FILTERS:
SORT BY:
जीवनाचे बाह्य पैलू तुम्हाला सुखसोयी आणि आराम देऊ शकतात. फक्त आंतरिक पैलूच तुम्हाला समाधान देऊ शकतो.
तुम्ही कोण आहात' ही तुमची निर्मिती आहे. एकदा का तुम्हाला हे समजलं की, किमान तुम्ही स्वतःला तुमच्या पसंतीनुसार घडवायला हवं.
मुलांना जात, पंथ किंवा वर्ग यांच्या चौकटीत बसवण्याची गरज नाही. त्यांना त्यांच्या स्वरूपानुसार विकसित होऊ दिले पाहिजे.
जर तुम्ही भूतकाळातल्या अनुभवांना तुमच्या भविष्यावर वरचढ होऊ दिले, तर तुम्ही काहीच भविष्य नसेल याची खात्री करत असता – फक्त भूतकाळाचीच पुनरावृत्ती होत राहील.
भीती, राग, दुःख, नैराश्य आणि हताशपणा - या सर्व गोष्टी अशा मनाची निर्मिती आहेत, ज्यावर तुम्ही नियंत्रण मिळवलेलं नाहीये.
जर तुम्ही स्वतःहूनच आनंदी असाल, तर तुम्ही तुमचं सर्वोत्तम कराल, आणि तेच सर्वात महत्त्वाचं आहे.
तुमच्या आसपासच्या लोकांसाठी तुम्ही करू शकणारे सर्वात मोठं योगदान हेच आहे: की, तुम्ही एक अद्भुत मानव बना.
उत्कृष्टता म्हणजे दुसऱ्या कोणापेक्षातरी अधिक चांगले असणे नव्हे. याचा अर्थ असा की, तुम्ही अत्यंत सहजतेने स्वतःच्या सर्वोत्तम क्षमतेनुसार कार्य करत आहात.
कोणतंही नातं परिपूर्ण नसतं – ते नेहमी बदलत असतं. तुम्हाला दररोज ते चांगल्याप्रकारे निभवावं लागतं.
फक्त पैसे कमवण्याचा विचार करू नका – तर उत्तम आयुष्य जगण्याचा विचार करा. उत्तम आयुष्य जगण्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे, तुम्हाला ज्या गोष्टींची मनापासून आवड आहे त्या गोष्टी करणे.
जेव्हा तुम्ही आतून आनंदी असता, तेव्हा तुमच्या कृती साहजिकच काळजीपूर्ण, सौम्य आणि उदार बनतात.
ही दीपावली केवळ आपल्या भोवतालच्या प्रकाशाचा उत्सवच न ठरता,सर्वोच्च स्पष्टतेच्या म्हणजेच आत्मज्ञानाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल ठरो.प्रेम आणि आशीर्वाद,