कथा समजण्यासाठी पात्रांना आपलेसे करा

सद्गुरु: तुम्ही पूर्णपणे सामील होण्याची गरज आहे, त्याकडे त्याच्या कथेचा एक भाग म्हणून न पाहता तुमची कहाणी म्हणून बघा, त्याचा एक अंश बनून. आपल्याला कथेतून चालत जायचं आहे, दुसऱ्या कोणाची गोष्ट ऐकायची नाही. जसं मी अगोदरच उल्लेख केला, ५००० वर्षांपूर्वीच्या लोकांचं तुमची मूल्य, तुमची नैतिकता, तुमचे आचार, किंवा आणखी काहीतरी यांनी परीक्षण करणे पूर्णपणे अनुचित राहील. मला तुम्ही त्यांच्यासारखा विचार करावा, त्यांच्यासारख व्हावं, त्यांनी ते जसं अनुभव केलं तसं तुम्ही करावं अशी इच्छा आहे - आज तुम्ही जसा विचार करता तसं नव्हे. हा असा काळ होता जेंव्हा पृथ्वी ग्रहाचे आणि इतर प्रकारच्या जीवनांमधील व्यवहार फारच वारंवार व्हायचे.

हा असा काळ होता जेंव्हा पृथ्वी ग्रहाचे आणि इतर प्रकारच्या जीवनांमधील व्यवहार फारच वारंवार व्हायचे.

महाभारतामध्ये असे अनेक पैलू आहेत जे तुम्हाला खूप अविश्वसनीय वाटतील, पण तुम्ही कशावरही अविश्वास दाखवू नका. कारण आपण २१ व्या शतकात आहोत, आपण आपलेसे करण्यापेक्षा विच्छेदन करण्यास अधिक महत्व देतो. परंतु आता, मला तुम्ही हि कथा आणि त्यातील पात्रें यांना आपलेसे करावे अशी इच्छा आहे, यातील मनुष्य, प्राणी, यक्ष, किन्नर, गण, देव, देवता आणि देवी - या सर्व प्रकारांना आपलेसे करा. तरच तुम्हाला समजेल कि ते जसं आहे तसं का होते, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, ते तुमच्याशी का निगडित आहे. त्याचं विच्छेदन करण्याच्या स्थितीमध्ये, तुम्ही त्याचा पूर्ण आत्मा गमावून बसाल.

बृहस्पती, इंद्राचा मुख्य पुजारी

हजारों वर्षांपूर्वी, एक निष्णात पुजारी आणि पंडित होता, त्याचं नाव होतं बृहस्पती. साहजिकच, स्वत: देवांचा राजा, इंद्राने त्याला आपला अधिकृत पुजारी म्हणून नियुक्त केले. पुजारी खूप महत्वाचे होते कारण ते द्वापर युग होते, तो काळ जेंव्हा कर्मकांड म्हणजे लोकांच्या जीवनातील सर्वात महत्वाची बाब होती. त्यांनी स्वत:च्या जीवनावर, आसपासच्या परिस्थितीवर आणि इतरांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या पद्धती आणि पदार्थांचा वापर करणे शिकले होते. या कर्मकांड संस्कृतीचे अवशेष अजूनही देशाच्या दक्षिणेकडील भागात कायम आहेत. केरळमध्ये बहुधा देशातील इतर कोणत्याही भागापेक्षा अधिक कर्मकांड विधी, आणि त्यांची अधिकांश पवित्रता राखली गेली आहे.

