थायरॉयडची वाढती समस्या - काय आहेत यामागची कारणं?

प्रश्न: सदगुरू आजकाल पुष्कळ लोक थायरॉयडच्या समस्येने ग्रस्त होत आहेत, विशेषकरून हायपो थायरॉयडिजम किंवा ..... हायपर किंवा हायपो थायरॉयडिजम. जरी आपण आयोडिनयुक्त मीठाचा वापर करत असलो तरी थायरॉयडच्या समस्या अधिक बळावत आहेत. या समस्या वाढण्यामागे काय कारणं असतील? हे ताणतणावाशी निगडित अश्या मधुमेह किंवा ब्लडप्रेशर सारखं आहे का ? हटयोग किंवा क्रिया, अथवा ईशायोग केंद्र सारख्या पवित्र स्थळात राहिल्यास यावर मात करता येईल का? यातून सुटका होण्यासाठी आपण काय करू शकतो?
सदगुरू: मला वाटतं केवळ हटयोग साधनेने पुष्कळ लोक बरे झालेत, यात मुळीच शंका नाही. त्याबरोबर, कोणत्याही पवित्र स्थळात असणे नक्कीच फरक पडतो. पण हे थायरॉयड असंतुलन अधिकाधिक व्यापक होत आहे.
आपण हे समजलं पाहिजे, जे तुम्ही थायरॉयड म्हणता – योग शास्त्रात या ग्रंथींना आपण तसं पाहत नाही. वैद्यकीय शास्त्रानुसार ज्याला तुम्ही थायरॉयड म्हणता तो एक ग्रंथीस्त्राव आहे जो दररोज तुमची शरीर व्यवस्था संतुलीत राखण्याचा प्रयत्न करत असतो. किती अन्नपचन करावं, केवढी उर्जा निर्मिती करावी, किती चरबी निर्माण करावी, स्नायुंची निर्मिती किती करावी, अशा सबंध शरीर संरचनेचा समतोल राखण्याचा प्रयत्न हा ग्रंथीस्त्राव करत असतो.
तुमची शारीरिक संरचना तुमच्या मानसिक संरचनेशी अगदी जवळून संबंधित आहेत. आज पुष्कळ पुराव्यानिशी हे स्पष्ट झाले आहे, की जर तुम्ही इथं बसून जर पर्वताचा विचार मनात आणला, तर शरीरातील तुमच्या ग्रंथी एक प्रकारे कार्य करतील, जर तुम्ही वाघाचा विचार मनात आणला तर त्या दुसऱ्या तऱ्हेने कार्य करतील. तुम्ही समुद्राचा विचार मनात आणा, आणि त्या काही वेगळ्याच तऱ्हेने कार्य करतील. एक स्त्री अथवा पुरुषाचा विचार उदभवला तर त्या काही दुसर्याच प्रकारे कार्य करतील. फक्त एक विचार – दुसरं काही नाही. पर्वताचा स्पर्श नाही, वाघ समोर नाही, पुरुष, स्त्री, समुद्र असं काहीही समोर नाही, केवळ एका विचारानं तुमच्या ग्रंथींचं कार्य अस्थिर होतं. तुम्हाला हे सांगण्याचा हेतू असा की आपली शरीर प्रणाली इतकी सुरेख आहे की सर्वकाही ती निरंतर संतुलित ठेवून तुम्हाला उत्तम अवस्थेत ठेवत असते.
मुद्दा हा आहे, तुम्हाला हवी आहे बैलगाडी कारण तुम्ही अजून आधुनिक युगात आला नाहीत. तुम्हाला हवी होती बैलगाडी पण तुम्हाला दिलं गेलं एक अतिप्रगत अंीक्ष यान. याचा प्रत्येक छोटा भाग अनेक अदभूत किमया घडवू शकतो. जरासा स्पर्श जरी केला, धूमधडाका होतो, पुष्कळ काही यामध्ये होत आहे. सहज जर तुम्ही असं पाहिलं आणि या झाडाबद्दल एक अनुमान मांडलत, यामध्ये अनेक प्रकारचे रासायनिक आणि इतर प्रकारचे बदल घडून येतील. शरीराच्या ग्रंथींचं कार्यच बदलतं.
तुम्ही कुठेही असाल, मुंबईत, न्यूयॉर्क किंवा लंडन कुठेही – ज्या वातावरणात तुम्ही वावरत आहात त्याकडे जरा निरखून पहा. सामाजिक दृष्ट्या तुम्हाला या गोष्टींची सवय जडली असेल, पण ज्या प्रकारच्या वातावरणात तुम्ही जगत आहात त्याकडे लक्षपूर्वक पहा, अनेक गोष्टी घडताहेत. त्यापैकी कोणतीच गोष्ट तुमच्यातील प्राकृतिक जीवनाच्या हितावह नाही.
