FILTERS:
SORT BY:
जे लोक आध्यात्मिक मार्गावर आहेत, त्यांच्यासाठी एकटे असणे, लोकांपासून अंतर राखणे आणि मौन पाळणे या समस्या नाहीत - त्या संधी आहेत.
जीवनाचे बाह्य पैलू तुम्हाला सुखसोयी आणि आराम देऊ शकतात. फक्त आंतरिक पैलूच तुम्हाला समाधान देऊ शकतो.
तुम्ही कोण आहात' ही तुमची निर्मिती आहे. एकदा का तुम्हाला हे समजलं की, किमान तुम्ही स्वतःला तुमच्या पसंतीनुसार घडवायला हवं.
मुलांना जात, पंथ किंवा वर्ग यांच्या चौकटीत बसवण्याची गरज नाही. त्यांना त्यांच्या स्वरूपानुसार विकसित होऊ दिले पाहिजे.
आसक्त प्रवृत्ती अंधारासारखी असते - तुम्ही तिच्याशी लढू शकत नाही. तुम्हाला जागरूकतेचा प्रकाश पाडावा लागतो.
भीती, राग, दुःख, नैराश्य आणि हताशपणा - या सर्व गोष्टी अशा मनाची निर्मिती आहेत, ज्यावर तुम्ही नियंत्रण मिळवलेलं नाहीये.
जर तुम्ही स्वतःहूनच आनंदी असाल, तर तुम्ही तुमचं सर्वोत्तम कराल, आणि तेच सर्वात महत्त्वाचं आहे.
तुमच्या आसपासच्या लोकांसाठी तुम्ही करू शकणारे सर्वात मोठं योगदान हेच आहे: की, तुम्ही एक अद्भुत मानव बना.
फक्त हेतू बाळगल्याने गोष्टी घडत नाहीत. तो फक्त दिशा ठरवतो. प्रवास तुम्हाला स्वतःच करावा लागतो.
कोणतंही नातं परिपूर्ण नसतं – ते नेहमी बदलत असतं. तुम्हाला दररोज ते चांगल्याप्रकारे निभवावं लागतं.
फक्त पैसे कमवण्याचा विचार करू नका – तर उत्तम आयुष्य जगण्याचा विचार करा. उत्तम आयुष्य जगण्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे, तुम्हाला ज्या गोष्टींची मनापासून आवड आहे त्या गोष्टी करणे.
जेव्हा तुम्ही आतून आनंदी असता, तेव्हा तुमच्या कृती साहजिकच काळजीपूर्ण, सौम्य आणि उदार बनतात.