अध्यात्म हे काही एक प्रकारचं अपंगत्व नाही. खरंतर हे एक प्रचंड सशक्तीकरण आहे. पण दुर्दैवाने, अलीकडच्या काळात लोकं अध्यात्मिकतेच्या नावाखाली दौर्बल्य प्रचलित करत आहेत. तुमची वेशभूषा, राहणीमान आणि जेवण जर गबाळ आणि निकृष्ट असेल तरच तुम्ही आध्यात्मिक असा गैरसमज पसरवला जात आहे. हे आता बदलायला हवं.