प्र: नमस्कार सद्गगुरु. तुम्ही ग्रामीण भागातील समाजांपर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेसाठी खेळाचा वापर करून घेत आहात हे जाणून खूपच आश्चर्य वाटले. इशा फाऊंडेशनने खेळाला समुदाय सुधारणा आणि त्यांच्यापर्यंत पोचण्याचा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून वापर करून घेण्याची सुरुवात कशी केली?

सद्गगुरु: हे फार वर्षांपूर्वी घडले जेंव्हा आम्ही आमचा पहिला अॅक्शन फॉर रूरल रिजुव्हीनेशन कार्यक्रम सुरू केला. आम्हाला ग्रामीण जनतेला एक ध्यान प्रक्रिया द्यायची होती. जेंव्हा आम्ही पहिला वर्ग सुरू केला, शंभराहून थोडी अधिक माणसे आली.

तिसर्‍या दिवशी, आम्ही प्रत्येकाला दुपारचे भोजन वाढले. पण नंतर चौथ्या दिवशी मात्र, निम्म्याहून अधिक लोकं परत आली नाहीत. मी विचारले, “असे का?” कारण दुसर्‍या इतर जातीच्या लोकांसोबत एकत्र भोजन घेणे त्यांच्यासाठी योग्य नाही म्हणून त्यांना येऊ नका असे सांगण्यात आले होते. मी ठरविले की, लोक जर जातपातीच्या भेदभावानं ह्यात भाग घेत असतील तर मी हा कार्यक्रम पुढे सुरू ठेवणार नाही. त्यामुळे मी तो कार्यक्रम अर्धवटच थांबवला.

जिथे कुठे आम्ही कोणताही ध्यान कार्यक्रम शिकवतो, तेंव्हा लोकांनी ध्यान सुरू करण्यापूर्वी, लोकांना नेहेमीच सोप्या  सोप्या खेळांसाठी एक तास वेळ ठेवलेला असतो, असा खेळ खेळल्याने लोक अक्षरशः लहान मुलांप्रमाणे रमतात.

पण  नंतर, जेंव्हा मी त्यावर विचार केला, तेंव्हा माझ्या असे लक्षात आले की ही समस्या काही हजार वर्षे जुनी आहे. आणि ती एका रात्रीत सोडवली जाणारी नाही. समस्या अशी होती, की मी त्यांना एकत्र भोजन घेण्यास संगितले होते, जो एक वादग्रस्त विषय बनला. म्हणून मग मी विचार केला, जर एकत्र भोजन घेणे ही त्यांचासाठी जर समस्या बनणार असेल, तर कार्यक्रमाचा आराखडा अशा प्रकारे तयार करू या की ते एकत्र खेळू शकतील.

एकत्र खेळण्यासाठी त्यांना काही अडचण नव्हती, आणि त्यामुळे अॅक्शन फॉर रूरल रिजुव्हीनेशनचे संपूर्ण स्वरूपच बदलून गेले कारण, एकत्र खेळल्यामुळे, ते स्वतःला विसरून गेले. हे खेळाचे सौंदर्य आहे – एकदा का तुम्ही खेळाच्या मैदानात उडी मारली, की तुमच्यात एक अशी त्यागभावना निर्माण होते ज्यामुळे तुमची स्वतःची ओळख विरून जाते.

 

आम्ही जगभरातील प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक वेळेस, खेळांचा वापर करून घेतो. जिथे कुठे आम्ही कोणताही ध्यान कार्यक्रम शिकवतो, तेंव्हा लोकांनी ध्यान सुरू करण्यापूर्वी, लोकांना नेहेमीच सोप्या  सोप्या खेळांसाठी एक तास वेळ ठेवलेला असतो, असा खेळ खेळल्याने लोक अक्षरशः लहान मुलांप्रमाणे रमतात. ते ओरडतात, पळतात आणि खेळतात. तर अशी तन्मयतेने खेळण्याची भावना नसेल, लोक जर ओरडू शकत नसतील, हसू शकत नसतील आणि उड्या मारू शकत नसतील,  तर नक्कीच ते ध्यान सुद्धा करू शकणार नाहीत.

सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे

जात-पात आणि इतर प्रकारचे पूर्वग्रह या अशा गोष्टी आहेत, ज्या पिढ्यानपिढ्या जोपासल्या गेलेल्या आहेत. परंतु आमच्या असे निदर्शनास आले, की एकदा गावात संघ स्थापन झाले आणि संपूर्ण तमिळनाडू राज्यामध्ये स्पर्धांची सुरुवात झाली, की जो कोणी चांगला खेळत होता, तो लोकप्रिय बनला. कोणीही त्याला जातीवरून ओळखले नाही – तो त्यांच्या गावाचा विजेता होता आणि त्यांच्या दृष्टीने तेच सर्वात महत्वाचे होते. खेळामुळे जातीव्यवस्था एका पातळीवर आली. अगदी संपूर्णपणे नसली तरीही किमान काही प्रमाणात. त्यामुळे एकमेकांच्या समाजातील संपर्क काही प्रमाणात सुरू झाला. 

Sadhguru's quote on sport | How Sports Can Build the Nation

 

आजसुद्धा, जेंव्हा त्यांचे सामने होतात, तुम्ही पहाल सर्व समुदाय एकत्र येऊन खेळतात. ते कोण आहेत याचा त्यांना विसर पडलेला असतो. सुरूवातीला, कदाचित ते जेंव्हा उभे रहात असतील, तेंव्हा ते त्यांच्या स्वतःच्या लोकांसोबत उभे रहात असतील. पण जशी खेळातील रंगत वाढत जाते, तेंव्हा प्रेक्षक देहभान विसरतात आणि एकमेकात मिसळून जातात. ते एकमेकांची पाठ थोपटतात – जे कोण आहेत हे ते विसरून जातात.

हेच खेळाचे सौंदर्य आहे. त्यात सहभागी न होता तुम्ही खेळ खेळूच शकत नाही. सहभाग हा कोणत्याही खेळाचे मूलतत्व आहे. सहभाग नसेल तर खेळ होणे अशक्य. खेळ सहभागीत्वाची अशी जाणीव करून देतो की लोक मग अधिक मोठ्या गोष्टी करायला तयार होतात. आम्ही ग्रामीण भागात खेळांचा वापर लोकांमध्ये स्थैर्य आणि ध्यान अभ्यास करण्यासाठी अतिशय परिणामकारकरित्या करत आहोत, जे त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी शक्य होईल याची कल्पना सुद्धा केली नव्हती. स्वामी विवेकानंदांनी तर असे सांगितले होते, “प्रार्थना करण्यापेक्षा, तुम्ही चेंडूला लाथ मारताना देवाच्या अधिक जवळ असता.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#NationalSportsDay #KheloIndia #Sadhguru #Sports

A post shared by Sadhguru (@sadhguru) on

खेळ आणि भारताचे भविष्य

प्र: एक देश म्हणून आपल्याला असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. तर भारत एक राष्ट्र म्हणून होणार्‍या विकासामध्ये खेळ काय भूमिका बजावू शकेल असे तुम्हाला वाटते?

सद्गगुरु: एक गोष्ट अशी आहे, की शंभर कोटी लोकांसाठी आपल्याकडे पुरेसे खेळ उपलब्ध नाहीत. आपल्याकडे असलेल्या शंभर कोटी लोकांमधून, या पृथ्वीवरील प्रत्येक खेळासाठी आपला संघ असायला हवा. जेंव्हा कोस्टारिकासारखा पन्नास लाख लोकसंख्या असलेला देश फुटबॉलच्या विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांचा संघ पाठवू शकतो, तर एकशे पंचवीस कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातून आपण एक संघ सुद्धा का तयार करू शकत नाही?

 

तसे केवळ आपण खेळाला कधीही आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग समजलेले नसल्यामुळेच घडलेले आहे. कित्येक मार्गांनी, आपण या देशातील खिलाडूवृत्ती सोडून दिलेली आहे, ज्याची आज आपण फार मोठी किंमत मोजत आहोत. सर्व स्तरांवर खेळ पुन्हा सुरू करण्याची वेळ आता आलेली आहे.

