Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
तुम्ही काय करता हे तुमच्यावर अवलंबून आहे, पण ते जाणीवपूर्वक केलं पाहिजे. हाच मानव असण्याचा अर्थ आहे
आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे जीवनापासून घटस्फोट घेणं नाही. हा जीवनासोबत कायमस्वरूपी प्रेमसंबंध आहे.
येशूंनी म्हटलं होतं, 'देवाचं राज्य तुमच्या अंतरंगात आहे.' योग ही या अंतरंगाला अनुभवण्याची एक पद्धत आहे. तुम्हाला नाताळच्या आनंदमय शुभेच्छा.
जितके तुम्ही तुमच्या मनामुळे ओळखले जाल, तितके स्वतःपासून दूर जाल.
तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मुलांसाठी, समाजासाठी आणि तुमच्या भोवतालच्या जगासाठी करू शकणारी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला विकसित करणे.
जर तुम्हाला एखाद्या झाडाची, प्राण्याची किंवा अस्तित्वातल्या कोणत्याही गोष्टीची वेदना स्वतःच्या शरीराच्या वेदनेप्रमाणे जाणवली असती, तर तुम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली असती.
ध्यान म्हणजे निःसंगच्या जाणीवेकडे पोहोचणं. ही संकल्पना तुमच्या शरीराच्या किंवा मनाच्या नियंत्रणाबद्दल नाही, तर त्यांना मुक्त करण्याबद्दल आहे
एकदा का तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेने काम केलं, तर यश सहज साध्य होईल.
योग म्हणजे जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये संतुलन साधणे आणि कौशल्याच्या नवीन पातळीवर पोहोचणे.
पैसा फक्त तुमच्या परिसराला सुखद बनवू शकतो. तो अंतर्गत सुख निर्माण करू शकत नाही.