सदगुरू म्हणतात, की राग असो, आनंद किंवा प्रेम, काहीही असो, जर तुम्ही ते अखंड काही काळासाठी स्थिर ठेऊ शकलात, तर ते साक्षात्काराचे साधन होऊ शकते.

प्रश्न: जेव्हा माझं मन आनंदी आणि स्पष्ट असतं, तेव्हा माझ्या आतमध्ये एक प्रकारचा उल्हास असतो, जणू मी विरघळतोयपण मी कितीही प्रयत्न केला तरी, माझ्या सभोतालचे लोक मला त्या स्थितीत राहू देत नाहीत. आणि जर मी सर्वांपासून वेगळा राहिलो, तर मला एकटं वाटतंतर मी काय करावं?

सदगुरू: जेवढं तुम्ही जास्त एकाकीपणा आणि नैराश्य अनुभवता, तेवढी जास्त तुम्हाला इतरांच्या संगतीची गरज भासणारजितके तुम्ही जास्त आनंदी, उल्हासपूर्ण बनता, इतरांच्या संगतीची गरज तेवढी कमी होते. सर्वांपासून वेगळं, एकटं असताना जर तुम्हाला एकाकीपणा जाणवत असेल, तर साहजिकच तुम्ही चुकीच्या संगतीत आहातजर तुम्ही चांगल्या व्यक्तीच्या संगतीत असला तर तुम्हाला एकाकीपणा का वाटेल? तुम्हाला नक्कीच छान वाटलं असतंआजकाल लोकांची उत्साही असण्याची कल्पना म्हणजे गप्पागोष्टी, नाच-गाणं, ‘अमुक करूया’, ‘तमुक करूया’! पण तुम्ही केवळ शांत बसून सुद्धा पूर्णपणे उल्हासित असू शकता.

जर तुम्हाला रागवायचं असेल, तर चोवीस तास; न थांबता राग धरा, तुम्हाला आत्मज्ञान होईलजर तुम्हाला प्रेम आवडत असेल, तर चोवीस तास प्रेमळ राहून बघा. तुम्हाला आत्मज्ञान होईल.

जर तुमचा उत्साह कृत्रिम असेल तर तुम्हाला संगतीची गरज भासेलतुमचा नैसर्गिक स्वभावच जर उल्हासपूर्ण बनला, जर तुमच्या आतलं जीवन उत्साही झालं असेल, तर तुमची कृती सुद्धा त्याचाच परिणाम असेलयाउलट, जर तुमचं जीवन उत्साही नसेल, आणि उत्साह निर्माण करण्यासाठी तुम्ही तुमची कृती अधिक तीव्र करत असाल, तर तुमची कृती हे एकमात्र साधन होईल.

हाच एक मोठा फरक आहे. एक तर तुम्ही नाच गाण्यानं एक प्रकारच्या उत्साहाच्या स्थितीत येण्याचा प्रयत्न करता किंवा तुम्ही स्वतःच इतके उल्हासपूर्ण झाला आहात, आणि तो उल्हास तुम्हाला तुमच्या आत सामावता न आल्यानं तुम्ही आनंदाने नाचता, गाता. या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे, एकतर तुम्ही आनंदी आहात म्हणून तुमच्यातून सहज हास्य उमटतं, किंवा कोणीतरी तुम्हाला सांगितलंय, “दररोज सकाळी तुम्ही हसायचा व्यायाम केला की एक दिवस तुम्ही आनंदी व्हाल.” यासुद्धा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जरा  तुमच्या आजूबाजूला बघा आणि सांगा, जीवन कशा प्रकारे काम करत आहे?

जरा फुलांकडे पहा. तुम्हाला काय वाटतं, फुलं आहेत आणि त्यांना आधार म्हणून त्यांच्या भोवती रोप आणि मुळे निर्माण झाली? नाहीदेठात असलेला उत्साह रोपाला आवरता आला नाही म्हणून फुलं उमलली, नाही का? जीवन असंच घडलं पाहिजे. जर तुम्ही याउलट जगायचा प्रयत्न केला, तर आयुष्य अत्यंत अवघड होऊन बसेल.

वास्तविक दुःखी असणं, पण जगात सतत आपण आनंदी असल्याचा देखावा करणं, असे आयुष्य अगदी अवघडदुःखी असताना, आनंदी असल्याचं दाखवण्यासाठी प्रचंड जीवन उर्जा खर्ची पडतेहे तुमच्या लक्षात आलंय का कधीकाही माणसं अशी असतात, की जेव्हा ते आनंदी दिसतात, तेव्हा ते खरोखर आनंदी असतातजेव्हा ते दुःखी दिसतात, तेव्हा खरोखर दुःखी असतातजे आहे ते निखळपणे सर्वांना दाखवतात आणि सर्वांना त्यांच्या आत काय चालू आहे ते माहित असतं. पण काही लोक सतत आनंदी असल्याचं ढोंग करतात, पण असं करायला भरपूर जीवन उर्जा खर्च करावी लागतेअसे सतत ढोंग करणारी माणसे मग वेगवेगळ्या गाठी, ट्युमर व व्याधींना बळी पडतात. तुमच्या मनाला सतत एका प्रकारचं वळण दिलंत तर खरंच तुम्ही स्वतःवर हे ओढवून घ्याल.

लोक अश्या व्याधींपासून वाचत आहेत याचं एकमात्र कारण म्हणजे ते कोणतीही गोष्ट कधीही अखंडितपणे करत नाहीतत्यांचा आनंद कधी ऑन तर कधी ऑफ असतोत्यांचं दुःख कधी ऑन तर कधी ऑफ असतंते कधीच पूर्ण ऑन नसतं. तुम्ही पूर्णपणे दुःखी झालात तर तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील. तुम्ही पूर्णपणे आनंदी झालात, तर त्याचे सुद्धा तुम्हाला परिणाम दिसतील. किंवा जर तुम्ही पूर्णतः क्रोधीत झालात तर त्याचेही परिणाम तुम्हाल दिसून येतीलपण तुम्हाला यातील कशाचेच परिणाम दिसून येत नाहीत कारण तुम्ही कायम, एका क्षणी ऑन तर दुसऱ्या क्षणी ऑफ होत असता.

लोक मला विचारतात, “सदगुरू, कोणत्या प्रकारची भावना आणि मनोवृत्ती मी बाणली पाहिजे?” आणि मी म्हणतो, “कोणतीही असू द्या.” जर क्रोधीत व्हायचं आहे, तर चोवीस तास क्रोधीत राहा, नॉन स्टोप, न थांबतातुम्ही आत्मज्ञानी व्हालजर तुम्हाला प्रेम आवडत असेल, तर चोवीस तास केवळ प्रेमात राहून बघातुम्ही आत्मज्ञानी व्हालकाहीही करा, पण ते सतत चालू असू द्या, तुम्हाला साक्षात्कार होईल. एवढ्याचीच गरज आहे.

या ब्रम्हांडातील सर्वकाही प्रत्येक पेशी, प्रत्येक अणू तुम्हाला भौतिक अस्तित्वाच्या पलीकडील विश्वात जाण्याचे द्वार बनू शकतो, जर तुम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा केला तरपण समस्या ही आहे की लोक सतत आपली दिशा बदलत असतात. ही सतत दिशाबदल करण्याची प्रवृत्ती पूर्वी कधी नाही, इतकी आजच्या काळात वाढली आहेआजकाल लोकांचं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता अगदी कमी झालेली आहे, आणि ते हे अगदी कौतुकाने मिरवत आहेत. जर तुम्ही सतत बदलत राहिलात तर काहीच घडणार नाहीतुम्हाला पाहिजे ती दिशा निवडून त्या दिशेनं जा, काही हरकत नाही, पण न बदलता, निश्चलपणे.