Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
जर तुम्ही लग्नाला एक 'संस्था' म्हटले, तर लोक स्वाभाविकपणे त्यातून सुटका करून घेण्याची इच्छा बाळगतील.
तुमचे आंतरिक कल्याण खुद्द ईश्वर देखील ठरवू शकत नाही. जर तुम्ही स्वतःला दुःखी करण्यास नकार दिला, तर कोणीही तुमच्यावर दुःख लादू शकत नाही.
प्रेम म्हणजे स्वतःला विलीन करणे. ते स्वतःला झोकून देण्यातून घडते - कोणत्याही हिशोबातून किंवा सोयीतून नव्हे.
जीवन सर्वसमावेशक आहे. फक्त तुमचं मनच अलिप्त आहे.
आत्मविश्वास आणि मूर्खपणा हे एक अत्यंत धोकादायक मिश्रण आहे, पण ते अनेकदा एकत्रच आढळतात.
जेव्हा तुम्ही तुमच्या स्मृतींमुळे किंवा कल्पनाशक्तीमुळे दुःखी होता, तेव्हा तुम्ही अशा गोष्टीमुळे दुःखी होत असता जिचे अस्तित्वच नाहीये.
या पृथ्वीचा विनाश करणारे काही दुष्ट लोक नाहीत - तर सुखाच्या शोधात असलेले आपण सर्वजणच आहोत.
आपण या पृथ्वीवर फक्त राहत नाही आहोत - तर आपण स्वतःच ही पृथ्वी आहोत. जर तुम्हाला हे आज समजले नाही, तर जेव्हा तुम्हाला पुरले जाईल, तेव्हा तुम्हाला ते समजेल.
शांतता आणि आनंद या अशा गोष्टी नाहीत, ज्या तुम्हाला जीवनाच्या शेवटी प्राप्त होतात; त्या जीवनाचा मूलभूत पाया आहेत.
स्वतःच्या अंतरंगात कसे असावे हे तुम्हीच ठरवले पाहिजे. आध्यात्मिक असणे म्हणजे नेमके हेच आहे.
अंतर्मनातील सुखाचे क्षण बाह्य परिस्थितीलाही अद्भुत बनवतात. पण, जर तुम्ही अंतर्मनातून सुस्थितीत नसाल, तर वसंत ऋतूतही तुम्हाला क्लेश सोसावे लागू शकतात.
तुम्हाला जगाला हाताळण्याची गरज नाही. तुम्ही फक्त स्वतःला हाताळायला शिकलात, तर सर्व काही आपोआप हाताळले जाते.