प्रश्नकर्ता – जगातल्या सर्व संस्कृतीं मधे एक गोष्ट सामायिक आहे; आणि ती म्हणजे मानवी जीवनाचा श्रद्धापूर्वक आदर. आपल्या स्वतःचा किंवा इतर कुणाचा प्राण घेणं हे अयोग्य समजलं जातं. पण जर खरंच... एखाद्याला खूप त्रास होत असेल तर, ह्या जीवनात त्याला खूप वाईट अनुभव येत असेल, तर मग अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने... म्हणजे मला म्हणायचं आहे की, त्याने नव्याने डाव मांडायला काय हरकत आहे? हे जीवन संपवून पुन्हा खेळ मांडला तर? त्यात काय चुकीचं आहे.

सद्गुरू – म्हणजे,‘माझं आयुष्य अयोग्य असेल तर, ते संपवून टाकून पुन्हा परत येण्याचा मला हक्क नाही का?’ तुमच्या नोकरीच्या ठिकाणी वाईट अनुभव येत असेल तर तुम्ही ती सोडू शकता. तुम्हाला लग्नाचा वाईट अनुभव आला असेल तर तुम्ही घटस्फोट घेऊ शकता. ज्या समाजात तुम्ही राहता, त्या समाजाचा तुम्हांला वाईट अनुभव आला असेल तर तुम्ही ईशा योग सेंटरमध्ये येऊ शकता. (सगळे हसतात). तुम्हांला ईशा योग सेंटरमध्ये वाईट अनुभव आला तर तुम्ही एखाद्या उंच पर्वतावर जाऊ शकता.म्हणजेच, जीवन संपवून टाकण्यासाठी ही कारणं काही पुरेशी नाहीत.

सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही हे जीवन निर्माण करू शकत नाही आणि म्हणूनच ते संपवण्याबाबत तुम्ही बोलू शकत नाही. एक स्वतंत्र जीवमात्र किंवा स्वतंत्र व्यक्ती म्हणून असलेली तुमची ओळख जर... जर हरवली असेल आणि तुम्ही आणि तो निर्माता एक झाले असाल- अशा परिस्थितीला तुम्ही येऊन पोचला असाल- तर तुम्ही जाणीवपूर्वक हे शरीर टाकून देऊ शकता. तसं असेल तर तुम्हांला परवानगी आहे, पण शरीराला इजा न होऊ देता, एखाद्या झाडाला स्वतःला लटकावून न घेता. तुम्हांला एखाद्या झाडाखाली पुरायला आमची काही हरकत नाही. पण, झाडाला लटकवून घेणं हे न तुमच्या दृष्टीने योग्य आहे ना त्या झाडाच्या.

आपण ह्या आधीसुद्धा पाहिलं आहे; की हे चांगलं आहे की वाईट आहे. तुमचा जीवनोद्देश विस्तृत असेल तर प्रत्येक बाब ही तुमच्यासाठी पहिलं पाउल टाकण्यासारखी आहे. तसं तर, तुम्ही विस्तृत जीवनोद्देश बाळगला असेल तर तुमच्या परम स्वास्थ्याच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट ही पाहिलं पाउल आहे. तुम्ही एखाद्या परिस्थितीमध्ये अडकता मग त्यात इतके वाईट गुंतता की तुम्हाला वाटू लागतं की, हे जीवन संपवलेलंच बरं. ते असो, तसाही हा सगळा निव्वळ मूर्खपणा आहे.

कारण, समजा आज काही चुकलं तर तुम्हाला जीवन संपवावंसं वाटतंय, उद्या सकाळी सगळं धड चाललंय असं तुम्हाला वाटलं तर तुम्हाला जगावसं वाटेल, तिसरं मुल होऊ द्यावं असंही वाटेल. पुन्हा लग्न करावसं वाटेल. उद्या सकाळी जर सगळं जरा बरं चाललं असेल तर तुम्ही काही योजना आखाल. पण, जर सगळीकडे अंधार दिसू लागला तर – तुम्ही लगेच आत्महत्येचा विचार कराल, बरोबर ना? म्हणजेच, हे सगळे निव्वळ तुमच्या मनाचे खेळ आहेत.

एकदा असंच झालं. एका सेल्समननं ठरवलं की, इथून पुढे नवीन क्षेत्रात शिरायचं, हाउसिंग डेव्हलपमेंट. हे क्षेत्र नवीन असल्याने ठिकाणी कुणी दुसरा सेल्समन नसेल असा विचार त्याच्या मनात आला. आता, त्याला चतुराईने पहिला नंबर पटकवायचा होता. मग त्याने काय केलं तर, समोरच्या पहिल्याच घराचं दार ठोठावलं. एका स्त्रीने ते उघडलं. तिला बोलण्याची संधीदेखील न देता हा शिरला की तिच्या घरात आणि स्वतःच्या बॅगेतून शेण काढलं बाहेर, अगदी ताजं गायीचं शेण- आणि त्या स्त्रीच्या घरातल्या नवीनकोऱ्या कार्पेटवर दिलं भिरकावून. मग तो त्या स्त्रीला म्हणाला,‘हे पहा, माझ्याकडे एक अदभूत व्हॅक्युम क्लीनर आहे. तुम्ही पहाच आता मी तुमचं हे कार्पेट कसं स्वच्छ करतो ते. तुम्हांला तर शेणाचा वाससुद्धा नाही येणार. आणि, तसं जर नाही झालं ना तर इथे पसरलेल्या शेणाचा कणन कण मी खाऊन टाकेन.’त्यावर त्या स्त्रीने विचारलं,“थोडा सॉस आवडेल का तुम्हांला त्याबरोबर? कारण, अजूनही आमच्या घरात वीज आलेली नाही.”

तुम्हालाही काय हवं आहे तर थोडासा सॉस हवा आहे. थोडीशी जरी चव आली तरी तुम्हाला अचानक जगावसं वाटू लागतं. नुसतंच शेण खावं लागलं तर कुणालाही मरावसं वाटणार. हो ना? तुम्ही उठून विचारत आहात की,‘सद्गुरू...’ आपण काय बोलत आहोत हे तुम्हाला समजलं असतं तर, तुम्ही असं कधीही बरळला नसतात. तुम्हाला जर तुमचं आयुष्य संपवावसं वाटत असेल तर इथे बसण्यात काहीअर्थच नाही. तसं असेल तर ‘सद्गुरू’ ह्या शब्दाला काही अर्थच उरत नाही. हेच तुम्ही मला सांगू पाहत आहात ना, बरोबर ना? इथे बसण्यात अर्थच नाही,

तुमच्यावर कृपावर्षाव होत नाहीये. तुमच्या नोकरीत अर्थ राहिलेला नाहीये, आयुष्यात वेगळंच काहीतरी घडतंय; हे आणि असलेच विचार तुमच्या मनात येत आहेत. तर त्याऐवजी, फक्त ‘इथे’ लक्ष द्या. क्षणार्धात तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल. मी देईन तो अर्थ प्राप्त करून.