स्वीत्झर्लंडमधील जेनेव्हा येथील द वर्ल्ड हार्ट फेडेरशन सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या रविवारी जागतिक हृदयदिन साजरा करते. या दिवशी, हृदय विकारासाठी कारणीभूत ठरणार्‍या घटकांविषयी आणि तो टाळण्यासाठी कोणत्या सोप्या उपाययोजना करता येतील याविषयी महत्वाची माहिती पोहोचवण्याचे सर्व प्रयत्न केले जातात.

वर्ल्ड हेल्थ ओर्गनायझेशन (WHO)च्या म्हणण्यानुसार, दरवर्षी फक्त हृदयविकाराने साधारण 1.70 कोटी लाख लोक मृत्यूमुखी पडतात. 2012 ची संकल्पना “एक हृदय, एक घर, एक जग” ही असल्याने प्रत्येक कुटुंबात आई आणि मुलांसह सर्वांचा हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यावर भर देण्यात आलेला आहे. ईशा ब्लॉग येथे आम्ही या उपक्रमाचा एक भाग होऊ इच्छितो, आणि आम्ही महिलांमधील हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार (सीव्हीडी) विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मदत करू.

हृदयविकार व रक्तवाहिन्यांसंबंधी आजाराचा धोका

आपणास हे माहिती होते काय, की हृदयविकार हे जगभरात महिलांमधील मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे? की फक्त एकट्या भारतात पुरुषांपेक्षा महिलांवर सीव्हीडीचा अधिक परिणाम होतो? आणि अमेरिकेत, दर चारपैकी एक महिला हृदयाशी संबंधित विकारामुळे मरण पावते? चिंतेचे आणखी मोठे कारण म्हणजे ही संख्या वाढतच चालली आहे – विशेषतः जिथे तळलेले पदार्थ आणि बैठी जीवनशैली प्रचलित झालेली आहे अशा ठिकाणी.

आजचा दर हिशेबात घेतला तर, असे अनुमान आहे की साल 2030 पर्यंत सीव्हीडीच्या विकारामुळे प्रतिवर्षी 2.30 कोटी लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे, आणि त्यात बळी पडणार्‍या व्यक्तींमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक असू शकेल. ही आकडेवारी हे दर्शविते की जे सर्वसामान्य समजाच्या विरुद्ध आहे – की पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयविकार कमी प्रमाणात होतो. आधुनिक जीवनशैलीसोबतच अज्ञान, दुर्लक्ष, उच्च पातळीवरचा ताण आणि आहारातील असंतुलन ही महिलांमध्ये सीव्हीडीचे विकार सतत वाढत जाण्याची प्रमुख करणे असू शकतात.

महिलांमधील हृदयविकार बळावण्याचे उच्च जोखीम घटक

तो कोरोनरी हार्ट डिसीज (CVD) असो, ब्रोकन हार्ट सिण्ड्रोम असो, कोरोनरी मायक्रोव्हास्क्युलर विकार असो किंवा हृदय बंद पडणे असो, या आजारांसाठी कारणीभूत असणारे जोखीम घटक नेहेमीच सारखे असतात. जोखमीचे काही प्रमुख घटक पुरुष आणि महिलांमध्ये सारखेच असतात – स्थूलत्व, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल. पण महिलांमध्ये हृदय विकार बळावण्यात मोठी भूमिका बजावणारी काही कारणे पुढे दर्शविलेली आहेत:

