seperator

"पौर्णिमेच्या रात्री तुमच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे ऊर्जेची पातळी उंचावलेली असते. या ऊर्जेचा स्वास्थ्य, यश आणि परमानंद साधण्यासाठी उपयोग करण्याचे अनेक मार्ग आहेत." - सद्गुरू

अध्यात्मिक मार्गावर असलेल्या लोकांसाठी, पौर्णिमेच्या रात्र ध्यान करण्यासाठी अनुकूल असतात कारण निसर्गाने आपल्याला ह्या उर्जेचा उपयोग करून घेण्यासाठी एक विलक्षण संधी दिलेली असते. 28 मार्च 2021, पासून सुरू होणाऱ्या सर्व १२ पौर्णिमेच्या रात्री, सद्गुरु एक सत्संग प्रदान करत आहेत, जे सबंध जगभरातील साधकांसाठी पौर्णिमेच्या आध्यात्मिक शक्यतांचा ठाव घेण्यासाठी द्वार उघडू शकते..

हा सत्संग, प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री तुमच्या परम स्वरूपाची जाणीव करून घेण्याच्या दिशेने उचलेले एक महत्वाचे पाऊल ठरू शकते.

buring questions
 
तुमच्या ज्वलंत प्रश्नांची उत्तरे मिळवा.
meditations
 
शक्तिशाली ध्यान प्रक्रियेत सहभागी व्हा.
satsang
 
जिवंत गुरुंच्या उपस्थितीत जीवनाचे सखोल आयामांचा शोध घ्या.

काही गोष्टी तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे

seperator
 • नोंदणी निःशुल्क आणि अनिवार्य आहे.
 • 28 मार्च पासून, आगामी सर्व 12 पौर्णीमेच्या रात्री सत्संग संपन्न होतील.
 • प्रत्येक सत्संग भारतीय वेळेनुसार सायं: 7 वाजता सुरू होतील.
 • 1.5 ते 2 तास संपूर्णपणे कुठल्याही व्यत्ययाशिवाय सहभागी होण्याची तयारी ठेवा.
 • सर्व वयोगटांसाठी खुले आहे. किमान वयाची अट नाही.
 • ईशा योगाच्या कार्यक्रमांमध्ये पूर्व सहभाग असल्याची आवश्यकता नाही.

निःशुल्क नोंदणी

सत्संगाचा सर्वोत्तम उपयोग कसा करून घ्यावा.

seperator

काही मार्गदर्शक सूचना ज्या आपली ग्रहणशीलता वाढवतील आणि आपल्याला या संधीचा सर्वोत्तम वापर करण्यास तयार करतील:

 • हे अत्यंत महत्त्वाचे आहे की सत्संगमध्ये संपूर्णपणे आणि एकचित्ताने भाग घ्यावा. कृपया आपला वेळ खास याच उद्देश्याने समर्पित करा, आणि1.5 ते 2 तासांच्या संपूर्ण अवधीसाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा व्यत्यय (जसे की बाथरूमला जाणे, फोन कॉल घेणे किंवा मेसेजेस बघणे) येणार नाही याची खात्री करा.
 • आपल्याकडे इंटरनेटचे एक स्थिर कनेक्शन असल्याची खात्री करा.
 • आपल्याकडे इंटरनेटचे एक स्थिर कनेक्शन असल्याची खात्री करा.
 • कृपया आपण सायं: 7 वाजता सहभागी व्हाल याची खात्री करा, कारण सत्संग सुरू झाल्यानंतर सहभागी होता येणार नाही. सत्संगच्या किमान 15 मिनिटे आधी सहभागी होणे उत्तम. सत्संगची वेबसाईट सत्संगच्या 30 मिनिटे आधीपासून खुली असेल.
 • कृपया आपण हलक्या पोटी आहात याची खात्री करा (आपल्या जेवणानंतर कमीतकमी अडीच तासांचे अंतर असणे आवश्यक आहे.) आणि सत्संग दरम्यान काहीही खाऊ नये.
 • एक तेलाचा दिवा लावून आपण एक अनुकूल वातावरण निर्माण करू शकता. (अनिवार्य नाही)
 • जमिनीवर खाली बसणे उत्तम. जर ते शक्य नसेल, तर आपण खुर्चीवर बसू शकता.