यासर्वांची तुम्हाला सवय झाली असेल, कदाचित या शहरांबाहेर जगणं तुम्हाला अशक्य आहे, तो एक वेगळाच मुद्दा आहे; पण तुमच्यामधील प्राकृतिक जीवनाला यात काहीच रस नाही. तर तुमच्याआत होत असणारे हे अनेक बदल तुमच्या हितावह नाहीत. तर हे ग्रंथींचं अनियंत्रित कार्य अनेकांपैकी एक लक्षण आहे.
एक अति प्रगत सुनियंत्रित ग्रंथींच्या कार्यांपैकी, एक म्हणजे थायरॉयड. अगदी सहज लक्षात येणारं. केवळ याबदलांमुळे, सर्वातप्रथम तुमचे शारीरिक आणि मानसिक मापदंड असंतुलित होतात.
याशिवाय दुसरा पैलू आहे, तुमच्या आत जे कोणते बदल होता आहेत , त्या तुमचे स्वतःचच्या मानसिक प्याटर्ण (संरचना) आहेत . आणिखीन एक पैलू म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचं अन्न सेवन करता . आज रसायनांनी प्रदूषित नसलेलं खाण्याजोगं असं काहीच उरलेलं नाही. जरी तुम्ही सेंद्रिययुक्त अन्न खात असलात तरीहि त्यातसुद्धा सेंद्रिय रसायनं हि वापरली जात आहेत च .
या स्थितीला आपण पोचलो आहोत. रानात प्राकृतीकपणे पिकवलेलं, सहज तोडून खाण्याजोगं काही मिळणं अगदी कठीण झालेलं आहे. असं अगदीच कमी. अगदी थोड्याफार लोकानां सुद्धा हे मिळणं आता अशक्य झालेलं आहे. सर्वकाही बाजारातून आणलेलं. आणि बाजारात काय होतं? केवळ नफा, अधिकाधिक माल. गणवत्ता नव्हे.
आणि आता, आपल्या देशातसुद्धा ....या सर्व गोष्टी लूप्त होत आहेत. माझी आजी....दररोज येणारे भाजी विक्रेते....तुम्हाला माहित असेलच ,भाजीची टोपली डोक्यावर घेवून आपल्या घरी यायचे....अगदी नुकतीच सकाळी 7.30, 8.00 वाजता खुडलेली ताजी भाजी दारासमोर.
जेंव्हा ते येत असत , आजी ह्या गोष्टी कडे लक्ष द्यायची . जेंव्हा तिला विकत घ्यायची असेल , ती विक्रेत्यांना भाजीला हात लावून देत नसे. ताजी, नुकतीच खुडलेली ...आताच हि रोपट्यातून खुडलेली , पण जर ती तराजूत तोलायची असेल किंवा तिला एक, दोन, तीन, चार....अश्या जुड्या घायच्या असतील , ती त्यांना हात लावू देत नसे. म्हणे “माझ्या भाजीला हात लावू नका”. हे जिवाणूंपासून वाचविण्यासाठी नव्हे.
ज्या भाज्या तिची मुलं, नातवंड खाणार आहेत त्यांना इतर स्त्री किंवा पुरुषांना स्पर्श केलेला तिला अजिबात चालत नसे . त्या भाज्यांना ती एक विशिष्ट प्रकारे हाताळायची, हळुवारपणे त्यांना कुरवाळायची, इकडून तिकडून पहायची, आणि त्यानंतर ती चिरून स्वयंपाक करायची.
हि काही चेष्टा समजू नका. या सर्वगोष्टी जर तुमच्या आयुष्यात नाहीत तर तुमच्या ग्रंथीं सुस्थितीत ठेवण्यासाठी औषधं घ्यावी लागतात. आणि औषधं घेऊन सुद्धा त्यांना संतुलित ठेवणे अशक्य आहे . औषधांनी त्यांना दडपून ठेवू शकतात पण योग्य संतुलनात आणू शकणार नाही, अशक्य...कारण प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण वेगळा असतो.
याला सुनियंत्रण म्हणतात, एक अगदी सुनियंत्रितपणे घडणारी प्रक्रिया. तुम्ही तिचा नाश करता आणि मग औषधांनी कसंबसं सांभाळता – तुम्ही जरा अकार्यक्षम यंत्र बनला आहात. हि अकार्यक्षमता, असे अकार्यक्षम यंत्र मग अनेक प्रकारे उपद्रव देउ लागते.आणि तुम्हाला हे तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही ह्यावर ताण आणाल. जेंव्हा तुम्ही अत्यल्प गोष्टींसंगे आयुष्य जगता तेव्हा ते प्रत्ययास येत नाही
हे असं आहे, तुमच्या कारचा टायर जरी पंक्चर झाल, तरी 20 कीलोमीटरच्या स्पीडने तुम्ही घर गाठू शकता. काही भाग कोलमडतील, काही गोष्टी आवाक्या बाहेर जातील, तरी कसंबसं तुम्ही गाडी चालवू शकता. फक्त जेंव्हा गाडी 200 किलोमीटर स्पीडने चालवता, तेंव्हा जर टायर पंक्चर झाला की तुम्हाला कळतं आता गाडी उडणार. एवढंच.
