निर्मितीचे कारण काय? येथे निर्मिती वास्तवात नाही. काहीही निर्माण होत नाही. वस्तुतः अस्तित्व हे केवळ उर्जेचे वेगवेगळ्या प्रकारे होणारं नृत्य आहे. असे नाही कि, निर्माता बसलेला आहे आणि तो काही निर्माण करीत आहे. उर्जा हे जीवन आहे. जर उर्जा गतिशील नसती तर काहीही न घडता ही उर्जा स्थिर राहिली असती. परंतु उर्जा हेच जीवन आहे. म्हणून ती अगणित रुपात प्रगट होते. जीवन शाश्वतपणे घडते. जर एखादी ज्योत जळत असली तर ती  क्षणोक्षणी अनेक रूपे धारण करते, कारण कोणतीही गतिशील उर्जा नुसती स्थिर ठेवता येत नाही. ती नेहमी वेगवेगळी रूपे धारण करते. ही रूपे दृश्य आणि अदृश्य होत सतत बदलत असतात. असे का बरे? खरोखर याबद्दलचे कारण सांगता येत नाही. हे असेच असते. हे अस्तित्व आहे आणि ते संपूर्ण आहे. तुम्ही त्याचे कारण विचारू शकत नाही. तुम्ही कारण विचारणे हे अत्यंत मर्यादित आहे. तुम्ही अमर्यादितपणे कारण विचारू शकत नाही कारण ज्याला तुम्ही निर्मिती असे म्हणता ते अमर्याद इंद्रियगोचर तत्व आहे. म्हणून मर्यादित कारण विचारणे हा निरर्थक प्रश्न आहे.

अस्तित्वासंबंधी कोणताही प्रश्न विचारणे हे केवळ निरर्थक आहे कारण सर्व प्रश्न सीमित आहेत. सर्व प्रश्न हे मर्यादित तर्कशुद्ध मनात उद्भवतात आणि ते अनंताची चर्चा करतात. म्हणून निर्मितीविषयीचे प्रश्न हे निरर्थक आहेत. निर्मितीचे कारण देता येत नाही. ती फक्त असते. बस हेच आहे. तुमच्या प्रश्नांद्वारे तिचा ठाव लागत नाही आणि माझ्या उत्तरांनी तिला समजता येत नाही. तुम्ही अस्तित्वाविषयी काहीही विचारले किंवा सांगितले तरी ते अत्यंत निरर्थक आहे आणि तो केवळ तुमचा अविचार असेल.

तसे पाहता अस्तित्वाला निर्मितीशी देणेघेणे नसते. मी असा विचार करू शकतो कि, निर्मिती ही याच्याप्रमाणे आहे आणि दुसरी व्यक्ती असा विचार करू शकते कि, निर्मिती त्याच्याप्रमाणे आहे. अस्तित्वाला निर्मितीशी काही देणेघेणे नसते. ते फक्त असते. तुम्ही नृत्याचा केवळ एक भाग आहात, नृत्याचा अगदी छोटासा भाग आहात. आता प्रश्न असा आहे कि, तुम्हाला निर्मितीचा हिस्सा बनायचे आहे, कायमस्वरूपी निर्मितीचा भाग बनून राहायचे आहे किंवा तुम्हाला निर्माता बनण्याची इच्छा आहे? जेव्हा एखादी व्यक्ती निर्मितीचा भाग बनून राहण्यात समाधानी नसते, जेव्हा कृतींचा अनुभव घेणे तिच्याकरिता पुरेसे नसते, जेव्हा त्या व्यक्तीला निर्मात्याचा अनुभव घ्यावासा वाटतो, तेव्हा ती व्यक्ती योग-मार्ग किंवा अध्यात्म मार्ग किंवा तुम्ही त्याला जे नाव द्याल तो मार्ग अनुसरते.

जेव्हा तुम्ही निर्मिती पुरते समाधानी नसता, तुम्हाला निर्मितीच्या मूळाचा, निर्मात्याचा अनुभव घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही अध्यात्ममार्गावर वाटचाल करू शकता. जर तुम्ही निर्मितीबद्दल आनंदी असाल आणि तिच्यासोबत तुम्ही समाधानी असाल तर तुम्ही प्रापंचिक आहात. जर तुम्ही निर्मात्याशी एकरूप होण्याची इच्छा करीत आहात, तर तुम्ही आध्यात्मिक आहात.