Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
आनंदी व्यक्तीला हे जीवन संक्षिप्त वाटतं. पण जी व्यक्ती दुःखी-कष्टी असते, तिच्यासाठी ते भयंकर लांबलचक ठरतं.
विश्वास ठेवणे' हे फक्त एक मानसिक मद्य आहे. मद्य तुमच्या शरीरावर परिणाम करतं; विश्वास तुमच्या मनावर परिणाम करतो.
मन एक भयंकर मालक आहे, पण एक उत्कृष्ट नोकर आहे. तुम्ही त्याला तसंच ठेवलं पाहिजे.
भक्ती म्हणजे उपासना नव्हे. भक्ती म्हणजे तुमचा 'स्व' बाजूला ठेवणे.
तुम्हाला तुमच्या मनाला हाताळलं आलं पाहिजे. तुमच्या मनाने तुम्हाला हाताळू नये.
जर तुमचा एक डोळा ध्येयावर रोखलेला असेल, तर मार्ग शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त एकच डोळा उरतो. जीवनाचा प्रवास करण्याची ही काही कार्यक्षम पद्धत नव्हे.
इथं माणसं वापरण्यासाठी नाहीत. इथं माणसं प्रेम करण्यासाठी आणि एकमेकांच्या सहवासासाठी आहेत. वस्तू वापरण्यासाठी असतात - माणसं नव्हे.
एक मानव म्हणून, तारे आणि ग्रह यांनी तुमच्या जीवनाचा अनुभव ठरवण्याची गरज नाही. तुमचा आंतरिक अनुभव तुम्ही स्वतःच ठरवला पाहिजे.
जर तुम्ही जाणीवपूर्वक प्रतिसाद दिलात, तर तुम्हाला हवे ते घडेल. जर तुम्ही सहजप्रवृत्तीने प्रतिक्रिया म्हणून वागलात, तर दुसऱ्या कोणालातरी जे हवे आहे ते घडेल.
जर तुमच्या जीवनात कटू अनुभव आले, तर निवड ही आहे - तुम्ही एकतर शहाणे होऊ शकता किंवा दुखावलेले राहू शकता.
उठा आणि चमकून दिसा! जेव्हा तुम्ही आनंदी आणि उत्साही असता, तेव्हा लोक आपोआपच तुमच्या प्रेमात पडतात.
योग म्हणजे ऊर्जेच्या अखंड स्रोताशी जोडले जाणे होय.