तर या सर्व प्राथमिक गोष्टींची आपण काळजी घेतली , मग आयुष्य सहजपणे, बिनबोभाट उच्चतम वेगाने कार्यरत होईल. पण स्वतःमध्ये समतोल न आणता , आयुष्याचा गाडा भरधाव वेगाने चालवलात, तर ते कोलमडणारच . तुम्ही पाहाल, हे आता दररोज तुमच्या अवती भोवती होत राहणार.
आयुष्यात संतुलन आणायचं आहे पण शहर सोडून जंगलात जाऊन राहणे देखील शक्य नाही. आसपासचं वातावरण सोडून जाणे शक्य नाही. पण स्वतःला इतकं सशक्त तरी करायला हवं की या सर्वांचा तुमच्यावर जास्त परिणाम होऊ शकणार नाही. काही केल्या परिणाम हा होणारच, पण केवढा परिणाम होईल हा प्रश्न आहे. तर कमीत कमी तुमच्या घरात तरी झाडं आणि रोपट्यांच्या सहवासात रहा. जर वेगळी जागा नसेल, तर खोली झाडांनी भरा. यामुळे खोल्या जरा विचित्र दिसतील . अर्धे छत उघडा, हो, सदगुरू पण वरच्या मजल्यावर एक घर आहे. ठीक आहे मग, भिंती तरी उघडा, जरा प्रकाश येऊ द्या. सर्वकाही बंद आहे, फक्त एक एसी गरगरत असतो नेहमी.
हा एक मुद्दा आहे. याशिवाय, तुमच्या सभोवताली सतत काहीतरी वाजत, गरगरत असतं. विशेषकरून जेंव्हा मी इतर देशात, विशेषतः अमेरिकेत; युरोपमध्ये जरा कमी, पण अमेरिकेत सतत काही ना काही गरगरत, दुमदुमत असतं. जेंव्हा मी इथं येतो, तेंव्हा अगदी शांत, निरामयता , ज्यामुळे तुम्ही प्रफुल्लीत होता. सततचा यंत्रांचा गोंगाट एकदम नाहीसा होऊन जातो. बहुतेक लोकानां याचं भानच नाहीये, पण हे होत आहे. दिवसाचे 8 तास ते झोपत आहेत याचा अर्थ ते आपल्या प्राकृतिक वातावरणात राहात नाहीयेत. झोपून, ते स्वतःला यापासून वाचाविण्याचा प्रयत्न करताहेत.
तर स्वतःला आजारांपासून वाचण्यासाठी, स्वतःचं मानसिक व्याधींपासून रक्षण करण्यासाठी, सर्वप्रकारच्या असंतुलनांपासून दूर ठेवण्यासाठी 8-10 तास तुम्ही झोपून काढता. म्हणजे तुमचं अर्ध आयुष्य – मेल्यात जमा. मृत्यू हा नेहमी एक उत्तम उपाय आहे पण आपण हा उपाय शोधत नाही आहोत. आपण जीवनोपाय शोधत आहोत, मरणोपाय नव्हे. कोणतीही गोष्ट नष्ट केली की तो कायमचा उपाय. हो ना? नक्कीच उपाय आहे, पण आपल्याला हा उपाय नकोये. आपल्याला इथं रहायचय...पूर्णपणे जिवंत आणि समाधानी.
तर आयुष्य समाधानी व्हायचं असेल – तर ज्या खोलीत झोपता तेथे झाडं, रोपटी ठेवा. हो! हे जरा विचित्र दिसणार, मी सुद्धा म्हणेन तुम्ही विचित्र दिसता. जेंव्हा तुम्ही चालता, मानवजीवना व्यतिरिक्त, नेहमी तुम्ही इतर जीवांप्रती जागरूक असायला हवं. बहुतेक लोक माणसांप्रतीसुद्धा जागरूक नाहीत, तर मी तुम्हाला लक्षात आणून देत आहे, सजीव अशा सर्वांप्रती तुम्ही जागरूक असलं पाहिजे. एक झाड, एक रोप, गवताचे पान, कृमी-कीटक, तुमच्या बाजूनं जाणारी नावडती माणसं, अशा सर्वांशी तुम्ही जागरूक झालं पाहिजे, प्रतिसाद दिला पाहिजे.
