Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
तुमच्या आयुष्यात सार्थक असं काही मिळण्यासाठी, तुम्हाला स्वतःला हरवावं लागेल.
ज्याला साधारणपणे अपयश समजलं जातं, त्याने तुमच्या जीवनाचा अनुभव तुम्ही ज्याला यश समजता त्याहून कितीतरी जास्त गहन होतो.
बाह्य गोष्टी तुम्हाला प्रेरणा आणि मार्गदर्शन देऊ शकतात, पण स्वतःला जाणणं आतूनच होऊ शकतं.
मातृत्वाचं सौंदर्य हे प्रजननामध्ये नाही, तर समावेशकतेमध्ये आहे - दुसऱ्या जीवाला आपला एक भाग म्हणून अनुभवणं.
मन हे फक्त भूतकाळाने भरलेलं आहे. एकदा तुम्ही मनाच्या पलीकडे गेला, की मग भूतकाळाची तुमच्यावर काहीच सत्ता उरत नाही.
नुसत्या सत्तेतून भ्रष्टाचार निर्माण होत नाही. वर्चस्व गजवण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींच्या हाती जेव्हा सत्ता येते तेव्हा तो भ्रष्टाचाराचा स्रोत बनतो.
जेव्हा तुमच्या खरोखर लक्षात येतं की तुम्हाला माहित नाही, तेव्हा तुमच्या आत कुठलाही पूर्वग्रह किंवा मत नसेल. तुम्ही एक निखळ अस्तित्व व्हाल.
मनुष्य असणं म्हणजे तुम्ही जे काही करत आहात त्या सगळ्याबद्दल पूर्ण जागरूक असणं.
तुमच्या आजूबाजूला काहीही घडत असलं तरी स्वतःला आतून कसं प्रसन्न ठेवायचं ते तुम्हाला माहित असेल, तर परम मुक्ती तुम्हाला नाकारली जाऊ शकत नाही.
Whatever may come our way, how we respond to it and what we make out of it is 100% ours.
It is my wish and my blessing that you find access to the inner dimension of who you are. It will be with you wherever you go.
तुमच्या इच्छा आणखी वाढवण्याऐवजी, जर तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या, तर तुम्ही या आयुष्यातून अगदी सहज तरून जाल, आणि सर्व काही सुंदरपणे पार पाडू शकाल.