बृहस्पती आणि त्यांची पत्नी तारा

बृहस्पतीची तारा नावाची एक पत्नी होती. बृहस्पती हे गुरु ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. तारा म्हणजे “चांदणी.” प्राचीन भारतात, कर्मकांडात स्त्रीचे स्थान तितकेच महत्त्वाचे होते जितके पुरुषाचे. अशी व्यवस्था, जिथे एका पुरुषाला त्याच्या पत्नीशिवाय कर्मकांड विधी करता येत नव्हते, यामुळे जरी बाहेरील परिस्थिती शारीरिकदृष्ट्या कठोर असून देखील स्त्रियांना सामान स्थान मिळेल याची खात्री करून ठेवण्यात आली होती. एखाद्या पुरुषाला त्याच्या पत्नीशिवाय आशीर्वाद मिळू शकत नव्हता. एखादा माणूस त्याच्या पत्नीशिवाय स्वर्गात जाऊ शकत नव्हता. एका पुरुषाला त्याच्या पत्नीशिवाय मुक्ती मिळू शकत नव्हती.

बृहस्पतीच्या काळात, सामाजिक नियमांनी हे सुनिश्चित केले की एखाद्या स्त्रीचा वापर, शोषण, किंवा दुर्लक्ष होऊ शकत नाही, कारण ती पुरुषाच्या जीवनाचा एक अतिशय महत्वाचा भाग होती.

सर्व कर्मकांड विधी अशा प्रकारे स्थापित केले गेले की कोणत्याही क्षणी समाज कोणत्याही अर्थाने स्त्रियांचा अनादर करू शकत नाही. आज, स्त्रियांना थोडेसे स्वातंत्र्य आहे, परंतु दुर्दैवाने, या स्वातंत्र्यामुळे, त्यांना पूर्वी मिळालेले अनेक विशेषाधिकार त्या गमावत आहेत. आज महिलांना वाजवी समान हक्क आहेत - मी "वाजवी" म्हणत आहे कारण कदाचित कायद्याने ते समान आहेत, परंतु अंमलबजावणीच्यादृष्टीने, ते अजूनही फक्त "वाजवी" आहे.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रं समतल झाली आहेत फक्त त्यामुळेच समान हक्कांकडील हा कल घडला आहे आणि मानवतेच्या खऱ्या परिवर्तनामुळे नाही. बृहस्पतीच्या काळात, सामाजिक नियमांनी किंवा ज्याला "धर्म" असे म्हटले जायचे हे सुनिश्चित केले की एखाद्या स्त्रीचा वापर, शोषण, किंवा दुर्लक्ष होऊ शकत नाही, कारण ती पुरुषाच्या जीवनाचा एक अतिशय महत्वाचा भाग होती. शारीरिक सामर्थ्य आणि ताकदीच्या बाबतीत, त्याने तिचा पूर्ण नायनाट केला असता. परंतु जीवनाचा अध्यात्मिक आयाम त्याच्यासाठी शक्य नव्हता जोपर्यंत त्याची स्त्री त्याच्या शेजारी नव्हती. म्हणून, त्याला तिची कदर करावी लागली.

तारा चंद्र देवाच्या प्रेमात पडते

तारा चंद्र देवाच्या प्रेमात पडते | महाभारत भाग १: बृहस्पतीचा शाप आणि ताराचे मूल

तो जरी देवांच्या राजाचा पुजारी होता, बृहस्पतीला तो जो काही करत होता त्यासाठी ताराची गरज होती. तो फक्त तिला धरून राहत होता कारण अन्यथा त्याने त्याची नोकरी गमावली असती. आणि तो स्वतः सगळीकडे स्त्री लंपट होऊन फिरत होता. हे पाहून, एके दिवशी, ताराने वरती पौर्णिमेच्या चंद्राकडे पहिले, आणि ती चंद्र देवाच्या प्रेमात पडली. चंद्र स्वतः खाली पृथ्वीवर आला. ते एका मोठ्या प्रेमप्रकरणात अडकले, आणि काही काळा नंतर, ती त्याच्या बरोबर पळून गेली.

