FILTERS:
SORT BY:
नातेसंबंध म्हणजे केवळ अनुरूप असणे, सहवास किंवा एकमेकांकडून सुख शोधणे नव्हे; तर ती एक असे ऐक्य घडवून आणण्याची संधी आहेत, जी एका अधिक मोठ्या शक्यतेचा मार्ग तयार करते.
When you spend time in the forest, you realize you are just one more Life. It is a huge spiritual step to feel for Life around you the way you feel for yourself.
ही अशी वेळ आहे, जेव्हा सूर्य आपल्या पूर्ण तेजाने तळपत असतो. जीवन देखील स्वतःच्या पूर्णत्वाला पोहोचलेले असते. जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुमच्या जीवनाला फळ यावे, जर तुम्हाला परिवर्तन हवे असेल - तर हीच ती वेळ आहे.
दुसऱ्याच्या दुःखातून कोणीही कल्याण साध्य करू शकत नाही. जरी तुम्हाला तात्पुरता फायदा झाला तरी, त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल.
मन - जे सर्वात मोठा चमत्कार आहे, तेच अनेक लोकांसाठी दुःख-निर्मिती करणारे यंत्र बनले आहे.
तुमचा आनंद 'नंतर'साठी राखून ठेवू नका. जेव्हा तुम्ही आनंदी असता, तेव्हा तुमचे संपूर्ण जीवन एक उत्सव असतो.
ज्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल पूर्ण खात्री असते, त्यांनी आपली बुद्धिमत्ता शीतगृहात बंदिस्त करून ठेवली आहे.
विचार आणि भावनांनी तुम्ही स्वतःला जितके वेगळे बनवाल, तितके जीवनापासून दूर जाल.
पाणी जीवन निर्मितीचा घटक आहे. जलसंपदा वाचवणे म्हणजे जीवन वाचवणे होय.
कृपेप्रति ग्रहणशील बनण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 'स्व' कमी करणे.
महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर तुमचा वेळ आणि आयुष्य वाया घालवू नका. तुमच्यासाठी जे खरोखर महत्त्वाचं आहे, त्यासाठी स्वतःला शंभर टक्के समर्पित करा – आजच, उद्या नाही.
श्रद्धा म्हणजे तुम्ही अशा गोष्टींबद्दल निष्कर्ष काढले आहेत, ज्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही.