रुद्र म्हणजे शिव, अक्ष म्हणजे अश्रू. रुद्राक्ष हे शिवाचे अश्रू आहेत. आख्यायिका अशी आहे की एकदा, शिव बराच काळ ध्यानासाठी बसले. त्यांचा परमानंद इतका तीव्र होता की त्यामुळे ते पूर्णपणे शांत, स्थिर झाले. कदाचित त्यांचा श्वासही जणू थांबला आणि तिथे जमलेल्यांना वाटले की ते मृत झाले आहेत. जीवन त्यांच्यात अजूनही धडधडत असल्याचे फक्त एक मात्र चिन्ह होते आणि ते म्हणजे - त्यांच्या डोळ्यांतून निरंतर वहात असलेले अश्रू. हे अश्रू पृथ्वीवर पडले आणि रुद्राक्ष झाले, अर्थात “शिवाचे अश्रू”.