आपण निवडलेले सरकार राष्ट्रहिताच्या विरोधात काम करत आहे असे जर कोणाला वाटत असेल, तर हे थांबवण्यासाठी देशाच्या संविधान निर्मात्यांनी यासाठी पुरेशी साधने घालून दिलेली आहेत. याप्रकारच्या परिस्थिती हाताळण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण अपशब्द, शिवीगाळ करणे हा यावरचा तोडगा नाही.