“ओSSह मी झाडांवर प्रेम करतो” हे म्हणायची गरज नाही. झाडांवर प्रेम करायची गरज नाही....झाडांनं तुम्हाला पोषण दिलं पाहिजे, इथं जगण्याचा हा एकच मार्ग आहे. तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल, पण क्षणोक्षणी ती तुमचं पोषण करताहेत. जर तुम्ही हे जागरूकतेने केलंत तर सर्वकाही सुरळीत घडेल. केवळ तुमच्या आसपासच्या सृष्टीशी जागरूकतेने तुम्ही जरी सहभागी झालात तरी तुमच थायरॉयड संतुलनात येईल. हो! या बरोबर आपला पहाटेचा हटयोग, योगक्रिया, या सुद्धा नक्कीच तुम्हाला सहायक ठरतील. यासोबत शक्तिशाली प्राणप्रतिष्ठित स्थळं, यासारखं खूप काही आहे.
हि समस्या बळावण्याचं मुख्य कारण म्हणजे जसजसं आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे तसतसं माणसं अधिकाधिक निष्क्रिय होत आहेत. एका दिवसात, सरासरी एक व्यक्ती आज केवढी कृती करतो, म्हणजे शारीरिक कृती, पूर्वीची पिढी, केवढं काम करत असत आणि केवढं शारीरिक काम आज आपण करत आहोत हे अगदी कमी आहे. तर एव्हढी कमी प्रमाणात कृती असेल तर शरीर रचना संतुलीत ठेवणे फार कठीण.
तर जर असंतुलन जाणवलं की झोपू नका. जरा असंतुलन झालं की लगेच उठा आणि कोणत्यातरी कार्यात झोकून द्या. कोठेही जोश आणि हर्शोल्लासाने काही कृती होत असेल तर त्या कार्यात तुम्ही उडी मारली पाहिजे. आणि जर तुम्हाला फारच बरं वाटत नसेल तर हि कृती जास्त करा. कारण जर जुन्या वातावरणात गेलात की समस्या बिकट होत जाईल. हो! जर तुम्ही अगदीच आजारी असाल तर ती गोष्ट वेगळी. नाहीतर तुम्ही कृतीत भाग घेतलाच पाहिजे. कारण आपण विशेषकरून वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथींच्या बिघाडावर चर्चा करत आहोत, म्हणून शारीरिक कार्यात झोकून देणे हा यावर अगदी सोउपाय आहे.
सोयीस्कर कृती निर्माण करू नका..... न्यूयॉर्कचे रहिवासी...तुम्हाला सांगतो कृती निर्माण करू नका...आजकाल तुम्ही तो हेल्थब्यांड वापरताय...दहा पाउले.., बारा पाऊले, ....असं नका करू. कृती करण्याचा हा योग्य मार्ग नव्हे, असं करून तुम्ही आणखी जास्त आजारी व्हाल. सहज आनंदाने काहीतरी करणे.....आनंदाने जिवंतपणा अनुभवणे. कृती म्हणजे....जर तुम्हाला इथं केवळ बसून आनंद अनुभवणे जमत नसेल तर जा आणि खेळ खेळा......कोणताही एक खेळ खेळा, सभोवताली सहज धावा, पळा. नाहीतर जेंव्हा तुम्ही चालत असाल तेंव्हा टोळाप्रमाणे उड्या मारत जा. अवश्य प्रयत्न करून पहा. तुम्ही हे कधी करायचा प्रयत्न केलाच नाही. हीच तुम्ही समस्या आहे.
आता जेंव्हा तुम्ही बाहेर जाता, मी बघणार आहे. कारण तुम्ही गवतावर चालणार आहात. तुम्ही त्या टोळा प्रमाणे बनलं पाहिजे. च्युक, च्युक, च्युक, च्युक, च्युक...तुम्ही पहाल तुमच्यामध्ये किती जिवंतपणा उफाळून येईल. प्रामुख्याने तुमची मुलभूत समस्या म्हणजे तुमच्या आयुष्याबद्दल तुम्ही जास्तच गंभीर झालात. तर मग मला तुम्हाला स्मरण करावं लागत आहे की काही केल्या तुम्ही एक दिवस मरणार, कशाला एव्हढ गंभीर होता, कारण थोड्याच वेळात हे सर्व संपणार आहे. तुम्ही तुमची पकड ढिली केली पाहिजे. जर आता तुम्ही तुमची पकड ढिली केलीत, तर तुमचं शेवटचं दृश्य जरा वेगळं असू शकतं. नाहीतर लोक तुम्हाला पाहतील.....हि एक सर्वात मोठी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडो – तुम्ही तुमची पकड ढिली केलीत. आताच जर तुम्ही पकड ढिली केलीत, तुमचं आयुष्य अदभूतरित्या घडेल.