Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
हे शरीर म्हणजे धरणीमातेकडून घेतलेलं कर्ज आहे. एके दिवशी हे कर्ज परत फेडावं लागेल.
अध्यात्मिक प्रक्रिया एका प्रवासासारखी असते - सतत बदल होत असतो. सतत एक प्रदेश.
प्रेम ही काही तुम्ही करण्याची गोष्ट नाही - ही तुम्ही बनण्याची गोष्ट आहे.
भावना या जीवनाचा रस आहेत. जेव्हा त्या नियंत्रणाबाहेर जातात, तेव्हा तो वेडेपणा ठरतो.
जर अज्ञानात आनंद असता, तर आतापर्यंत संपूर्ण जग आनंदाने धुंद असायला हवं होतं.
गुरू पौर्णिमा म्हणजे नुसता एक सण नाहीये - हा विकसित होण्याचा संकल्प आहे. तुमचं जीवन तुम्ही कसं अनुभवता ते तुम्हीच ठरवत आहात. तुम्ही परम मुक्ती जाणो ही माझी इच्छा आहे. गुरूची कृपा तुमच्यावर आहे. प्रेम आणि आशीर्वाद,
तुम्ही योगाचा उपयोग तुमची पाठदुखी बरी करण्यासाठी किंवा एकाग्रता वाढवण्यासाठी आणि मनःशांती मिळवण्यासाठी करू शकता - किंवा त्याचा उपयोग परमेश्वरापर्यंत पोहोचण्याची शिडी म्हणून करू शकता.
ज्यांना पाउलखुणा सोडायच्या आहेत, ते कधीच उडणार नाहीत.
शक्यता आणि वास्तव यामध्ये एक अंतर असतं. ते अंतर चालण्याची हिंमत आणि वचनबद्धता तुमच्यात आहे का?