Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
खुलेपणा म्हणजे कोणतेही निष्कर्ष न काढणे - प्रत्येक गोष्टीकडे ती जशी आहे तशी पाहणे.
शांतता ही आपण स्वतःच्या अंतरंगात कसे आहोत, याचा परिणाम आहे.
बुद्धीला सत्यावर विजय मिळवायचा असतो. भक्ती मात्र सत्याचा केवळ स्वीकार करते.
तुमचं मानसिक नाट्य तुम्हाला हवं तसं घडलं पाहिजे. त्याचे दिग्दर्शक तुम्हीच आहात.
प्रत्येक जीवात आत्मज्ञानाचं बीज असतं. आत्मज्ञान हा एक साक्षात्कार आहे.
तुम्ही जे काही नकळतपणे करता, तेच तुम्ही जाणीवपूर्वक देखील करू शकता, आणि त्यामुळे खूप मोठा फरक पडतो.
जी व्यक्ती अस्तित्वाच्या पूर्णत्वाला ऐकते, तिच्यासाठी सर्व काही संगीतच असते.
तुमचं व्यक्तिमत्त्व म्हणजे सामाजिक अस्तित्वासाठी तुम्ही स्वतःच तयार केलेला एक मुखवटा आहे. समस्या ही आहे की, तो मुखवटा आता तुम्हाला चिकटून बसला आहे.
आध्यात्मिक प्रक्रियेचं पहिलं मूलभूत तत्त्व म्हणजे सगळी गृहीतकं सोडून देणं.
आध्यात्मिकतेचा तुम्ही राहता त्या वातावरणाशी काहीही संबंध नाही; ती तुम्ही स्वतःच्या आत जे वातावरण निर्माण करता त्याच्याशी संबंधित आहे.
आनंदाने खेळा, प्रामाणिकपणे खेळा आणि पूर्ण उत्साहाने खेळा. जीवन हे एक अत्यंत लहानसे नाटक आहे – आणि तेच सर्वात महान नाटक आहे.
यश म्हणजे एखादी गोष्ट अशा प्रकारे करणे जेणेकरून ती यशस्वी ठरेल.