मणिकर्णिका: शिवाची गंमत आणि विष्णूचा घाम

सद्‌गुरु :काशीमध्ये असण्याचे महत्त्व काय आहे? “काशी” या शब्दाचा अर्थ म्हणजे तेजस्वी किंवा अधिक प्रकाशमय स्तंभ असा आहे. शिवा जो एक खेळवणारा होता त्याने पार्वतीला कानातले आभूषण काढायला सांगितले याबद्दलची कथा तुम्हाला ठाऊक आहे. तिने ते काढून टाकले; ते खाली पडले आणि पृथ्वीवर पडले. विष्णू स्त्रियांच्या बाबतीत थोडा कमकुवत असल्याने आपला पराक्रम दाखवावा असे त्याला वाटले. तो कानातले घेण्यास गेला. ते मिळविण्यासाठी जेव्हा त्याने पृथ्वीवर खोलवर खोदले तेव्हा त्याला इतका घाम फुटू लागला की त्याचा घाम एका तलावामध्ये जमा झाला, जो मणिकर्णिका बनला. मणिकर्णिका प्रत्यक्षात एक तलाव किंवा कुंड होतं. त्या काठावर लोक अंत्यसंस्कारही करीत होते.

प्रकाशाचा हा झोत काशीचे प्रतीक आहे, कारण काशी म्हणजे एक यंत्र आहे, विश्व आपल्याकडे आणण्याचा एक वैश्विक प्रयत्न आहे.

जेव्हा त्याने वर पाहिले तर शिव प्रकाशाच्या स्तंभासारखा दिसत होता. तुम्ही कधी आकाशात एखादी शक्तिशाली टॉर्च मारली आहे का? जर तुम्ही रात्री प्रयत्न केला असेल तर, टॉर्च सामर्थ्यवान असेल तर, तुम्ही प्रकाशाचा स्तंभ वर जाताना पाहिला असेल. तो कोठे संपते हे आपल्याला ठाऊक नसते. प्रत्यक्षात कोठे संपतो हे कोणालाही माहित नाही. असे वाटते की या प्रकाशाचा झोत अनंतापर्यँत पडेल. प्रकाशाचा हा झोत काशीचे प्रतीक आहे, कारण काशी म्हणजे एक यंत्र आहे, विश्व आपल्याकडे आणण्याचा एक वैश्विक प्रयत्न आहे.

विश्वाकडे जाण्याचा रस्ता

कारण, सुदैवाने या ब्रह्मांडातील प्रत्येक लहानसा भाग - अणूपासून ते अमीबापर्यंत, एक पेशीय प्राण्यापर्यंत, विश्वातील आणि मोठ्या ब्रह्मांडातील सर्व काही मूलत: एकाच आराखड्याने बनविलं गेलं आहे. मायक्रोकॉसम आणि मॅक्रोक्रॉझमला, मर्यादित आणि अमर्यादिताला, अस्तित्वाच्या भौतिक अभिव्यक्ती आणि अमर्याद पैलूला एकत्र आणण्याचा एक प्रयत्न आहे काशी. असे नाही की आपण ते एकत्र आणले पाहिजे; विश्व आधीच एकत्रित आहे. आपल्या जिवंत राहण्याच्या धडपडीपलीकडे जाण्यासाठी आणि अस्तित्वाकडे पाहण्यासाठी आपल्याला स्वतःची दिशा बदलावी लागेल. यासाठी आपल्याला उपकरणांची आवश्यकता होती.

जर तुम्हाला विश्वाच्या स्वरूप समजले, तर अचानक तुमची कार्य करण्याची पद्धत, तुम्ही ज्या सृष्टीत आहात त्या अस्तित्वाशी तुम्ही लावलेला तुमचा संबंध पूर्णपणे भिन्न असेल. हे करण्यासाठी तुम्हाला काशीमध्ये रहावे लागेल का? नाही, आवश्यक नाही. हे असे आहे की तुम्ही आरोग्य कोठेही मिळवू शकता परंतु बरेच लोक आजारी असताना रुग्णालयात जातात कारण काही सामान्य साधने, सुविधा, औषधे आणि कौशल्य उपलब्ध असणारी ही एक जागा आहे. काशी हे एक प्रकारचे ठिकाण आहे, जिथे एक संपूर्ण प्रणाली होती - ज्ञान, यंत्रणा, पद्धती, क्षमता - आणि प्रत्येक प्रकारचे तज्ञ तेथे एकेकाळी राहत होते.

