FILTERS:
SORT BY:
जो समाज आपल्या महिलांचा आदर आणि समर्थन करत नाही, तो समाज प्रगती आणि समृद्धी मिळवू शकत नाही. संपूर्ण जगभरात स्त्री तत्व बहरून येवो.
जेव्हा तुम्ही लहान होता, तेव्हा तुम्हाला दुःखी करण्यासाठी एखाद्याला कठोर परिश्रम करावे लागत होते. आज, तुम्हाला आनंदी करण्यासाठी एखाद्याला कठोर परिश्रम करावे लागतात. मानवी अनुभवाचा स्रोत स्वतःच्या आतमध्येच आहे हे जाणून घेण्याची वेळ आली आहे.
जसा फुलाच्या बाबतीत सुगंध असतो, अगदी तसंच मानवाच्या बाबतीत प्रेम आहे.
जर तुम्हाला कोणत्याही कामात यश आणि आनंद हवा असेल, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पष्ट आकलन.
तुमचा सभोवताल आल्हाददायक बनवण्यासाठी तुम्हाला सहकार्याची आवश्यकता आहे. तुमचं शरीर, मन आणि ऊर्जा आल्हाददायक बनवणे हे शंभर टक्के तुमचंच काम आहे.
वसंत ऋतू पूर्ण बहरलेला असताना होळी येते. रंग, प्रेम आणि उत्साहाच्या नृत्यात तुमचं जीवन साजरं करण्याची हीच वेळ आहे.
तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी फक्त कच्चा माल दिला गेला आहे. तुम्ही त्यातून काय बनवता हे तुमच्यावर अवलंबून आहे.
तुमची परिस्थिती काहीही असो, दुःखी होण्याचे कारणच नाही. तुम्ही काही घेऊन आला नाही, त्यामुळे तुम्ही नेहमीच नफ्याच्या बाजूला आहात.
जेव्हा तुम्ही फक्त स्वतःच्या शरीराने आणि बुद्धीने चालता, तेव्हा जीवन एक सर्कस ठरते. जेव्हा दैवी बुद्धिमत्ता तुमच्या जीवनाचे मार्गदर्शन करते, तेव्हा ते एक नृत्य बनते.
कालभैरव केवळ मृत्यूबद्दल नाही, तर तो वेळेबद्दल आहे. तुमच्या जीवनाची गुणवत्ता ही मुळात तुम्ही तुमचा वेळ कसा वापरता यावर अवलंबून असते.
जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत निःशब्द व्हाल, तेव्हा तुम्हाला जीवनाचा बोध अशा प्रकारे होईल की, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही - ते अत्यंत गहनपणे जाणवेल.
जर तुमच्या हृदयात प्रेम असेल, तर दयाळूपणाची गरज नाही. प्रेमच तुम्हाला या जीवनातून पार नेते.