बृहस्पती संतापले, कारण ते केवळ त्यांची पत्नी गमावण्याइतकेच नव्हते तर त्यांची नोकरी, त्यांची प्रतिष्ठा गमावण्याबद्दल होते

बृहस्पती संतापले, कारण ते केवळ त्यांची पत्नी गमावण्याइतकेच नव्हते तर त्यांची नोकरी, त्यांची प्रतिष्ठा, समाजातील त्यांचे स्थान गमावण्याबद्दल होते, आणि ते यापुढे देवलोक, देवतांच्या जगात प्रवेश करू शकणार नव्हते. त्यांनी इंद्राला बोलावलं आणि म्हणाले, “मला माझी पत्नी परत हवी आहे. तुला तिला परत आणावं लागेल - अन्यथा मी तुझे कर्मकांड विधी पार पाडणार नाही.” इंद्राने हस्तक्षेप केला आणि ताराला परत येण्यास भाग पाडले. हि पहिलीच वेळ होती जेंव्हा एखाद्याला एका विशिष्ट कौटुंबिक रचनेला बांधील राहण्यास भाग पाडले गेले होते. जेंव्हा इंद्र म्हणाला, “तुला परत यावे लागेल,” तेंव्हा तारा उत्तरली, “नाही, माझे प्रेम तिथे वर आहे.” तो म्हणाला, "तुझ्या भावनांना महत्व नाही." तुझा धर्म बृहस्पती बरोबर राहण्यात आहे, कारण तू त्याच्याबरोबर राहिल्याशिवाय माझे कर्मकांड विधी गडबड होतील." म्हणून तिला परत आणण्यात आले.

तारा आणि चंद्राचे मुल

तारा गर्भवती होती. ते कोणाचे मूल आहे हे बृहस्पतीला जाणून घ्यायचे होते. ताराने बोलण्यास नकार दिला. लोकं जमले. तरीही तिने बोलण्यास नकार दिला. मग गर्भाशयातूनच, न जन्मलेल्या मुलाने प्रश्न विचारला, "मी खरोखर कोणाचा मुलगा आहे?" या मुलाच्या बुद्धिमत्तेचे कौतुक म्हणून, ज्याला गर्भाशयात असतानाच, तो कोणत्या बीजापासून बनवलेला आहे हे जाणून घेण्याची इच्छा होती, लोकं म्हणाले, "तू तुझ्या पतीला सांगण्यास नकार देऊ शकतेस; तू देवांना सांगण्यास नकार देऊ शकतेस, पण तू तुझ्या न जन्मलेल्या मुलाला सांगण्यास नकार देऊ शकत नाहीस." तारा म्हणाली, "हे चंद्राचे मुल आहे."

मुलाचा जन्म झाला आणि त्याचे नाव बुध ग्रहावरून बुधा असे ठेवण्यात आले.

त्याची पत्नीच्या पोटात दुसऱ्या माणसाचा मूल वाढत असल्याचा बृहस्पतीला खूप राग आला. त्याने मुलाला शाप दिला, म्हटलं, "तू एक नपुसंक होशील - पुरुष हि नाही किंवा स्त्री हि नाही." मुलाचा जन्म झाला आणि त्याचे नाव बुध ग्रहावरून बुधा असे ठेवण्यात आले. जसं तो मोठा झाला, त्याने त्याच्या आईकडे आकांत केला, " मी काय करायला पाहिजे?, मी पुरुष म्हणून जगायला पाहिजे का? कि मी स्त्री म्हणून जगू? माझा धर्म काय आहे? मी संन्यासी व्हायला पाहिजे का? कि मी लग्न करायला हवं? मी पुरुषाशी लग्न करू कि स्त्री सोबत करू?" तारा म्हणाली, "अस्तित्वात या सर्व कोट्यवधी आणि अब्जावधी ताऱ्यांना, इतर सर्व प्रकारच्या वस्तू, आणि अनेक प्रकारचे जीवजंतू जे पुरुष नाहीत किंवा स्त्री नाहीत किंवा देवही नाहीत किंवा दानवही नाहीत या सर्वांना जागा आहे. जेंव्हा अस्तित्वात या सर्वांना जागा आहे, तर तू काळजी करू नकोस - तुला सुद्धा, तिथे जागा आहे. तुझ्यासाठीही तिथे जीवन असेल. तू फक्त सहजपणे रहा. तुझ्याकडे जीवन नक्की येईल."

पुढे चालू…