USA
FILTERS:
SORT BY:
जेव्हा तुमचे नातेसंबंध हे दुसऱ्याकडून आनंद मिळवण्याऐवजी स्वतःचा आनंद वाटण्यावर आधारित असतील, तेव्हा कोणाशीही तुमचे नातेसंबंध अतिशय सुंदर असतील.
खुलेपणा म्हणजे कोणतेही निष्कर्ष न काढणे - प्रत्येक गोष्टीकडे ती जशी आहे तशी पाहणे.
शांतता ही आपण स्वतःच्या अंतरंगात कसे आहोत, याचा परिणाम आहे.
बुद्धीला सत्यावर विजय मिळवायचा असतो. भक्ती मात्र सत्याचा केवळ स्वीकार करते.
आत वळणे हा काही प्रवास नाही. तिथे कोणतेही अंतर नसते.
प्रत्येक जीवात आत्मज्ञानाचं बीज असतं. आत्मज्ञान हा एक साक्षात्कार आहे.
तुम्ही जे काही नकळतपणे करता, तेच तुम्ही जाणीवपूर्वक देखील करू शकता, आणि त्यामुळे खूप मोठा फरक पडतो.
जी व्यक्ती अस्तित्वाच्या पूर्णत्वाला ऐकते, तिच्यासाठी सर्व काही संगीतच असते.
ज्याला तुम्ही सर्वोच्च मानता, त्याचा ध्यास धरा. या दृष्टीकोनातून जगणे हीच मुळात एक उन्नत करणारी, मुक्त करणारी आणि आनंददायी प्रक्रिया आहे.
आध्यात्मिक प्रक्रियेचं पहिलं मूलभूत तत्त्व म्हणजे सगळी गृहीतकं सोडून देणं.
आध्यात्मिकतेचा तुम्ही राहता त्या वातावरणाशी काहीही संबंध नाही; ती तुम्ही स्वतःच्या आत जे वातावरण निर्माण करता त्याच्याशी संबंधित आहे.
आनंदाने खेळा, प्रामाणिकपणे खेळा आणि पूर्ण उत्साहाने खेळा. जीवन हे एक अत्यंत लहानसे नाटक आहे – आणि तेच सर्वात महान नाटक आहे.