आगामी सत्संग

seperator

मार्च २०२१ पासून, सद्गुरू प्रत्येक पौर्णिमेला सत्संग प्रदान करत आहेत. पुढील सत्संगच्या तारखा याप्रमाणे आहेत.

22 ऑगस्ट 2021

20 सप्टेंबर 2021

● 20 ऑक्टोबर 2021

● १८ नोव्हेंबर 2021

● 18 डिसेंबर 2021

FAQ

seperator

सत्संगात भाग घेण्याआधी, कृपया खात्री करा की तुम्ही हलक्या पोटी आहात ( म्हणजे जेवण झाल्यानंतर किमान २.५ तासांचे अंतर असले पाहिजे)

सत्र सुरू होण्यापूर्वी तुम्ही पाणी कधीही पिऊ शकता.

सत्संग चालू असताना, कृपया काहीही खाणे किंवा पिणे टाळावे.

नाही, आवश्यक नाही.

ह्या काही मार्गदर्शक सूचना आहेत ज्याने तुमची ग्रहणक्षमता वाढायला आणि तुम्हाला या संधीचा पुरेपूर लाभ घ्यायला मदत होऊ शकते:

 • कृपया पुढचा १.५ -२ तास पूर्णपणे सत्संगसाठी समर्पित करा आणि खात्री करा की सत्राच्या संपूर्ण वेळेदरम्यान कुठल्याही प्रकारचा व्यत्यय किंवा अडथळा येणार नाही (जसे की बाथरूमला जाणे, फोन कॉल्स घेणे किंवा मेसेज चेक करणे).
 • सत्संग सुरू होण्यापूर्वी किमान १५ मिनिटे आधी लॉगइन करावे. सत्संग सुरू झाल्यानंतर तुम्हाला सहभागी होणे शक्य होणार नाही.
 • तुमची इच्छा असल्यास, तुम्ही एक तेलाचा दिवा किंवा मेणबत्ती लावू शकता.
 • शक्य असल्यास, जमिनीवर मांडी घालून बसलेले उत्तम. जर शक्य नसेल, तर तुम्ही खुर्चीवर बसू शकता.

पौर्णिमा सत्संग सदगुरूंकडून निःशुल्क प्रदान केला जात आहे.

सत्संगचा परिपूर्ण अनुभव आणि लाभ घेण्यासाठी कुठलेही व्यत्यय येणार नाही याची खात्री करून एकाग्र चित्ताने भाग घ्यावा. म्हणून तुम्ही एकट्याने यात सहभागी होणे उत्तम. पण हे काही अनिवार्य नाही.

जर तुमच्या कुटुंबाचे सदस्य तुमच्यासोबत बसणार असतील, तर खात्री करा की ते एकाग्र चित्ताने संपूर्ण सत्संगात भाग घेण्यास तयार आहेत, आणि सत्संग दरम्यान तुम्हाला त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज भासणार नाही.

नाही. सद्गुरू असे मार्गदर्शन केले आहे की तुम्ही जिथे राहता तिथल्या सायंकाळच्या ७ च्या वेळेच्या सर्वांत जवळपास जी सत्राची वेळ असेल, ते सत्र निवडावे.

नाही, असा कुठलाही नियम नाही. हे सर्वस्वी तुमच्यावर आहे.

सत्संगमध्ये सहभागी होण्यासाठी वयाची कुठलीही अट नाही.

होय. सहभागी होऊ शकतात.

