आदियोगी प्रदक्षिणा

प्रदक्षिणा ही शक्तीशाली ऊर्जेचा स्त्रोत धारण करण्यासाठी घडाळ्याच्या दिशेने फेरी मारण्याची प्रक्रिया आहे. ही क्रिया अकरा अंश अक्षांशावर, जेथे ईशा योग केंद्र स्थित आहे अधिक प्रभावी होऊ शकते. ही प्रदक्षिणा सद्गुरूंनी आदियोगीच्या कृपा प्राप्तीसाठी आपण तयार व्हावे म्हणून निर्माण केलेली आहे, ज्यामुळे साधकाच्या मनात असलेल्या परम मुक्तीच्या इच्छेस चालना मिळते

आदियोगी प्रदक्षिणा घालण्यासाठी, आपण आणलेला सर्व प्रसाद (तांदूळ, धूप, हिरवा हरभरा, काळे तीळ एका कापडी पिशवीत जमा करा. (आदियोगीची प्रतिमा असलेल्या कापडी पिशव्या खरेदीसाठी उपलब्ध आहेत). आदियोगींसमोर 3 वेळा “योग योग योगेश्वराय” असा उद्घोष करून प्रदक्षिणा सुरू करा. उद्घोष संपल्यानंतर, योगेश्वर लिंगाला पाणी अर्पण करा (महाशिवरात्रीच्या दिवशी योगेश्वर लिंगाला पाणी अर्पण करता येणे शक्य होणार नाही)

ध्यानलिंग आवारातील दगडी त्रिमूर्ती पॅनलच्या दिशेने चालत जा आणि त्रिमूर्तीसमोर ठेवलेल्या उरली/धूपपात्रात धूप अर्पण करा. लिंग भैरवीकडे चालत जा आणि देवीला हिरवे चणे अर्पण करा. महिला चंद्रकुंडाकडे चालत जातील आणि चंद्रकुंडमधील पाणी त्यांच्या डोक्यावर ओतून घेतील. ध्यानलिंगाकडे चालत जा आणि त्यावर काळे तीळ अर्पण करा. ध्यानलिंगावर प्रसाद अर्पण केल्यानंतर पुन्हा परत आदियोगींकडे चालत या आणि तांदूळ अर्पण करून प्रदक्षिणा पूर्ण करा. हे असे एक आवर्तन आहे.

प्रत्येक आवर्तनात, तांदूळ, हिरवे चणे आणि काळे तीळ अर्पण करणे आवश्यक आहे. कोणतीही व्यक्ती वर्षभरात प्रदक्षिणेची किती आवर्तने करायची हे ठरवू शकते. आदियोगी प्रदक्षिणा 1, 3, 5, 7, 9, 12, 18, 21, 24, 33, 48, 64, 84, 96, 108, 208, 308, 408, 508, 608, 708, 808, 908 किंवा 1008 वेळा घातली जाऊ शकते. परंतु साधकानी जितक्या वेळा प्रदक्षिणा घालण्याचे ठरविले असेल, तितक्या प्रदक्षिणा ते एका वर्षात पूर्ण करतील याची खात्री करून घ्यायाला हवी

संपूर्ण प्रदक्षिणा मार्गात “योग योग योगेश्वराय” हा उद्घोष करा.:

योग योग योगेश्वरायचा उद्घोष:

योग योग योगेश्वराय
भूत भूत भुतेश्वराय
काल काल कालेश्वराय
शिव शिव सर्वेश्वराय
शंभो शंभो महादेवाय

प्रदक्षिणा मार्ग प्रत्येक दिवशी सकाळी 6 ते रात्री 8 पर्यन्त सुरू असतो. महाशिवरात्रीला तो सकाळी सहा ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहील.

कृपया नोंद घ्या:

 • आपण ज्यादिवशी किती प्रदक्षिणा घालणार आहात त्यानुसार अर्पण सामुग्री तयार ठेवा.
 • प्रदक्षिणा घालण्यापूर्वी पुरुषांनी त्यांचे शर्ट उतरवून ठेवणे आवश्यक आहे.
 • प्रदक्षिणे दरम्यान पादत्राणे घालण्यास बंदी आहे.
 • प्रदक्षिणे दरम्यान बोलणे टाळा

नेहेमी विचारले जाणारे प्रश्न:

 • प्रत्येक अर्पणाचे (तांदूळ/ हिरवे चणे/ काळे तीळ) प्रमाण किती असावे?
 • आपण आपल्या इच्छेनुसार कितीही प्रमाणात प्रसाद अर्पण करू शकता

 • मी घरून प्रसाद आणू शकतो का?
 • होय.

 • प्रदक्षिणे दरम्यान मी पादत्राणे घालू शकतो का?
 • नाही.

 • इशा योग केंद्रामध्ये प्रसाद विकत घेण्याची सुविधा उपलब्ध असेल का?
 • होय.

 • सूर्यकुंड/चंद्रकुंड येथे प्रवेश करण्यासाठी मला काही पैसे देण्याची गरज आहे का?
 • नाही.

 • योगेश्वर लिंगाला जल अर्पण करण्यासाठी मला काही पैसे देण्याची गरज आहे का?
 • नाही.

 • दुपारी 1.20 ते 4.20 या काळात लिंग भैरवी बंद असताना मी अर्पण करू शकतो का?
 • होय, आपण लिंग भैरवीच्या बाहेर असलेल्या लिंग भैरवी गुडीसमोर अर्पण करू शकता

 • पंच भूत अराधनेसाठी ध्यानलिंग बंद असताना अर्पण करणे शक्य आहे का?
 • होय, आपण सर्व धर्म स्तंभाच्या जवळ ठेवण्यात येणार्‍या ध्यानलिंगाच्या प्रतिमेसमोर अर्पण करू शकता

 • मी किती आवर्तने करू शकतो?
 • आपण वर्षभरात आपल्या इच्छे आणि सोयीनुसार कितीही आवर्तने करू शकता. मात्र ती आवर्तने 1, 3, 5, 7, 9, 12, 18, 21, 24, 33, 48, 64, 84, 96, 108, इत्यादि. या पटीतच असायला हवी.

 • धूप कसा अर्पण करावा?/strong>
 • आपण त्रिमूर्ती पॅनलच्या समोर ठेवलेल्या उरली/धूपपात्रात धूप अर्पण करू शकता.

 • मला प्रत्येक आवर्तनात अर्पण करावं लागेल का?
 • होय.