logo
logo

शिवाचे गण - विकृत की दिव्य?

योगिक परंपरेत शिवाचे गण त्यांचे सततचे साथीदार म्हणून प्रसिद्ध आहेत, पण त्यांच्याबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. या लेखात सद्गुरू या रहस्यमय प्राण्यांबद्दल अधिक सांगतात.

सद्गुरू: योगिक परंपरेनुसार, सगळे गण हे शिवाचे मित्र होते. ते नेहमी त्याच्यासोबत असायचे. जरी त्याला शिष्य, पत्नी आणि इतर अनेक कौतुक करणारे असले तरी, त्यांच्या खाजगी सहवासात नेहमी गणच असायचे. गणांचे वर्णन विकृत, विचित्र प्राणी असे केले जाते. असे म्हटले जाते की, त्यांच्या शरीराच्या विचित्र भागांमधून हाडांशिवाय निघालेले अवयव होते, म्हणून त्यांना विकृत आणि विचित्र प्राणी असे म्हटले जाते. ते आपल्यापेक्षा वेगळे होते.

ते इतके वेगळे का असू शकतात? आता, आयुष्याचा हा पैलू पचवणे कदाचित थोडे कठीण असेल. पहा, खुद्द शिवाचे वर्णन नेहमी यक्षस्वरूप असे केले जाते. यक्ष म्हणजे दिव्य अस्तित्व. दिव्य अस्तित्व म्हणजे जो अन्य कुठून तरी आला आहे. सुमारे १५,००० वर्षांपूर्वी शिव मानसरोवरला आला, जे तिबेटमधील एक सरोवर आहे. हे टेथिस समुद्राचे अवशेष आहे, जे मानवी संस्कृतींचे मूळ मानले जाते. आज हा समुद्र सपाटीपासून जवळपास १५,००० फूट उंचीवर आहे, पण वास्तविक हा एक समुद्र होता, जो वर आला आणि आता सरोवर बनला आहे.

गण हे शिवाचे खास जवळचे होते.

गण, शिवाचे मित्र, मानवांसारखे नव्हते, आणि हे स्पष्टपणे सांगितले जाते की, त्यांनी कधीही मानवी भाषा बोलली नाही. ते एका विचित्र कर्कश आवाजात बोलत. जेव्हा शिव आणि त्यांचे मित्र संवाद साधत, तेव्हा ते अशी भाषा बोलत जी कुणालाही समजत नसे, म्हणून मानवांनी त्याचे वर्णन संपूर्ण कर्कश गोंगाट असे केले. पण गण हे त्यांच्या खूप जवळचे होते.

आणि तुम्हाला गणपतीने आपले डोके गमावल्याची कथा माहीत आहे. जेव्हा शिव आले आणि या मुलाने त्यांना अडवले, तेव्हा शिवाने त्याचे डोके उडवले. जेव्हा पार्वती व्याकुळ झाली आणि शिवाला डोके परत लावायला सांगितले, तेव्हा त्याने दुसऱ्या एका प्राण्याचे डोके घेतले आणि ते मुलावर लावले. या दुसऱ्या प्राण्याचे वर्णन हत्ती असे केले जाते. पण तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, त्याला कुणीही गजपती (हत्तींचा स्वामी) म्हटले नाही. आपण त्याला नेहमी गणपती (गणांचा स्वामी) म्हटले. शिवाने त्यांच्या एका मित्राचे डोके काढले आणि ते मुलावर लावले.

गणांचे अवयव हाडांशिवाय होते, म्हणून हा मुलगा गणपती बनला. कारण, या संस्कृतीत, हाडांशिवाय अवयव म्हणजे हत्तीची सोंड, म्हणून कलाकारांनी त्याला हत्ती बनवले - पण वास्तविक तो गजपती नाही, तो गणपती आहे. त्याला एका गणाचे डोके मिळाले, आणि शिवाने त्याला गणांचा नेता बनवले.

    Share

Related Tags

Get latest blogs on Shiva