होय. ज्या ध्यान प्रक्रिया सत्संग दरम्यान करवल्या जातील, त्यांच्यासाठी कुठलेही शारिरीक क्षमता किंवा योगाच्या पूर्वज्ञानाची गरज नाही. 

Please visit this link to register for the satsang. कृपया सत्संगसाठी नोंदणी करण्यासाठी या लिंकला भेट द्या. "विनामूल्य नोंदणी करा" बटणावर क्लिक करा आणि आपले ईशा प्रोफाइल वापरून लॉग इन करा. आपल्याकडे ईशा प्रोफाइल नसल्यास प्रोफाइल तयार करण्यासाठी आपण "साइन अप" वर क्लिक करू शकता. त्यानंतर, नोंदणी फॉर्म भरा आणि "नोंदणी पूर्ण करा" बटनावर क्लिक करा. एकदा नोंदणी झाल्यावर आपणांस एक पुष्टीकरण ईमेल प्राप्त होईल.

Registration सत्संगाला उपस्थित राहण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे.

तथापि, ईशा योग कार्यक्रमांमध्ये पूर्वसहभाग असणे आवश्यक नाही.

होय. सत्संगाचे थेट प्रसारण हिंदी, तामिळ, रशियन, फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिश भाषेत उपलब्ध असेल. या अनुवादाची उपलब्धता टाईमझोन प्रमाणे भिन्न असू शकते.

तुम्ही आधीपासूनच नोंदणी फॉर्म सबमिट केला असेल आणि पुष्टीकरण ईमेल प्राप्त न झाल्यास, कृपया तुमचे स्पॅम / जाहिराती / इतर फोल्डर्स तपासा. जर तरीही ईमेल मिळाले नसेल, तर कृपया तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावरून तुमचा तपशील आमच्या सहायक टीमला पाठवा. तुमच्या प्रदेशातील सहायक टीमचा संपर्क शोधण्यासाठी, इथे क्लिक करा. click here.

तुम्हाला फक्त एकदाच नोंदणी करणे आवश्यक आहे. दरमहा, तुम्हाला सत्संगच्या तपशीलांसह एक स्मरणपत्र ईमेल प्राप्त होईल.

तुम्ही आधीपासून नोंदणी केली असल्यास, परंतु लॉग-इन करण्यास अक्षम असल्यास, कृपया लॉग-इन करण्यासाठी तुमचा नोंदणीकृत ईमेल आयडी वापरण्याची खात्री करा. तरीही तुम्हीलॉग-इन करण्यात अक्षम असाल तर कृपया तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरून तुमचा तपशील सहायक टीमला पाठवा. तुमच्या प्रदेशातील सहायक टीमचा संपर्क शोधण्यासाठी, इथे क्लिक करा click here.

“सामील व्हा” बटन प्रत्येक सत्र सुरू होण्याच्या 30 मिनिटे अगोदरच सक्षम केले जाईल.

 1. कृपया लॉग इन करण्यासाठी या लिंकला भेट द्या. मग त्या पृष्ठाच्या उजव्या कोपर्‍यातील “सेटिंग्ज” वर क्लिक करा. तिथे तुमच्या पसंतीची भाषा निवडण्याचा पर्याय दिसेल.

सत्संग सुरू होण्याच्या किमान १५ मिनिटांपूर्वी लॉग-इन करण्याची खात्री करा जेणेकरून तुम्ही वेळेवर सुरुवात करण्यास तयार असाल. सत्र सुरू झाल्यानंतर तुम्हाला सामील होता येणार नाही.

तुम्ही पुढील उपलब्ध सत्र निवडू शकता. कृपया खालील सूचनांप्रमणे करा:

लॉग इन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

पृष्ठाच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या “सेटिंग्ज” वर क्लिक करा.

तुमच्या पसंतीची वेळ निवडण्यासाठी तुम्हाला एक पर्याय दिसेल.

तुमच्या स्थानिक वेळेनुसार सायं 7 च्या जवळची वेळी सत्संगला उपस्थित राहण्यासाठी चांगली.

