Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
मन एक भयंकर मालक आहे, पण एक उत्कृष्ट नोकर आहे. तुम्ही त्याला तसंच ठेवलं पाहिजे.
भक्ती म्हणजे उपासना नव्हे. भक्ती म्हणजे तुमचा 'स्व' बाजूला ठेवणे.
मातृत्वाचं सौंदर्य हे केवळ प्रजननात नसून, ते दुसऱ्या एका जीवाला स्वतःचा एक भाग म्हणून सामावून घेण्याच्या ईच्छेमध्ये आहे.
चांगुलपणा ही एक गृहीत धरलेली भूमिका आहे. आनंद हाच खरा अनुभव आहे.
इथं माणसं वापरण्यासाठी नाहीत. इथं माणसं प्रेम करण्यासाठी आणि एकमेकांच्या सहवासासाठी आहेत. वस्तू वापरण्यासाठी असतात - माणसं नव्हे.
एक मानव म्हणून, तारे आणि ग्रह यांनी तुमच्या जीवनाचा अनुभव ठरवण्याची गरज नाही. तुमचा आंतरिक अनुभव तुम्ही स्वतःच ठरवला पाहिजे.
शरीर आणि मन ही अद्भुत साधनं आहेत; पण त्यांच्या उत्तुंग विकासासाठी, तुम्ही ती योग्य प्रकारे हाताळायला शिकलं पाहिजे.
मानवी जीवन केवळ उदर्निर्वाहापुरते मर्यादित नसते. उदर्निर्वाहाची काळजी घेतल्यानंतरच मानवी जीवनाची सुरुवात होते.
उठा आणि चमकून दिसा! जेव्हा तुम्ही आनंदी आणि उत्साही असता, तेव्हा लोक आपोआपच तुमच्या प्रेमात पडतात.
योग म्हणजे ऊर्जेच्या अखंड स्रोताशी जोडले जाणे होय.
तुमचं रोजचं वेळापत्रक तुम्हाला मारत नाहीये, तर तुमचं विचार आणि भावना यामध्ये गुरफटून जाणं तुम्हाला मारत आहे.
व्यत्यय हा तेव्हाच व्यत्यय ठरतो, जेव्हा तुम्ही स्वतःला त्यासाठी तयार केलेले नसते. जेव्हा तुम्ही आवश्यक ते 'आंतरिक कार्य' करता, तेव्हा तो पुढे जाण्यासाठीच्या पायरीचा एक दगड बनतो.