Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
उत्साही जीवन जगणं तेव्हाच शक्य असतं, जेव्हा जीवनाच्या अनिश्चिततेवर तुम्ही नाचू शकता.
तुम्ही जर सध्या जे काही आहात त्यात समाधानी असाल, तर प्रयत्न केल्यावर तुम्ही काय होऊ शकता याची तुम्हाला जाणीव नाहीये.
एखादी अद्भुत व्यक्ती भेटेल अशी इच्छा बाळगू नका. तुम्ही स्वतःलाच ती अद्भुत व्यक्ती बनवा, ज्याची अपेक्षा तुम्ही इतरांकडून करता.
भूत आणि भविष्य फक्त तुमच्या आठवणीत आणि कल्पनेत अस्तित्वात असतात . तुम्ही फक्त एकच गोष्ट अनुभवता, तो म्हणजे सध्याचा क्षण.
सद्गुण म्हणजे नैतिकतेचे पालन करणे नव्हे. सगळ्या जीवांसाठी समावेशक बनणं, हाच सर्वात मोठा सद्गुण आहे.
जर तुम्ही ‘मोठे आहात’ असा विचार केला, तर तुम्ही लहान ठरता. जर तुम्हाला जाणवलं की, तुम्ही ‘काहीच नाही’, तेव्हा तुम्ही विशाल होता. हेच माणूस असण्याचं सौंदर्य आहे.
आत्मज्ञान हळुवारपणे घडतं, एखादं फूल उमलल्याप्रमाणे.
हुशारी ही फक्त सामाजिकदृष्ट्या मूल्यवान आहे. बुद्धिमत्ता ही अस्तित्वाचं स्वरूप आहे.
जीवन हे जाणिवेबद्दल आहे - चिंता, आसक्ती किंवा संघर्षाबद्दल नाही. येणारे महिने मानवी अस्तित्वाला आनंदी जीवनाकडे नेणारी गहनता प्रदान करोत.
तुम्ही काय करता हे तुमच्यावर अवलंबून आहे, पण ते जाणीवपूर्वक केलं पाहिजे. हाच मानव असण्याचा अर्थ आहे