सद्‌गुरु: योगा लोकप्रिय होण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील एक कारण म्हणजे योगाद्वारे आपल्याला स्वतःविषयीची काही मूलभूत तथ्ये माहित होतात. एकदा एका बालवाडीमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारले, “मी जर माझ्या डोक्यावर उभा राहिलो, तर तुम्हाला माझे तोंड लाल झालेले दिसेल कारण रक्तप्रवाह माझ्या डोक्याच्या दिशेने वाहतो. पण मी माझ्या पायावर उभे असताना मात्र तसे घडत नाही. असे का? एका लहान मुलाने उत्तर दिले, “कारण तुमचे पाय रिकामे नाहीत.”

योग ही एकमेव अशी प्रणाली आहे जी 15,000 वर्षांपेक्षा अधिक काळ कोणत्याही प्रचाराशिवाय किंवा सक्तीशिवाय टिकून राहिली आहे.

तुमचे शरीर एखाद्या वायुभारमापकासारखे आहे. ते कसे पहायचे हे तुम्हाला माहिती असेल, तर ते तुम्हाला तुमच्याविषयी सर्व काही सांगते. तुमची स्वतःबद्दलची कल्पना नाही, तर वास्तविक तथ्ये. तुमचे मन खूपच भ्रामक आहे. ते दररोज तुमच्याविषयी नवनवीन काहीतरी सांगतच असते. तुमचे शरीर तुम्ही अचूकपणे अभ्यासून बारकाईने ते वाचता आलं, तर ते तुम्हाला सारे काही जसे आहे तसेच उलगडून देईल, म्हणजे एका अर्थी तुमचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य सुद्धा. आणि म्हणूनच मूलभूत प्राथमिक योगाची सुरुवात शरीरापासून होते.

तर, जशी फॅशन बदलत जाते त्यानुसार अनेक गोष्टी येतात आणि जातात, पण योगा मात्र हजारो वर्षे टिकून आहे आणि अजूनही त्याची द्रुतगतीने वाटचाल चालूच आहे. जरी काहीवेळा त्याचा प्रसार अतिशय ढोबळरित्या आणि अनेक वेळा विकृत स्वरुपात झाला असला तरीदेखील तो अद्याप टिकून आहे. योग हीच केवळ अशी एक प्रणाली आहे जी 15,000 वर्षांपेक्षा अधिक काळ कोणत्याही संघटीत संस्थेशिवाय किंवा सक्तीशिवाय टिकून राहिली आहे. जगभरात इतर कोठेही मानवतेच्या इतिहासात असे घडलेले दिसत नाही की कोणीतरी कोणाच्या मानेवर तलवार ठेऊन म्हणाला आहे, की “तुम्ही योगा करायलाच पाहिजे.” तो टिकून राहिला आहे आणि अद्यापही अस्तित्वात आहे याचे एकमेव कारण म्हणजे मानवी कल्याणाच्या दृष्टीने तो इतर कुठल्याही प्रणालीपेक्षा सर्वाधिक प्रभावी राहिला आहे. जस जशी बौद्धिक कार्य सक्रियता जगभरात अधिकाधिक प्रबळ होत जाते, तस तसे कालांतराने अधिकाधिक लोक योगाकडे वळतील आणि स्वास्थ्य आणि कल्याण प्राप्तीचा तो एक सर्वात लोकप्रिय मार्ग बनेल.

आणखी एक गोष्ट म्हणजे, जगात सर्वसामान्यपणे असे दिसून येते की माणसे– मग ती तरुण असोत किंवा वृद्ध, यापूर्वी कधीही नव्हती येवढी तणावग्रस्त झालेली आहेत. लोकं चिंताग्रस्त, आणि मानसिक तणावाने अस्वस्थ झालेली दिसून येतात आणि त्यांच्या आंतरिक तणावावर उपाय म्हणून ते जे काही मार्ग अवलंबत आहेत – मग ते डिस्कोमध्ये जाणे असो किंवा मोटारगाडी घेऊन लांबचा प्रवास करणे असो किंवा गिर्यारोहण असो – त्याचा काही प्रमाणात फायदा होतो, पण गोष्टींनी त्यांना कोणताही उपाय दिलेला दिसून येत नाही. म्हणूनच योगाकडे वळणे ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे.

शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर झालेला प्रसार हे योगाच्या वाढत्या लोकप्रियतेचे कारण आहे. आज पृथ्वीवरील लोकांकडे यापूर्वी कधीही नव्हती येवढी प्रगत बुद्धिमत्ता आढळून येते. त्यामुळे, साहजिकच जशी बुद्धिमत्ता बळकट होत जाते, लोकं प्रत्येक समस्येवर तार्किक उपाय मिळवण्याचा प्रयत्न करतात. ते जितके अधिक तर्कसंगत बनतील, तितके ते विज्ञानावर अधिक ज्यास्त अवलंबून राहतात आणि विज्ञानाच्या वापराचा परिणाम म्हणजे तंत्रज्ञान. जगात बौद्धिक घडामोडी जशा अधिक बळकट होतील, तसे अधिकाधिक लोक योगाकडे वळतील आणि स्वास्थ्यप्राप्तीचा तो एक सर्वाधिक लोकप्रिय मार्ग बनेल.

 

योगा हा काही व्यायामाचा प्रकार नाही

आज जगात बहुतांश ठिकाणी जसा योगाचे जसे प्रशिक्षण आणि सराव केला जात आहे, मृत अर्भकाला जन्म देण्याप्रमाणे आहे. मृत अर्भक जन्माला घालण्यापेक्षा गर्भधारणा न होणे चांगले नाही का? तुम्हाला जर शरीर सौष्ठव हवे, तर मी म्हणेन की तुम्ही टेनिस खेळा किंवा पर्वतारोहण करा. योगा हा काही व्यायाम नाहीये; त्याचे अनेक संलग्न, सूक्ष्म, आयाम आणि पैलु आहेत. आरोग्याचा हा एक वेगळा आयाम आहे – यापासून तुम्ही आरोग्य प्राप्त करू शकता पण सिक्स पॅक्स मात्र नाही.

योगसराव अतिशय स्नायू बळकट करण्यासाठी ताकद लावून करायचा नसून तो अतिशय सूक्ष्म, अलगद, नाजूक आणि सौम्य रीतीने करणे आवश्यक आहे, कारण हे काही कसरत करण्याबद्दल नाहीये. पश्चिमेकडील देशांमध्ये योगाची ओळख होऊन आणि त्याला लोकप्रियता मिळून वीस वर्षांनंतर, वैद्यकीय तज्ञ मंडळी आता पुढे येऊन याचा अभ्यास करत आहेत आणि त्यांचे म्हणणे आहे की, योगापासून नक्कीच फायदा आहे.” जरी योगा ढोबळ पद्धतीने शिकवला जात असला, तरीही जगाला त्यापासून मिळणारे आरोग्यविषयक फायदे नाकारता येणार नाहीत. परंतु अयोग्य, ढोबळ, विकृत प्रकारचा योग जर प्रचलित झाला, तर दहा ते पंधरा वर्षांच्या कालावधीत त्यापासून अनेक मार्गाने तो हानिकारक आहे हे वैज्ञानिक अभ्यासाद्वारे आपल्यासमोर स्पष्ट केले जाईल आणि तेव्हापासून योगाच्या अधोगतीला सुरुवात होईल.

योगाभ्यास अतिशय स्नायू बळकट करण्यासाठी ताकद लावून करायचा नसून तो अतिशय नाजूक, अलगद आणि सौम्य रीतीने करणे आवश्यक आहे, कारण योग हा काही एक व्यायाम किंवा कसरतीचा प्रकार नाहीये. आपल्या शरीरात स्मृतींची एक विस्तृत अशी संपूर्ण संरचना आहे. हे शरीर जाणून घेण्याची जर तुम्हाला इच्छा असेल, तर या ब्रम्हांडातील इत्यंभूत सर्वकाही – म्हणजे हे ब्रम्हाण्ड शून्यातून येथपर्यंत कसे प्रगत होत गेले आहे – याची स्मृती आपल्या शरीरात आहे. ती स्मृती जागृत करण्याचा आणि अंतिम शक्यतेच्या दिशेने या जीवनाची वाटचाल करण्याचा प्रयत्न करण्यासाठी योगा हा एक मार्ग आहे. ही एक अतिशय सूक्ष्म आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे.