Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
महात्मा म्हणजे एक महान व्यक्तिमत्त्व. जेव्हा एखादी व्यक्ती सर्व प्रकारच्या ओळखींपलीकडे जाऊन 'जीवन' म्हणून कार्य करते, तेव्हाच ती महान व्यक्तिमत्त्व बनते.
जेव्हा तुम्ही स्वतःच्याच गोष्टींनी भरलेले असता तेव्हा तुम्ही ग्रहणशील राहू शकत नाही. तुम्ही जितकं स्वतःला कमी ठेवाल, तितकं जास्त तुम्हाला मिळतं. जितकं स्वतःला मोठं मानाल, तितकं कमी तुम्हाला कमी मिळतं.
आत वळणे हा काही प्रवास नाही. तिथे कोणतेही अंतर नसते.
प्रत्येक जीवात आत्मज्ञानाचं बीज असतं. आत्मज्ञान हा एक साक्षात्कार आहे.
प्रेम हा काही व्यवहार नाही. तो तुमच्या भावनांचा एक विशिष्ट उत्साह आणि गोडवा आहे.
इतर जे करत आहेत तेच करण्याची काहीही गरज नाही. तुम्हाला जे खरोखर महत्त्वाचं वाटतं, तेच तुम्ही केलं पाहिजे.
ज्याला तुम्ही सर्वोच्च मानता, त्याचा ध्यास धरा. या दृष्टीकोनातून जगणे हीच मुळात एक उन्नत करणारी, मुक्त करणारी आणि आनंददायी प्रक्रिया आहे.
आध्यात्मिक प्रक्रियेचं पहिलं मूलभूत तत्त्व म्हणजे सगळी गृहीतकं सोडून देणं.
जर तुम्हाला हे कळलं की, अणूपासून ते विश्वापर्यंतच्या सर्व गोष्टी आकलनापलीकडच्या आहेत, मग स्वाभाविकपणे तुम्ही नतमस्तक व्हाल आणि हळुवारपणे चालाल.
जेव्हा तुमचे नातेसंबंध हे दुसऱ्याकडून आनंद मिळवण्याऐवजी स्वतःचा आनंद वाटण्यावर आधारित असतील, तेव्हा कोणाशीही तुमचे नातेसंबंध अतिशय सुंदर असतील.
खुलेपणा म्हणजे कोणतेही निष्कर्ष न काढणे - प्रत्येक गोष्टीकडे ती जशी आहे तशी पाहणे.
शांतता ही आपण स्वतःच्या अंतरंगात कसे आहोत, याचा परिणाम आहे.