कृपया लॉग इन करण्यासाठी या लिंकला भेट द्या. पृष्ठाच्या उजव्या कोपर्‍यातील “सेटिंग्ज” वर क्लिक करा. तुमच्या पसंतीची वेळ आणि भाषा बदलण्यासाठी तुम्हाला पर्याय दिसेल.

कृपया लक्षात घ्या की सर्व भाषा सर्व टाईमझोनमध्ये उपलब्ध नाहीत.

हो वापरू शकता. सद्गुरू अँप द्वारे तुम्ही सत्संगमध्ये सहभागी होऊ शकता. 

तुम्ही वापरत असलेली सिस्टिम इंटरनेटशी जोडलेली आहे याची खात्री करून घ्या. तुमच्याकडे चांगली कनेक्टिव्हिटी असेल आणि तरीही तुम्ही व्हिडियो सुरू करू शकत नसाल ,तर कृपया कैश(CACHE ) क्लिअर करा आणि लॉग आऊट(log out) करून पुन्हा लॉग-इन(login) करा. गूगल क्रोम वापरणे उत्तम राहील. 

बहुतेक विंडोज सिस्टम मध्ये, तुम्ही डेस्कटॉप वर कुठेही राईट क्लीक करून, नंतर  “प्रॉपर्टीज”(Properties) वर क्लिक करा, त्यानंतर त्या डायलॉग  बॉक्सच्या वरच्या बाजूस असलेल्या  “स्क्रीन सेवर ”(Screen Saver)  टॅबवर क्लिक करा.  तिथून तुम्ही तुमचे स्क्रिन सेवर(Screen Saver) बंद करू शकता किंवा सेटिंग बदलू शकता जेणेकरून ते सत्राच्या कालावधीत येणार नाही. 

बहुतेक मॅक सिस्टिम मध्ये, ऍप्पल आयकॉन  वर जा आणि “सिस्टिम प्रेफरेन्सेस” (System Preferences.) वर क्लिक करा. त्यानंतर “हार्डवेअर”(Hardware) मध्ये “ एनर्जी सेवर”(Energy Saver) वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा कम्प्युटर आणि डिस्प्ले स्लीप टाईम हे १.५ तास किंवा अधिक(1.5 hours or more),  किंवा नाही("Never") असे सेट करा. 

तुमचे स्पिकर म्यूट(MUTE ) नाहीत याची खात्री करून घ्या आणि ऑडिओ प्लेयरचा आवाज पुरेसा आहे याची खात्री करा. आवश्यक असल्यास, तुम्ही तुमच्या सिस्टिमची ऑडिओ सेटीन्ग्स “ऑडिओ” (audio) किंवा “स्पीकर”(speaker) सेटीन्ग्स मध्ये तपासू शकता. 

बॅण्डविड्थचा वापर वाचविण्यासाठी तुम्ही व्हिडियोची  गुणवत्ता कमी करून रेसोलुशन (२४० पी किंवा १४४ पी)(240p or 144p) असे सेट करू शकता. रेसोलुशन कमी करण्यासाठी व्हिडियोच्या खाली असलेल्या  “सेटीन्ग्स”(Settings) चिन्हावर क्लिक करा. जर इतर अँप्लिकेशन्स इंटरनेटचा वापर करत असतील तर तुम्ही ते सर्व अँप  बंद करा. जर इंटरनेट कनेक्शन वापरणारे बरेच लोक असतील, तर ही समस्या उद्भवू शकते. शक्य झाले,तर तुम्ही इंटरनेट एकटेच वापरत आहात याची खात्री घ्या.   

पेज रिफ्रेश करा. 

विंडोज किंवा लिनक्स सिस्टिमवर, “कन्ट्रोल”(Ctrl) दाबून ठेवून “एफ ५”(f 5) वर क्लीक करा.  

मॅक  सिस्टिम मध्ये  ⌘ “सीएमडी ”(Cmd) आणि ⇧ “शिफ्ट की”(Shift key) दाबून ठेवा आणि “आर”(R) वर क्लिक करा. जर तरीही हि समस्या कायम राहिली, तर सहायक टीमला संपर्क करा. तुमच्या प्रदेशातील सहायक टीमचा संपर्क शोधण्यासाठी इथे क्लीक करा.  

जर तुम्ही फोन वापरत असाल, तर सत्रादरम्यान फोन एअरप्लेन मोडवर ठेवून तुम्ही वायफायला कनेक्ट करणे उत्तम राहील. 

तुम्ही लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाइल वापरू शकता. जर तुम्ही फोन वापरत असाल, तर सत्रादरम्यान फोन एअरप्लेन मोडवर ठेवून तुम्ही वायफायला कनेक्ट करणे उत्तम राहील. 

कृपया तुम्ही कार्यक्रमासाठी वापरत असलेले यंत्र(device) कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी चार्जिंगला जोडून ठेवले आहे याची खात्री घ्या. 

इंटरनेट आवश्यकता : संपूर्ण कार्यक्रमासाठी पुरेशी बॅण्डविड्थ (५०० केबीपीएस )(500 kbps) आणि इंटरनेट डेटासह (०.५-१ जीबी) (0.5 - 1 GB) स्थिर इंटरनेट उपलब्ध पाहिजे. वायफाय किंवा केबल इंटरनेट कनेक्शन असलेले उत्तम. गूगल क्रोम ब्राउझर वापरणे चांगले राहील.  

होय, सर्व सत्र पूर्ण स्क्रीनवर बघू शकता. जेव्हा आपण एखादा व्हिडियो पाहायला सुरू करता, तेव्हा खाली असलेल्या पूर्ण स्क्रिनच्या पर्यायावर क्लीक करा. 

पौर्णिमेच्या सत्संगचे स्वरुप आणि त्यात समाविष्ट असलेले ध्यान(मेडिटेशन) लक्षात घेता आम्ही ऑफलाइन रेकॉर्डिंग उपलब्ध करत नाही. आगामी सत्राच्या तारखा, वेळेपूर्वीच जाहीर केल्या जातात, जेणेकरुन सत्संगाला उपस्थित राहण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करता येईल.

या सत्संग मालिकेत प्रदान केलेल्या शक्यता सर्वार्थाने अनुभवण्यासाठी तुम्ही सर्व सत्संगांमध्ये सहभागी होणे व्हावे. पण तरी कुठल्या कारणास्तव तुमचा एखादा सत्संग चुकला, तर तुम्ही उर्वरित सत्संगांमध्ये सहभागी होऊ शकता.

सत्संगपूर्वी, नोंदणीच्या वेळी, तुम्हाला सतावणारे ज्वलंत प्रश्न तुम्ही सद्गुरूंना विचारण्यासाठी आमच्याकडे पाठवू शकता.

सत्संग ही सद्गुरुंच्या सान्निध्यात असण्याची एक उत्तम संधी आहे. सद्गुरू पौर्णिमेच्या रात्रीच्या आध्यात्मिक शक्यता जगभरातील साधकांसाठी उपलब्ध करत आहेत. प्रत्येक पौर्णिमेची रात्री तुम्हाला तुमच्या परम स्वरूपाची जाणीव करण्याच्या दिशेने घेतलेले एक अभूतपूर्व पाऊल ठरू शकते.

या लेखात चंद्र आपल्या जीवनात कुठल्या महत्त्वाच्या भूमिका निभावतो ते सद्गुरु स्पष्ट करतातः https://isha.sadguru.org/us/en/wisdom/article/mystic-moon. हे सत्संग म्हणजे पौर्णिमेच्या ऊर्जाचा लाभ  घेण्याची आणि ती अनुभवण्याची एक विलक्षण संधी आहे.

संपर्क करा

seperator