Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
सर्व समस्यांचे मूळ तुमच्या आत आहे. आणि त्यावरचे उपाय देखील.
सुख सुंदर असतं, पण ते गुलाम बनवणारं असतं. आनंद अद्भुत असतो - आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तो मुक्त करणारा असतो.
कधीकधी जग तुमच्या विरोधात असतं; पण जर तुम्हीच स्वतःच्या विरोधात असाल, तर त्यावर कोणताही उपाय नसतो.
आनंदी व्यक्तीला हे जीवन संक्षिप्त वाटतं. पण जी व्यक्ती दुःखी-कष्टी असते, तिच्यासाठी ते भयंकर लांबलचक ठरतं.
अतिशय मोजकेच लोक स्वतःचं जीवन खऱ्या अर्थाने जगत आहेत; बाकीचे मात्र फक्त उदरनिर्वाह करत आहेत.
मुले केवळ उपदेश आणि तत्त्वज्ञानाने नव्हे, तर निरीक्षणाने आणि प्रत्यक्ष सहभागाने घडतात. तुम्हाला तुमचे मूल जसे बनावे असे वाटते, त्या प्रकारची व्यक्ती तुम्ही स्वतः बना.
चांगलं जगणं म्हणजे ऐश आराम नव्हे. चांगलं जगणं म्हणजे, तुम्ही अगदी एखाद्या खडकावर बसलात तरी तिथं आनंदानं कसं बसावं हे तुम्हाला ठाऊक असणं.
तुम्हाला तुमच्या मनाला हाताळलं आलं पाहिजे. तुमच्या मनाने तुम्हाला हाताळू नये.
जीवन हे शाप आहे की वरदान, हे तुमचं मन तुमच्या आज्ञा पाळतं की नाही, यावर अवलंबून असतं.
भविष्याचे नियोजन करणे ही एक गोष्ट आहे – आणि जे भविष्य अजून आलेच नाही, त्याबद्दल दुःखी होणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे.
लोक नेहमीच जगातल्या सर्वात अद्भुत व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न करतात. ती अद्भुत व्यक्ती तुम्ही स्वतःच का असू नये.
जर तुम्ही जाणीवपूर्वक प्रतिसाद दिलात, तर तुम्हाला हवे ते घडेल. जर तुम्ही सहजप्रवृत्तीने प्रतिक्रिया म्हणून वागलात, तर दुसऱ्या कोणालातरी जे हवे आहे ते घडेल.