्षेपण पहा.
महाशिवरात्रीची रात्र ही भारतातील पवित्र उत्सवांमधील सर्वात मोठी आणि सर्वात महत्वाच्या रात्रींपैकी एक आहे. ही – वर्षातील सर्वात काळोखी रात्र – शिवाची कृपा साजरी करते, ज्यांना आदियोगी किंवा प्रथम योगी मानले जाते, ज्यांच्यापासून योग परंपरा सुरू झाली. या रात्री ग्रहांची एक विलक्षण स्थिती असते, ज्यामुळे मानवी शरीरात शक्तीशाली नैसर्गिक ऊर्जेचा प्रवाह होतो. या रात्री, संपूर्ण रात्रभर, पाठीचा कणा सरळ ठेवून जागरण करणे शारीरिक आणि अध्यात्मिक कल्याणासाठी अतिशय फायदेशीर आहे.