  • तणाव आणि नैराश्य: परीक्षणासाठी आता हे सिद्ध केले आहे की मानसिक तणाव पुरुषांच्या हृदयापेक्षा महिलांच्या हृदयावर अधिक परिणाम करतो. एका निराश महिलेला निरोगी जीवनशैली जगणे बहुतेक वेळा अवघड जाते.
  • धूम्रपान: CVDसाठी हा सुद्धा पुरुषांपेक्षा महिलांसाठी उच्च जोखीम घटक म्हणून ओळखला जातो.
  • रजोनिवृत्ती: रजोनिवृत्तीनंतर महिलांमधील इस्ट्रोजनचे कमी प्रमाणात होणारे उत्पादन हा लहान रक्तवाहिन्यांमधे सीव्हीडी निर्माण होण्यासाठी महत्वाचा घटक समजला जातो.
  • मेटाबोलिक सिण्ड्रोम: उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची उच्च पातळी, उच्च ट्रायग्लिसराईड्स आणि ओटीपोटात असलेली चरबी हे सर्व एकत्रितपणे येऊन जो परिणाम घडवून आणतात त्याला कमी चयापचय म्हणून ओळखले जाते आणि तो पुरुषांपेक्षा महिलांसाठी अधिक धोकादायक आहे.

उपचारांपेक्षा काळजी घेणे अधिक चांगले

महिलांसाठी चांगली बातमी म्हणजे सीव्हीडीपासून असणारा धोका आहार आणि जीवनशैलीमधे थोडे बदल करून सहज दूर करता येतो. त्यासाठी फार प्रयत्न सुद्धा करावे लागत नाहीत; तुमचे हृदय अधिक निरोगी, अधिक आनंदी बनण्यासाठी लहान बदल खूप मोठी मदत करतात. आज जगभरातील सर्व डॉक्टर शिफारस करतात तो सर्वात महत्वाचा बदल म्हणजे डायेट किंवा आहारातील बदल आहे. साधारणपणे,आहारात तळलेले पदार्थ, कार्बोडके आणि मेद यांचे प्रमाण कमी कारणे, आणि फळे आणि भाज्या यांचा समावेश असणार्‍या अधिक नैसर्गिक आहाराकडे वळणे हा बदल सुचवला जातो.

व्यायाम सुद्धा महत्वाचा आहे –दिवसातून किमान 30 मिनिटे, जलद चालणे, धावणे, पोहणे – हे व्यायाम आठवड्यातून 5 ते 6 दिवस करण्याचा सल्ला दिला जातो. दिवसभर शक्य तेवढे शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे फायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या हृदयाचा जितका अधिक वापर कराल, तेवढे ते तुमची अधिक चांगली सेवा करेल. तुमचे वय, जीवनशैली आणि कौटुंबिक पार्श्वभूमीवर आधारित नियमित वैद्यकीय तपासण्या देखील प्रतिबंधाच्या दृष्टीने महत्वपूर्ण भूमिका बजावतील.

योगाची भूमिका

हृदयविकार आणि सीव्हीडीच्या प्रतिबंधात योग महत्वाची भूमिका बजावते. तणावात घट हा सर्वात मोठा फायदा आहे. अनेक संशोधने आणि अभ्यास यातून असे सिद्ध झाले आहे की योगाचा नियमित सराव केल्याने तणाव आणि तणावग्रस्त स्थितीला दिली जाणारी प्रतिक्रिया यांची तीव्रता कमी करते. उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची उच्च पातळी आणि उच्च कोलेस्तरोलची उच्च पातळी या उच्च जोखमीच्या घटकांसोबतच संताप, थकवा आणि तणाव देखील कमी होतों.

जोखीम असणार्‍या घटकांच्या पातळीत घट होण्याव्यतिरिक्त, योगाचा हृदयावर थेट परिणाम होतों. ऑटोनोमिक नर्व्हस सिस्टम (ANS) चे कार्य नियमित केले जाते. जेंव्हा हृदयाची एएनएस प्रणाली संतुलित असते, तेंव्हा ते मजबूत होते आणि त्याचे अनेक सीव्हीडींपासून रक्षण होते. विशेष म्हणजे, ईशा योग साधक आणि साधना न करणार्‍या व्यक्ती यांच्यावर केलेल्या परीक्षणानुसार, पहिल्या गटातील लोकांमध्ये एएनएसचे संतुलन अधिक प्रमाणात आढळून आले.

 जागतिक हृदयदीनानिमित्त, आम्ही आपल्याला आनंदी, निरोगी आणि हार्दिक जीवनासाठी शुभेच्छा देतो!