गुप्त ऊर्जा रचना

..आख्यायिका असे म्हणतात की काशी जमिनीवर नसून शिवाच्या त्रिशूलच्या शिखरावर आहे.

मानवी जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शरीराची मर्यादा जाणून घेणे. काल तुमचा जन्म झाला होता; उद्या तुम्हाला पुरले जाईल - फक्त आज जगण्यासाठी आहे. हे अस्तित्वाचे स्वरूप आहे. आणि मृत्यू येण्यापूर्वी जीवन बहरणे आवश्यक आहे. म्हणून देशभरात आपण या हेतूसाठी उपयोगी असलेली प्रत्येक संभाव्य यंत्रणा बसविली. यासारख्या बर्‍याच यंत्रणा आहेत - त्यापैकी बहुतेक दुर्दैवाने नष्ट झाल्या आहेत काशिसकट जी मुख्यत्वे विचलित झाली आहे, परंतु त्यातील ऊर्जेचा भाग अद्याप जिवंत आहे. कारण नेहमी, जेव्हा आपण या निसर्गातील जागा प्राणप्रतिष्ठित करतो, त्यात ध्यानालिंग पण आले तेव्हा भौतिक संरचना केवळ एक आधार असतो. सामान्यत: आख्यायिका असे म्हणतात की काशी जमिनीवर नसून शिवाच्या त्रिशूलच्या शिखरावर आहे.

माझ्या अनुभवात मी जे पाहतो आहे ते म्हणजे काशीची खरी रचना जमिनीपासून सुमारे 33 फूट उंचीवर आहे. जर आपल्याला काही कळत असेल तर 33 फूट उंचीच्या पलीकडे आपण काहीही बांधू नये. परंतु आपण बांधलं आहे, कारण जगात नेहमीच शहाणपण फारच दुर्मिळ असते. आणि भौमितीय गणनेनुसार उर्जा रचना 7200 फूटांपर्यंत असू शकते. म्हणूनच त्यांनी त्यास “प्रकाशाचा स्तंभ” म्हटले, कारण ज्यांना डोळे आहेत त्यांना ते दिसले की ही उंच रचना आहे. आणि ते तिथेच थांबलेले नाही - यामुळे पलीकडे काय आहे त्यामध्ये त्याने प्रवेश दिला. कल्पना अशी आहे की या प्रणालीमधून मानवांनी स्वत: मध्ये असे काही साध्य केले पाहिजे जे बर्‍याच, अनेक लोकांच्या हजारो वर्षांच्या आत्मज्ञानाच्या सारातून येते. जर तुम्हाला गोष्टी स्वत: हून जाणूनघ्यायच्या असतील तर ते चाक शोध पुन्हा लावण्यासारखे आहे - अनावश्यकपणे संपूर्ण वेदनादायक प्रक्रियेतून जावे लागेल. परंतु, जर तुम्हाला इतरांच्या ज्ञानाद्वारे आत्मज्ञान हवं असेल तर तुम्ही नम्र असलेच पाहिजे.

इतर बऱ्याच जणांच्या ज्ञानावर बांधणी

शिवाला इथे यायचे होते कारण शहर खूप सुंदर होते. तो येण्यापूर्वी ते आधीच एक अभूतपूर्व शहर होते.

बर्‍याच लोकांना पलीकडे घेऊन जात येईल यासाठी ही व्यवस्था केली होती. लोक आले आणि सर्व प्रकारच्या पद्धती आणि यंत्रणा स्थापित केल्या. एकेकाळी 26,000 हून अधिक मंदिरे होती - त्यातील प्रत्येकाची स्वतःची एक पद्धत होती, माणूस कसा आत्मज्ञान मिळवू शकतो याबद्दल. या 26,000 मंदिरांनी उपमंदिरे विकसित केली ; मंदिराचे बरेच कोन त्यांच्या स्वत: लहान मंदिरे बनली, तेव्हा त्यांची संख्या 72,000 मंदिरांवर गेली, तेव्हा काशी नावाची ही यंत्रणा संपूर्ण वैभवशाली होती आणि हे एका रात्रीत घडले नाही. मूलभूत रचना कोणत्या काळात घडली हे कोणालाही माहिती नाही. असे म्हणतात की सुनिरासुद्धा जो ४०००० वर्षांपूर्वी होता तो काहीतरी शोधण्यासाठी येथे आला होता. ४०००० वर्षापूर्वी सुनीरा होता. त्यावेळीच ते एक भरभराटीला आलेले शहर होते.

