प्रश्न :- एक व्यावसायिक म्हणून , जर मी अतिशय नम्रपणे वागलो तर माझी काम होणारच नाहीत . मग मी क्रोधाच्याच मार्गाचा अवलंब करावा का ?

हौशी विरुद्ध व्यावसायिक

आपण नेहमी “व्यावसायिक” हा शब्दप्रयोग अश्या अर्थाने वापरतो जेंव्हा एखादी व्यक्ती एखादी गोष्ट भावनेच्या आहारी न जाता पार पाडते - अशी व्यक्ती फक्त जे आवश्यक आहे तेच करते. जेंव्हा एखादी व्यक्ती ती ज्यात प्रशिक्षित आहे त्यातच कार्यरत असेल तर मग तेंव्हा रागाला किंवा इतर कशाला जागा उरतच नाही.

खरंतर एक व्यावसायिक म्हणून कार्य करण्यापेक्षा एक हौशी म्हणून केलेलं कार्य कधीही उत्तमच. साधारणतः आपण “हौशी” हा शब्द प्रयोग अश्या व्यक्तींसाठी वापरतो ज्यांना काय करावं ह्याची पुरेशी माहिती नसते. मी नवशिक्यांबद्दल नव्हे तर मी हौशी व्यक्तींबद्दल बोलत आहे. हौशी व्यक्तीला ती करत असलेल्या गोष्टींबद्दल नितांत तळमळ असते, आणि ह्या व्यक्ती ते करत असलेल्या गोष्टींमधून काहीतरी अर्थ शोधत असतात. व्यावसायिक व्यक्ती मात्र असला कुठलाच अर्थ वगैरे शोधत नाही. एखादी अमुक गोष्ट केली जाते कारण मग त्यातून एखादी वेगळी गोष्ट घडते. अश्या प्रकारच आयुष्य हे खूपच रुक्ष होऊन जात. जोपर्यंत आपण प्रत्येक गोष्ट तळमळीने करत नाही, जोपर्यंत तुम्हाला त्याविषयी प्रचंड आस्था वाटत नाही, अश्या प्रकारे केलेलं प्रत्येक कार्य म्हणजे आपल्या आणि इतरांच्या आयुष्याचा आणि वेळेचा अपव्यय आहे.

आपण एखादी ठराविक गोष्ट केली म्हणून त्यात आपण आस्थापूर्वक सहभागी झालो असं नव्हे. जर आपला आस्थापूर्वक सहभाग असेल तर एखादी गोष्ट हि अगदी सहज पणे तुमच्या हातून पार पडेल - हेच ह्यातल सौंदर्य आहे. पण जर तीच गोष्ट तुम्ही आस्थापूर्वक सहभागाशिवाय केलीत तर मग त्यातलं सौंदर्य लोप पावत.

जर तुम्ही व्यावसायिक म्हणून कार्यरत असाल तर तुमचं आयुष्य वाईट असेल . पण तेच जर तुम्ही हौशी व्यक्ती असाल तर हि चांगलीच गोष्ट आहे पण पण त्यापुढेहि जाऊन तुम्ही जगामध्ये एक स्वयंसेवक म्हणून वावरत असाल तर हि गोष्ट फारच विलक्षण आहे . जेंव्हा आपण ज्या गोष्टी खरंच खूप महत्वाच्या आहेत त्या गोष्टी अतिशय तळमळीने करण्यास सतत तयार असतो तेव्हा आयुष्य आहे त्यापेक्षा अधिक सुंदर बनत. शेवटी फलस्वरूप काय मिळेल, आपल्या मार्गात कोण कोण येतंय, कोण आपल्याला पाठींबा देतंय किंवा कोण पाठींबा देत नाही आहे ह्या गोष्टींना मग काहीच महत्व उरत नाही. ज्या ज्या गोष्टी तुम्ही मग अतिशय आस्था पूर्वक करता त्या त्या प्रत्येक गोष्टी ह्या अधिक सुंदर पणे पार पाडल्या जातात .

तुम्हाला भेडसावणारी पहिली समस्या म्हणजे तुम्ही व्यावसायिक आहात आणि दुसरी बाब म्हणजे तुम्हाला राग देखील येतो हि पण समस्या आहे. ह्या क्रोधाची नक्की भूमिका काय असते? लोकं तुमच्या म्हणण्या नुसार वागत नाहीत , म्हणून मग तुम्हाला वाटत कि त्यांच्यावर रागावले म्हणजे ते तुमचं ऐकायला लागतील. ह्या अश्या परिस्थितीत तुमचा क्रोध नव्हे तर आस्थापूर्वक सहभाग अपेक्षित आहे. जर तुमच्या आसपासच्या लोकांना हि जाणीव झाली कि तुम्ही सगळ्याच गोष्टी खूप तळमळीने करत आहात, मग तुमच्या म्हणण्या कडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट खूप मनापासून आणि तळमळीने करतो तेव्हा साहजिकच तुमच्या सभोवताली असणारी माणसं देखील त्याने प्रेरित होतात.