शाळांमध्ये, मुलांमध्ये खेळांची आवड निर्माण होण्यासाठी शाळेच्या वेळेच्या किमान पंधरा ते वीस टक्के वेळ खेळावर खर्च करणे हे अतिशय महत्वाचे आहे. मुलांना फक्त वर्गातील एका  कोपर्‍यात बसवून ठेवण्या ऐवजी, मुलांमध्ये खेळांची आवड निर्माण करून मुलांना कितीतरी अधिक गोष्टींचे शिक्षण देता येऊ शकते. त्याचे शरीर आणि त्याचा मेंदू विकसित आणि चपळ व्हायला पाहिजे. जर तुमचे शरीर आणि तुमचा मेंदू चपळ नसेल, तर तुम्ही त्या मुलांना काय शिकवणार आहात?

शाळांमध्ये, मुलांमध्ये खेळांची आवड निर्माण होण्यासाठी शाळेच्या वेळेच्या किमान पंधरा ते वीस टक्के वेळ खेळावर खर्च करणे हे अतिशय महत्वाचे आहे.

आणि प्रत्येक वेळेस तो स्पर्धात्मक खेळच असायला हवा असे नाही. गंमत म्हणून सुद्धा खेळ खेळले जाऊ शकतात, पण लोकांनी मात्र खेळलं पाहिजे. शरीर आणि मेंदू विकसित होण्यासाठी ते अतिशय महत्वाचे आहे. आणि त्यानंतरच आपण सक्षम असलेली मानवजात विकसित करू शकू. जर ती क्षमता लहान वयात विकसित केली गेली नाही, तर नंतर देशातील बहुतांश जनता धडधाकट राहणार नाही.

आयुष्यभरासाठी धडधाकट

काही दिवसांपूर्वी मी एका अतिशय मोठ्या व्यावसायिक लोकांच्या गटाशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी बोलत होतो. मी म्हणालो, “तुमच्यापैकी कोणीही आयुष्यभरासाठी निरोगी नाही.” ते म्हणाले, “तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय? आमचे तर उत्तम चालले आहे.” मी उत्तर दिले, “उद्या सकाळी, जर तुम्ही सर्व जण रस्त्यावरून चाललेले आहात – आणि असे समजूया की एक वाघ आलाय. तर तुमच्यापैकी कितीजण झाडावर चढून आपला जीव वाचवू शकतील? तुमच्यापैकी एकालाही तसे करता येणार नाही. फक्त तो रस्ते झाडणारा माणूस, कदाचित तो झाडावर चढून आपला जीव वाचवू शकेल. तुमच्यापैकी प्रत्येकजण, जो असा विचार करतो आहे की तुम्ही यशस्वी आहात, तुम्ही त्या वाघाची सकाळची न्याहारी बनाल.

देश म्हणून अशी कोणतीही वेगळी गोष्ट नाही – देश म्हणजे फक्त माणसेच आहेत, आणि यामध्ये, खेळाचा खूप मोठा महत्वाचा वाटा आहे.

सामान्यतः भारतामध्ये आरोग्याची पातळी कमी दिसून येते. गेल्या काही वर्षांमध्ये, त्याविषयी थोडासा उत्साह वाढलेला दिसत आहे, पण तो  फक्त समाजाच्या एका विशिष्ट स्तरात वाढलेला दिसून येतो. तो देशभर सर्वत्र पसरला पाहिजे.  

आपल्याला एक महान देश निर्माण करायचा असेल, तर सर्वप्रथम आपल्या देशातील माणसे निरोगी आणि बलवान असणे आवश्यक आहे, आणि तसे घडण्यासाठी खेळ अतिशय महत्वाची भूमिका पार पडू शकतात. वैयक्तिकरित्या माणसांना योग्य रीतीने न घडवता –  सुदृढ, निरोगी, आणि चपळ – तुम्ही कधीही एक महान देश घडवू शकणार नाही. देश म्हणून अशी कोणतीही वेगळी गोष्ट नाही – देश म्हणजे फक्त माणसेच आहेत, आणि यामध्ये, खेळाचा खूप मोठा महत्वाचा वाटा आहे.

Editor’s Note: On Dec 9, 2018, Isha Foundation will conduct Isha Gramotsavam, an annual celebration of sport and rural spirit, that will draw 40,000 players from thousands of villages in southern India. Find out more.

Fourteenth Isha Gramotsavam