प्रश्न: कधीकधी आम्हाला असे वाटते की जेव्हा एखादा नवीन बॉस कंपनीमध्ये येतो तेव्हा तो बरेच बदल करतो जे कंपनीच्या मागील संस्कृतीशी विपरीत आहेत. यामुळे कंपनीत बरीच अस्थिरता निर्माण होते. आपण त्यास कसे सामोरे जावे?

सद्‌गुरु: प्रत्येक संस्थेत नेतृत्वाच्या निवडीची नेहमीच एक प्रक्रिया असते. एकदा आपण एखाद्यास नेता बनविल्यानंतर, प्रत्येकजणाने त्याला पाठिंबा न दिल्यास, तो किंवा ती त्या संघटनेला कुठेही घेऊन शकणार नाही. जर तुम्ही तुमच्या जुन्या सवयी कायम ठेवल्या, कारण तुमच्यासाठी त्या चांगल्या आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर नवीन नेता काय करू शकेल? एक कर्मचारी म्हणून तुम्हाला कदाचित यथायोग्य स्थिती हवी असेल. परंतु नवीन नेत्याला कदाचित कंपनीला कोठे तरी घेऊन जायचे आहे, ज्याचा तुम्ही विचार करण्यास सक्षम नाही अशा पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी. जर तुम्ही या सर्वांचा विचार करू शकत असाल तर त्यांनी तुम्हालाच नेता केले असते.

जर तुम्हाला कंपनी, संस्था, राष्ट्र किंवा कोणत्याही संस्थेत स्वारस्य असेल, तर एकदा आपण एखादा नेता निवडला किंवा ठरवला, त्यानंतर आपण त्याचे पूर्ण समर्थन केले पाहिजे.

जर तुम्हाला कंपनी, संस्था, राष्ट्र किंवा कोणत्याही संस्थेत स्वारस्य असेल, तर एकदा आपण एखादा नेता निवडला किंवा ठरवला, त्यानंतर आपण त्याचे पूर्ण समर्थन केले पाहिजे. नेता खाली उतरू शकत नाही आणि कंपनीच्या संपूर्ण कर्मचार्‍यांना त्याने काय करण्याची योजना आखली आहे हे सांगू शकत नाही. अशाने हे चालणार नाही. पुढाकाराने नेतृत्व करणारा कोणीही यामध्ये नेहमीच एकटा असतो कारण तो आपल्या जवळच्या व्यक्तीस देखील हे सांगू शकत नाही. तुम्ही बर्‍याच गोष्टी बोलल्या तर ते घाबरून जाऊ शकतात.

एखादी मोठी गोष्ट घडवून आणण्यासाठी, बरीच पावले एकाच वेळी उचलली जातात आणि बर्‍याच गोष्टींची रणनीती आखली जाते. जर धोरण नसेल तर कोणतेही नेतृत्व कार्य करु शकत नाही. जर तुम्ही नेते असाल तर तुम्ही शंभर पावले पुढे विचार केला पाहिजे. परंतु जर तुम्ही या शंभर पावलांबद्दल बोललात तर कोणीही तुमच्याबरोबर राहणार नाही. एखाद्या व्यक्तीस, तुम्ही काही गोष्टी समजावून सांगाल; दुसर्‍याला, तुम्ही थोडे अधिक समजावून सांगाल; आणि बर्‍याच लोकांना, तुम्ही काहीही सांगणार नाही. तुम्ही प्रत्येकाला सर्वकाही समजावून सांगितले तर काहीही होणार नाही कारण लोक त्यातून अराजकता निर्माण करतील.

 

जो नेता तुमच्या संस्थेत आहे तो त्याच्या मनात काय आहे हे तुम्हाला माहिती नसते . समस्या ही आहे की ज्या क्षणी तो नेता बदल करू लागतो वरून खालपर्यंत सगळे जण विचार करू लागतात कि तो काय करतोय हे त्याला माहिती नाही तुम्ही ते त्याच्यावर सोडून दिले पाहिजे कारण एकदा तो नेता झाल्यावर तो सत्ता चालवू शकतो एवढेच नव्हे तर ते यशस्वी करण्यासाठी देखील जबाबदार असतो. जर तो अयशस्वी झाला तर त्याचे काय व्हायचे ते होईल. परंतु तुम्ही त्याचे पाय खेचून हे अयशस्वी करण्याची गरज नाही. तुमचं काम हे सूचना घेणे आणि त्याप्रमाणे करणे आहे.

जर तुम्हाला नेतृत्वात जायची इच्छा असेल तर तुम्हाला आवश्यक क्षमता दाखवावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, घडणार्‍या कोणत्याही गोष्टीची - चांगल्या किंवा वाईट जबाबदारी घ्यायची तयारी दर्शवावी लागेल.

म्हणून ते तुमच्या नवीन बॉस वर सोडा. त्याला जे करायचं आहे ते करू द्या- फक्त त्याला आधार द्या. जर त्याला माहीती असेल की तो काय करतोय तर यश मिळेल. नाहीतर अपयश पदरी पडेल. पण ज्यांनी त्याला निवडलं आहे ते एका प्रक्रियेतून गेले आहेत आणि त्यांना विश्वास असतो कि तो यशस्वी होईल.

जर तुम्हाला नेतृत्वात जायची इच्छा असेल तर तुम्हाला आवश्यक क्षमता दाखवावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, घडणार्‍या कोणत्याही गोष्टीची - चांगल्या किंवा वाईट जबाबदारी घ्यायची तयारी दर्शवावी लागेल. तुम्ही बसून आज किती काम केले याची गणना करु नका. जर तुम्ही दिवसाच्या शेवटी नेहमीच असे पाहिले की, " करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु मी त्या पूर्ण केल्या नाहीत कारण माझा वेळ किंवा शक्ती संपली", तर स्वाभाविकच तुम्ही नेतृत्वाकडे वाटचाल कराल.