मार्क ट्वेन यांनी "हे दंतकथेपेक्षा जुने आहे" असे म्हटले आहे. हे किती पुरातन आहे हे कोणालाही ठाऊक नाही. शिवाला इथे यायचे होते कारण शहर खूप सुंदर होते. तो येण्यापूर्वी ते आधीच एक अभूतपूर्व शहर होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांना मंदिराचे तीन थर येथे सापडले जे दीर्घ काळासाठी बंद होते. याचा अर्थ असा की काही काळाने हे बुडलेले शहर पुन्हा पुन्हा तयार करण्यात आले. शहराचे तीन ते पाच थर आहेत कारण कालांतराने पृथ्वी स्वतःचा पुनर्वापर करते.

काळाचा प्रकोप

जोपर्यंत ते मुक्तीच्या शोधात होते, आणि त्याबद्दल ते प्रामाणिक होते, त्यांना पाहिजे ते करू शकले. अशाप्रकारे मुक्ती ही महत्त्वपूर्ण मानली गेली - तुम्हाला या आयुष्यात आत्मज्ञान व्हायलाच हवे.

काशीचा सतत सहा, सात शतके सतत नाश केला गेला; तरीही, तुम्ही थोडे संवेदनशील असल्यास, ते अद्याप एक विलक्षण स्थान आहे. आपण ते पुन्हा पूर्ण वैभवात आणू शकतो? मला असे वाटत नाही. एक गोष्ट म्हणजे - खूप विनाश झाला; दुसरी गोष्ट म्हणजे - अशाप्रकारे काहीतरी परत उभे करणे म्हणजे मूर्खांचे नंदनवन आहे. हे बर्‍याच वेळा नष्ट केले गेले आहे, परंतु काशीचा प्रणमयकोष जमिनीपासून 33 फूट उंचीवर असल्यामुळे तो अद्याप जिवंत आहे. नुकसान बरंच आहे, परंतु ते अद्याप एक अपूर्व स्थान आहे. त्याकडे पाहण्याचा एक मार्ग म्हणजे हे 72,000 खोल्या असलेल्या घरासारखे आहे. ऊर्जा स्वरूपात 3000 हून अधिक खोलून जिवंत आहेत.

जीवनाच्या प्रत्येक आयामासाठी, मानवाच्या प्रत्येक गुणवत्तेसाठी त्यांनी लिंग तयार केले. अशाप्रकारे ही मंदिरे अस्तित्वात आली; प्रत्येक पैलूसाठी एक लिंग आहे. काही टोकाची, काही फार सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह, काही सामाजिक मान्यतेपलीकडे - सर्व प्रकारच्या गोष्टी समांतरपणे अस्तित्वात आहेत. कोणालाही कशामध्येही दोष आढळला नाही. जो कोणी मुक्ती शोधत होता तो पाहिजे ते करू शकत असे. जोपर्यंत ते मुक्तीच्या शोधात होते, आणि त्याबद्दल ते प्रामाणिक होते, त्यांना पाहिजे ते करू शकले. अशाप्रकारे मुक्ती ही महत्त्वपूर्ण मानली गेली - तुम्हाला या आयुष्यात आत्मज्ञान व्हायलाच हवे.

केवळ मुक्तीसाठीच सर्व काही

मुक्ति म्हणजे स्वातंत्र; मुक्ती म्हणजेच मूलत: स्वतःपासून मुक्त होणे - कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातील एकमेव उपद्रव आहात.

मुक्ति मिळविण्याची संपूर्ण प्रक्रिया या मुद्दय़ातून येते: ज्याला कर्म असे म्हणतात ते तुम्ही नाहीसे करू इच्छित आहात - स्मृती आणि कल्पनेचा एक ढग सर्व काही दाखवत आहे आणि सत्य नाही अशा बर्‍याच गोष्टींवर तुम्हाला विश्वास ठेवायला लावून फसवत आहे. तुम्ही इथे असताना, फक्त तुमच्यात जी एकमेव आहे ती म्हणजे जीवन होय; बाकी सर्व तुमच्या कल्पना आहेत. मुक्ति म्हणजे फक्त एवढेच : भ्रम जायलाच पाहिजे. तुम्ही भ्रमांशी लढू शकत नाही - तुम्हाला भ्रमाचे स्रोत शोधावे लागतील. मुक्ति म्हणजे स्वातंत्र; मुक्ती म्हणजेच मूलत: स्वतःपासून मुक्त होणे - कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातील एकमेव उपद्रव आहात.