प्रश्नःमी माझ्या मनात असणारी भीती व असुरक्षितता सोडून पुढे कसे जाऊ शकतो?

सद्गुरु:तुम्हाला तुमची भीती आणि असुरक्षितता सोडण्याची गरज नाही कारण ती खरोखर अस्तित्वातच नाही. तुम्ही तुमच्या नकळत त्या निर्माण करता. तुम्ही त्या निर्माण केल्या नाहीत तर त्या खरोखर अस्तित्वात नाहीत. तर तुमचा प्रश्न हा आहे कि तुम्ही त्या का निर्माण करता आणि ते निर्माण करणे कसे थांबवावे. तुमच्यात भीती निर्माण होण्याचे मूलभूत कारण – एका दृष्टीने त्याचे कारण म्हणजे - या विशाल अस्तित्वात ज्याचा तुम्हाला आरंभ किंवा शेवट माहित नाही, तुम्ही एक लहान मनुष्य आहात. तुमचे अस्तित्व लहान असल्यामुळे तुम्हाला काय होईल, याबद्दल साहजिकच भीती आणि असुरक्षितता आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला आपले शरीर आणि मन यांच्या मर्यादेपलीकडे, अनुभवू लागते फक्त तेव्हाच ती व्यक्ती भय आणि असुरक्षिततेपासून मुक्त होते.

जो पर्यंत तुम्ही तुम्ही स्वतःला भौतिक शरीर म्हणून ओळखता,आणि जो पर्यंत तुमचा आयुष्याचा अनुभव, शारीरिक आणि मानसिक पातळीवरच राहतो तोपर्यत भय आणि असुरक्षितता अपरिहार्य आहेत. भिन्न लोक भीती आणि असुरक्षिततेच्या वेगवेगळ्या स्तरावर असू शकतात. आज जर तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं घडत असेल तर तुम्ही असुरक्षितता पूर्णपणे विसरून जाल. पण उद्या जर तुमच्या आयुष्यात उलथापालथ झाली तर तिचे अस्तित्व परत जाणवेल कारण ती कायम तुमच्यातच आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला आपले शरीर आणि मन यांच्या मर्यादेपलीकडे, अनुभवू लागते फक्त तेव्हाच ती व्यक्ती भय आणि असुरक्षिततेपासून मुक्त होते.

स्वत:ला भौतिक जाणिवेपलीकडे अनुभवणे याला आपण आध्यात्मिक म्हणून संबोधत आहोत. जेव्हा मी अध्यात्मिक म्हणतो, ते म्हणजे मंदिरात जाणे आहे असे समजू नका. तुम्ही तुमच्या प्रार्थनांचा विचार केल्यास त्यापैकी ९५% एकतर संरक्षणासाठी असतात किंवा स्वतःची काळजी घेतली जाण्याबद्दल असतात. या मध्ये अध्यात्मिक काही नाही. हे साधे, मूलभूत जगणे आहे. बहुतेक लोकांमध्ये प्रार्थना करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मनातील भीती आणि असुरक्षितता. जर तुमच्या आयुष्यात फक्त कृती म्हणून प्रार्थना अस्तित्वात असेल तर ते बीभस्त आहे. तुम्हीच प्रार्थनाशील झाल्यास, ते छान आहे आणि तुम्ही त्या योग्य गुणवत्ता मिळवण्यासाठी प्रार्थना करण्याची कृती वापरत असाल तरी ते ठीक आहे. परंतु जर तुम्ही केवळ उपजीविकेसाठी स्वर्गातून मार्ग काढत असाल तर ते खूप मूर्खपणाचे आहे. किडे आणि कीटकसुद्धा तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची काळजी घेतात.

जेव्हा मी अध्यात्मिक म्हणतो, तेव्हा मी जो भौतिक नसणाऱ्याचा अनुभव तुम्हाला येऊ लागला आहे. त्या बद्दल बोलत आहे. एकदा हा आध्यात्मिक पैलू जिवंत झाल्यावर एकदा तुम्ही शारीरिक आणि मानसिक मर्यादेच्या पलीकडे, स्वत:च अनुभव घेण्यास सुरुवात केली, तरच भीतीसारखे काहीही नाही. भीती म्हणजे केवळ अति-सक्रिय आणि नियंत्रण नसलेल्या मनाची निर्मिती आहे.

प्रश्नः परंतु सद्गुरु, जेव्हा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत,त्यावेळेस चिंताग्रस्त होणे नैसर्गिक व मानवी स्वभाव नाही का?

सद्गुरु: तुम्ही तुमची सर्व असमर्थता नैसर्गिक व मानवी स्वभाव का बनवित आहात? जर माझ्या आयुष्यात काही गोष्टी सुरळीत होत नाहीत आणि मी त्याबद्दल चिंता करत नसलो तर, जर मी माझा समतोल राखून राहिलो आणि मला जे करायला पाहिजे आहे ते करत राहिलो तर तुम्ही मला अमानुष म्हणाल का? जेव्हा गोष्टी तुम्ही इच्छित त्या मार्गाने जात नसतात तेव्हाच जेव्हा तुमची क्षमता सर्वात आवश्यक असते. जेव्हा तुम्ही चिंताग्रस्त होता, तेव्हा तुम्ही अधिक सक्षम किंवा कमी सक्षम बनता? कमी सक्षम, नाही का? जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त क्षमतेची आवश्यकता असते तेव्हा तुम्ही ती सोडून देताय. तुम्ही या कृतीला बुद्धिमान मार्ग म्हणाल? तुम्ही म्हणत आहात की अजाणतेपणाने जगणे म्हणजे मनुष्य असणे आहे. ती खूप चुकीची कल्पना आहे. मनुष्य असणे म्हणजे बुद्धिमत्तेने जगण्याबद्दल आहे.